हिऱ्याची अंगठी अथवा मनमोहक डिझाईन असलेला एखादा नेकलेस असे नाजूक दागिने तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. पण हे दागिने नाजूक असल्यामुळे त्यांची काळजी देखील तितकीच घ्यावी लागते. सतत वापरल्यामुळे अथवा अंगावरील घाम त्यात गेल्यामुळे ते अस्वच्छ होतात आणि त्यांची चमक कमी होते. जर असे दागदागिने चुकीच्या पद्धतीने स्वच्छ केले अथवा त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर ते खराब होण्याची, त्यातील खडे निखळण्याची अथवा सोन्याच्या तारा तुटण्याची शक्यता असते. यासाठीच नाजूक धाटणीचे दागिने स्वच्छ करताना व्यवस्थित काळजी घ्यायला हवी.
मोत्याचे दागिने आहेत नववधूसाठी खास | Motyache Dagine Designs
नाजूक दागिने असे करा स्वच्छ
दागदागिन्यांमध्ये कलाकुसर करण्यासाठी विविध खडे,मोती, सोन्याच्या तारांचे नाजूक काम केलेले असते. ज्यामुळे त्या दागिन्यांचे मौल्य अधिक वाढते. हिऱ्याचे दागिने करताना मौल्यवान हिरे सोन्याच्या अथवा इतर धातूंच्या कोंदणात बसवलेले असतात. त्यामुळे अशा दागिन्यांची काळजी योग्य पद्धतीने घ्यावी लागते. दागिने अंगावर घातल्यामुळे अंगातील घाम, धुळ, माती, साबणाचे कण, मेकअपचे कण अशा गोष्टी या कलाकुसरीमध्ये जाऊन अडकतात. ज्यामुळे दागिन्यांची चमक कमी होते. मात्र हे दागिने सोन्याचे, हिऱ्याचे असल्यामुळे तुम्ही पुन्हा त्यांची चमक परत मिळवू शकता. अशा वेळी दागिने स्वच्छ करताना काही गोष्टींची काळजी अवश्य घ्या.
नाजूक दागिने स्वच्छ करण्यासाठी टिप्स
सोन्याच्या अथवा इतर सर्व प्रकारचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या टिप्स नक्कीच फॉलो करू शकता.
- एका भांड्याच रिठा आणि पाणी एकत्र करा. पाणी थोड गरम करा आणि कोमट झाल्यावर त्यात तुमचे दागिने बुडवा. हलक्या हाताने अथवा मऊ ब्रशने दागिने स्वच्छ करा.
- कोमट पाण्यात लिक्विड डिटर्जंट मिसळा आणि त्यामध्ये तुमचे दागिने बुडवून ठेवा. हलक्या हाताने अथवा मऊ ब्रशने दागिने स्वच्छ करा.
- टुथब्रथवर थोडी टुथपेस्ट घेऊन तो हलक्या हाताने दागिन्यांवर चोळल्यास तुमचे दागिने नक्कीच स्वच्छ होतील.
- कोमट पाण्यात मीठ टाकून त्यामध्ये तुम्ही तुमचे मौल्यवान आणि नाजूक बनावटीचे दागिने स्वच्छ करू शकता.
- अमोनिया पावडर कोमट पाण्यात टाकून त्याने तुम्ही तुमचे सोन्याचांदीचे नाजूक दागिने स्वच्छ करू शकता. नववधूवर खुलून दिसतील बाजूबंदच्या या ’15’ डिझाईन्स (Traditional Marathi Bajuband Designs)
नाजूक दागिन्यांची अशी घ्या काळजी
नाजूक दागिने स्वच्छ करण्यासोबतच ते कसे साठवून ठेवावे हे तुम्हाला माहीत असायला हवे. कारण चुकीच्या पद्धतीने दागिने ठेवल्यास तुमचे दागिने लवकर खराब होऊ शकतात.
- खास वापरातील दागिने निरनिराळ्या डबी अथवा ज्वैलरी बॉक्समध्ये ठेवा. एकाच बॉक्समध्ये सर्व दागिने भरून ठेवू नका.
- हिऱ्याचे दागिने निरनिराळे ठेवा ज्यामुळे त्यातील हिरे निखळणार नाहीत.
- खोटे दागिने आणि मौल्यवान दागिने एकत्र ठेवू नका
- रात्री झोपताना, काम करताना तुमच्या अंगावरील रोज वापरातील दागिने काढून ठेवा
- जर तुम्हाला सतत घाम येत असेल तर आठवड्यातून अथवा महिन्यातून एकदा तुमच्या अंगावरील दागिने स्वच्छ करा. सुंदर आणि पारंपारिक गळ्यातील दागिने प्रकार
Read More From अॅक्सेसरीज
पायांत चांदीचे पैंजण घालणे ही केवळ जुनी परंपरा नव्हे, त्यामागे आहे वैज्ञानिक कारण
Vaidehi Raje