मोत्याचे दागिने म्हटले की आपोआपच डोळ्यात चमक येते. कोणत्याही पारंपरिक वेशभूषेवर मोत्याचे दागिने अधिक आकर्षक दिसतात आणि आपल्या सौंदर्यात भर पाडतात. त्यामुळेच लग्न असो वा कोणतेही कार्यक्रम मोत्यांच्या दागिन्यांना खूपच मागणी असते. अशी कोणतीही महिला नसेल जिच्याकडे मोत्यांचे दागिने नसतील. मोत्यांचे दागिने केवळ साडीवरच नाहीत तर अगदी पंजाबी सूट अथवा कुरती यावरही तितकेच सुंदर दिसतात. पण मोत्यांच्या दागिन्यांची चमक तशीच ठेवण्यासाठी नियमित त्याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा ते खराब होतात. त्यावर काळे डाग पडतात आणि मग त्याची स्वच्छता ठेवणे कठीण जाते. तुम्ही घरच्या घरीही मोत्यांच्या दागिन्यांची काळजी घेऊ शकता. त्याच्या काही सोप्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण त्याआधी मोत्यांच्या दागिन्यांची स्वच्छता करण्याची आवश्यकता का असते हे जाणून घेऊया.
मोत्यांच्या दागिन्यांची स्वच्छता करण्याची आवश्यकता का?
मोत्यांचे दागिने अत्यंत नाजूक असतात आणि कोणतेही केमिकल युक्त उत्पादन अर्थात हेअरस्प्रे, सौंदर्यप्रसाधन, परफ्यूम अथवा डिओड्रंटसारख्या एसिडच्या संपर्कात आल्यानंतर या दागिन्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञ सल्ला देतात की, मोत्यांचे दागिने घालणार असाल तर कोणत्याही अशा उत्पादनांचा वापर हा दागिने घालण्यापूर्वी करा. अर्थातच सौंदर्यप्रसाधन आणि परफ्यूम मारल्यानंतर काही वेळातच सुकते त्यानंतरच तुम्ही मोत्यांचे दागिने परिधान करावे. चुकूनही मोत्यांच्या दागिन्यावर यापैकी कोणताही लेअर तुम्हाला लागत आहे असे दिसले तर त्वरीत स्वच्छ कपड्याने स्वच्छ करावे. मोत्यांचे दागिने हे अन्य दागिन्यांच्या तुलनेत अधिक सांभाळावे लागतात. जाणून घेऊया कशी करावी स्वच्छता.
अधिक वाचा – कोणतेही दागिने ठेवायचे असतील चमकदार, तर करू नका ‘या’ चुका
मोत्यांचे दागिने कसे करावे स्वच्छ
- तुम्ही जेव्हा मोत्यांचे दागिने घालता तेव्हा ते काढताना प्रत्येक वेळी मोती एखाद्या मऊसर कपड्याने पुसून ठेवा. तेल अथवा अन्य पदार्थांचा दागिन्यांना हात लागला असल्यास, त्यावर डाग निर्माण करण्यास हे रोखते. तसंच चुकूनही कोणत्याही केमिकलयुक्त पदार्थांचा यावर वापर झाला असेल तर डाग निर्माण होण्यापासून थांबवते
- तुमच्या मोत्यांच्या दागिन्यांवर डाग लागले असतील तर तुम्ही कोमट पाण्यात डिशसोप मिक्स करा आणि मुलायम कपड्याने हे पुसून घ्या. हलक्या हाताने हे पुसा. खसाखसा चोळू नका. मोत्याचा हार पाण्यात बुडवू नका. यामुळे रेशमचा धागा निघू शकतो
- वर्षातून एकदा तुम्ही दुकानदाराकडे दागिने घेऊन जा. तुमचे मोत्यांचे दागिने व्यवस्थित आहेत की नाही आणि पॉलिशची गरज आहे का या सर्व गोष्टी व्यवस्थित तपासून घ्या
- मोत्यांचे दागिने कधीही तुम्ही अल्ट्रासेनिक ज्वेलरी क्लीनरने स्वच्छ करू नका. यामुळे मोती पटकन खराब होण्याची शक्यता असते
- मोत्यांना क्लोरीन ब्लीच, हायड्रोजन पॅरॉक्साईड, व्हिनेगर, अमोनिया, हेअर स्प्रे, परफ्यूम अथवा सौंदर्यप्रसाधनांपासून लांब ठेवा. कारण यामुळे मोती खराब होण्याची शक्यता असते
वाचा – मोत्याचे दागिने आहेत नववधूसाठी खास
मोत्यांचे दागिने कसे जपावे
- मोत्यांचे दागिने ठेवण्यापूर्वी जेव्हा त्याची स्वच्छता कराल तेव्हा व्यवस्थित सुकू द्या. तसंच अन्य कोणत्याही धातूनच्या दागिन्यांसह हे दागिने ठेऊ नका. मोत्याचे दागिने लिनन किंवा मुलायम कपड्यांमध्ये गुंडाळून अथवा डबीमध्ये बंदिस्त करून ठेवा
- मोत्यांचे दागिने प्लास्टिक बॅगसारख्या एअरटाईट बॉक्समध्ये ठेऊ नका. लक्षात ठेवा मोत्यांना दमटपणाची आवश्यकता असतो. वातावरण खूपच कोरडे असेल तर मोती तुटू शकतात
- आपले मोत्यांचे दागिने तुम्ही अत्यंत लक्षपूर्वक वापरा. धूळ लागू देऊ नका. तसंच मोत्यांचे दागिने एकमेकांमध्ये अडकणार नाहीत याची काळजी घ्या. प्रत्येक दागिना वेगळ्या डब्यात ठेवता येईल असे बघा. एकत्र ठेऊ नका
- मलमलच्या डब्यात हे दागिने जपून ठेवा. यामुळे हे दागिने अधिक सुरक्षित राहतात. तुम्ही हे नियमित स्वरूपात घालू शकता. प्लास्टिक बॅगमध्ये अजिबात ठेऊ नका
अधिक वाचा – लग्नासाठी निवडा अशा प्रकारे दागिने, काही सोप्या टिप्स
सदर गोष्टींची घ्या काळजी
- परफ्यूम अथवा हेअरस्प्रे लावल्यानंतर मोत्यांचे दागिने घाला. कोणत्याही रासायनिक पदार्थांच्या संपर्कात मोत्यांचे दागिने आणू नका
- घामापासून मोत्यांचे दागिने वाचविण्यासाठी तुम्ही नियमित रूमालाने मान स्वच्छ करत राहा
- मोत्याचे दागिने पाण्यात बुडवून ठेऊ नका
- कोणत्याही हूकवर हे दागिने लटकवून ठेऊ नका. यामुळे त्याच्या रेशमच्या दोरीवर ताण येतो आणि नेकलेस खराब होतो
- मोत्यांचे दागिने गुंततील असे एकत्र ठेऊ नका
मोत्यांचे दागिने अधिक काळ टिकावे म्हणून तुम्ही या पद्धतीने काळजी घेऊ शकता. तसंच यामुळे तुमचे दागिने अत्यंत सोप्या पद्धतीने स्टोअर केले जातील. तुम्हाला आमचे हे आर्टिकल कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा आणि लाईक व शेअर करा.
अधिक वाचा – जेमस्टोन दागिन्यांची अशी घ्यावी काळजी, टिकतील अधिक काळ
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक