DIY सौंदर्य

मॉईस्चराईजर निवडताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

Dipali Naphade  |  Dec 7, 2019
मॉईस्चराईजर निवडताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

हिवाळा सुरू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा शोध सुरू होतो तो म्हणजे मॉईस्चराईजरचा. खरं तर मॉईस्चराईजरचा उपयोग हा तुमची त्वचा चांगली ठेवण्यासाठी बारा महिने करायला हवा. पण हिवाळ्यात याचा वापर जास्त केला जातो. आपण दुकानदारांकडे जाऊन ते सांगतील ते मॉईस्चराईजर घेऊन घरी येतो. पण तुम्ही मॉईस्चराईजर निवडत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कोणीही कोणतंही मॉईस्चराईजर सांगितल्यानंतर ते आणून त्वचेवर लावणं योग्य नाही. इतकंच नाही तर मॉईस्चराईजर कधी आणि कसं लावायला हवं याचीदेखील योग्य माहिती तुम्हाला हवी. त्यामुळे मॉईस्चराईजर खरेदी करण्याआधी तुम्ही या गोष्टी जाणून घेणं गरेजचं आहे की, तुमच्या त्वचेला नक्की कोणत्या मॉईस्चराईजरची गरज आहे. तुमच्या त्वचेला योग्य मॉईस्चराईजरच अधिक सुंदर बनवतं आणि त्वचा चांगली राखण्यास मदत करतं. त्यामुळे मॉईस्चराईजर निवडताना नक्की काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते आपण जाणून घेऊया – 

मॉईस्चराईजर निवडण्याआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी –

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही मॉईस्चराईजर निवडू नका. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे ते आधी जाणून घेऊया – 

1. त्वचेनुसार निवडा मॉईस्चराईजर

Shutterstock

तुमचं मॉईस्चराईजर हे तुम्ही तुमच्या त्वचेप्रमाणेच निवडायला हवं. तसंच कोणता ऋतू चालू आहे हे पाहून तुम्ही मॉईस्चराईजरची निवड करा. थंडीमध्ये तुम्ही क्रिम वापरा तर उन्हाळ्यात मॉईस्चराईजर लावा. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्ही No Oil क्रिम अर्थात तेल नसलेलं मॉईस्चराईजर तुम्ही वापरा. तर कोरड्या आणि नॉर्मल त्वचेकरिता तुम्ही क्रिमयुक्त मॉईस्चराईजर वापरायला हवेत. थंडीमध्ये कोरड्या त्वचेसाठी जास्त वेळ मुलायमपणा टिकवून ठेवण्यासाठी हेव्ही ऑईली क्रिम वापरायला हवं. तर तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी जेल बेस असणारं मॉईस्चराईजर वापरणं योग्य ठरेल. यामुळे येणारे पिंपल्स आणि अॅक्ने दोन्हीपासून बचाव करता येतो. 

चेहऱ्यावर काहीही Try करण्यापूर्वी जाणून घ्या आपला Skin Type

2. मॉईस्चराईजरचा कसा करावा योग्य वापर

Shutterstock

मॉईस्चराईजर तुम्ही कोणत्याही वेळी खरं तर लावू शकता. पण हे लावण्याची एक योग्य पद्धत आहे. तुम्ही जेव्हा आंघोळ करून येता अथवा चेहरा धुता. तेव्हा चेहरा ओला असतानाच मॉईस्चराईजर लावायला हवं. एकदम सुकलेल्या चेहऱ्यावर मॉईस्चराईजर लावल्यास, त्याचा योग्य परिणाम होत नाही. त्यामुळे चेहऱ्यावरील मुलायमपणा आणि ओलेपणा निघून जाण्यापूर्वीच तुम्ही मॉईस्चराईजर तुमच्या चेहऱ्यावर लावणं योग्य आहे. याशिवाय तुम्ही रात्री झोपताना चेहरा धुता तेव्हादेखील चेहऱ्यावर मॉईस्चराईजर लावायला हवं. यामुळे रात्रभर तुमच्या चेहऱ्यावरील चमकदारपणा टिकून राहातो. मॉईस्चराईजर खरेदी करताना नेहमी शिया बटर अथवा बी वॅक्स असणारेच खरेदी करा. 

3. कसं लावावं मॉईस्चराईजर

Shutterstock

काही जण मॉईस्चराईजर हाताच्या तळव्यावर घेऊन अगदी खसाखसा चेहऱ्यावर अथवा हातावर लावतात. पण असं करू नये. ही चुकीची पद्धत आहे. मॉईस्चराईजर लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांनी क्रिमचे पूर्ण डॉट्स लावून घ्या. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर समान स्वरूपात हे क्रिम पसरवा आणि मग वर्तुळाकार पद्धतीने चेहऱ्यावर मालिश करा.  चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका आणि क्रिमने मालिश करत हात खालून वरच्या दिशेने नेत मालिश करा अर्थात गालाकडून कपाळाच्या दिशेने मालिश करा.  

कोरड्या त्वचेला म्हणा Bye… करा असे 6 घरगुती उपाय

4. एसपीएफसह मॉईस्चराईजरची करा निवड

Shutterstock

जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही घराबाहेर कमी येता आणि तुमच्या त्वचेला जास्त काळजीची गरज नाही तर हा विचार तुम्ही बदलण्याची गरज आहे. सूर्यकिरण हे तुमच्या त्वचेला कधीही नुकसान पोहचवू शकतात. काळे डाग, पिगमेंटेशन इत्यादी समस्या हा सूर्यकिरणांमुळेच होतात. त्यासाठी तुम्ही मॉईस्चराईर निवडताना एसपीएफ असणारं मॉईस्चराईजर निवडायला हवं आणि हे एसपीएस नेहमी 30 च्या वर असायला हवं हे लक्षात ठेवा. उन्हात जायच्या आधी कमीत कमी 15 तुम्ही याचा वापर तुमच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर करा. म्हणजे तुम्हाला उन्हाचा त्रास जाणवणार नाही. शरीरावर काळे डाग पडणार नाहीत. 

हात नेहमी मऊ ठेवायचे असतील तर वापरा 10 टिप्स

5. मॉईस्चराईजर हे केवळ चेहऱ्यासाठी नाही

Shutterstock

तुम्हाला जर वाटत असेल की मॉईस्चराईजरचा उपयोग हा केवळ चेहऱ्यासाठीच करायचा असतो तर हे योग्य नाही. चेहऱ्यासह पूर्ण शरीराला मॉईस्चराईज्ड करणं आवश्यक असतं. चेहऱ्याची त्वचा ही संवेदनशील असते. त्यामुळे आपण त्याची जास्त काळजी घेतो. पण संपूर्ण त्वचेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कोरडं राहिल्यानेदेखील शरीरावर खाज येते. तसंच मान, हाताचा कोपरा आणि पाय याठिकाणीदेखील मॉईस्चराईजर लावायला विसरू नका. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY सौंदर्य