DIY फॅशन

ऑनलाईन शॉपिंग करताना साईज नेहमी चुकते, मग वाचाच

Leenal Gawade  |  Jul 26, 2020
ऑनलाईन शॉपिंग करताना साईज नेहमी चुकते, मग वाचाच

ऑनलाईन शॉपिंग करणे अनेकांच्या आवडीची गोष्ट. सध्याच्या या दिवसात तर आपल्याला ऑनलाईन शॉपिंगची तर खूपच सवय लागली आहे. कोरोनामुळे कोणत्याही संपर्काशिवाय पार्सल मिळते आहे  म्हटल्यावर अनेक जण ऑनलाईन शॉपिंग करणेच पसंत करतात. पण कपड्यांच्या बाबतीत अनेकांचा गोंधळ उडतो. रंग न आवडणे किंवा एखादा पॅटर्न न आवडणे या पेक्षाही कपड्याची फिटिंग बरोबर होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. तुमच्यासोबतही असे बरेचदा झाले असेल. पण तुम्ही साईज निवडताना नेमक्या काय चुका करता आणि कपड्यांची साईज निवडताना नेमके काय करायला हवे ते आज आपण जाणून घेऊया. 

छातीचे माप :

एखादा टॉप खरेदी करताना सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे छातीचे माप. कारण अनेकदा आपल्याला एखादा टॉप किंवा टिशर्ट होत नाही. तुम्ही एखादा टॉप निवडल्यानंतर त्या टॉपच्या खालीच तुम्हाला काही माप दिलेली असतात. ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण ते माप सर्वात महत्वाचे असते. प्रत्येक ब्रँडनुसार माप ही वेगळी असतात. जर तुम्हाला एखाद्या ब्रँडमध्ये small साईज होत असेल तर दुसऱ्या ब्रँडमध्येही तीच साईज होईल असे सांगता येत नाही. जर तुम्हाला याबद्दल थोडी शंका असेल तर तुमच्या ब्रा ची साईजवरुनही तुम्हाला तुमचे माप घेता येऊ शकते. 

उदा . समजा तुमची ब्रा साईज 32 असेल तर तुम्ही त्याहून थोडा सैल असा टॉप निवडा म्हणजे तुम्हाला 33 किंवा 34 साईज असलेला टॉप चालू शकेल. जर तुम्हाला ब्लाऊज घ्यायचा असेल तर मात्र तुम्ही तुमच्या ब्रा साईजची साईज निवडू शकता.

अशाप्रकारचे कपडे घातल्यास दिसणार नाही तुमचं #tummyfat 

पँटचे माप :

Instagram

आता पँट किंवा पायजमा खरेदी करतानाही तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण बरेचदा आपल्या कंबरेचे माप कमी असते पण आपल्या नितंबामुळेही आपल्याला पँट नीट बसत नाही. काही ब्रँडमध्ये कपडे हे स्ट्रेचेबल असतात. त्यामध्ये कंबरेचे माप लहान असले तरी हिप म्हणजेच नितंबाकडील भाग हा थोडा मोठा असतो. त्यामुळे असे कपडे तुम्हाला सहज फिट बसतात. पण टॉपपेक्षाही अनेकांच्या तक्रारी असतात त्या म्हणजे पँटसच्या कारण अनेकांना त्याची फिटींग काही केल्या होत नाही. जर तुम्हाला पँट घेताना शंका असेल तर तुम्ही एखादी पँट आवडल्यानंतर त्या खाली दिलेले माप नीट पाहा. पँट घेताना तुमच्याकडे मेजरींग टेप असेल तर फारच उत्तम. तुम्ही तुमच्या कंबरेचे माप व्यवस्थित घ्या. जर तुम्ही प्लस साईजमध्ये मोडणारे असाल तर तुम्हाला असे कपडे बनवणारे खास ब्रँड माहीत असतीलच. 

उदा. पँटची निवड करताना तुम्हाला आधी मटेरिअलची निवड करणे गरजेचे असते. ती निवड झाल्यानंतर तुम्हाला जी पँट आवडली आहे. त्याची माप तपासा. स्ट्रेट फिट आणि पेन्सिल फिट पँट निवडताना तुम्हाला थोडी अधिक काळजी घेणे गरजेचे असते. कारण अशा पँट स्किनी असतात त्या तुम्हाला टाईड होऊ शकतात. पँट खाली दिलेली माप नीट पाहा. तुमचे माप नीट तपासा आणि त्यानंतर त्याची खरेदी करा. 

प्लस साईज कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा 11 Tips!!!

या गोष्टींचीही घ्या खबरदारी

आता जर तुम्ही कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाला तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करा.

ऑनलाईन जेवण मागवताय, मग नक्की घ्या या गोष्टींची काळजी

Read More From DIY फॅशन