Combination Skin

हाताचा कोपरा (Elbow) आणि गुढघ्याचा (Knees) काळेपणा करा दूर

Dipali Naphade  |  May 8, 2019
हाताचा कोपरा (Elbow) आणि गुढघ्याचा (Knees) काळेपणा करा दूर

बऱ्याचदा आपण चेहरा आणि अन्य त्वचेची काळजी घेताना मात्र हाताचा कोपरा आणि गुडघ्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण त्यामुळे तुमच्या हाताच्या कोपऱ्यावर (Elbow) आणि गुडघ्यावर (Knees) काळेपणा आलेला असतो. अर्थात कोणालाही आपल्या शरीरावर आलेला काळा डाग नक्कीच आवडणार नाही. पण याचा उपाय सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला याचं कारण सांगतो. नक्की हा काळेपणा का येतो? तर तणाव, अनियमित जीवनशैली अथवा सूर्याची किरणं डायरेक्ट तुमच्या अंगावर आली तर त्यामुळे तुमच्या त्वचेवर डेड स्किन तयार होऊ लागते आणि त्वचेवर हा काळेपणा यायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडते स्लिव्हलेस अथवा गुडघ्याच्या वरचे कपडे घालायलाही लाज वाटते. पण आता असं करण्याची गरज नाही. कारण हा काळेपणा दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला योग्य उपाय (Solutions) सांगणार आहोत.

1. घरून निघण्यापूर्वी (Before leaving home)

तुमचा हाताचा कोपरा आणि गुढघा या दोन्हीची त्वचा अतिशय संवेदनशील असते त्यामुळे ही त्वचा सूर्याच्या किरणांपासून (UV rays) वाचवणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे घरून निघण्यापूर्वी नेहमी आपल्या हाताच्या आणि गुढघ्याच्या त्वचेला सनस्क्रिन (sunscreen) ने प्रोटेक्ट करा. अर्थात सनस्क्रिन लावल्याशिवाय अजिबात घराबाहेर पडून नका. तुम्ही यासाठी ऑईनमेंट (ointment) चा वापरदेखील करू शकता. कारण यामध्ये विटामिन ई (vitamin E) जास्त प्रमाणात आहे. हे तुमच्या त्वचेच्या टेक्स्चरचं संरक्षण करण्यासाठी मदत करतं. तसंच बाहेर जाण्यापूर्वी तुमच्या त्वचेला मॉईस्चराईज करायला विसरू नका. यामुळे तुमची त्वचा व्यवस्थित हायड्रेट (hydrated) राहते.

2. एक्सफोलिएशन (Exfoliation)

गुढघे आणि हाताच्या कोपऱ्यावर काळेपणाने त्रस्त असाल तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे Exfoliation. सुकलेल्या आणि फाटलेल्या अथवा डेड स्किन सेल्सना काढून टाकण्याचं काम यामुळे होतं. अशी समस्या असताना तुम्ही स्क्रब, प्युमाईस स्टोन, वॉशक्लॉथ अथवा लूफाह या गोष्टीचाही वापर करू शकता. शिवाय तुम्ही तुमचा स्वतःचा नैसर्गिक स्क्रबदेखील तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एक चमचा ब्राऊन शुगर (Brown Suger) आणि ऑलिव्ह ऑईल (olive oil) समप्रमाणात घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण त्वचेवर लावा आणि मग तुम्हाला यातून दिसणारा परिणाम हा अप्रतिम असेल. उत्कृष्ट परिणामासाठी आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावा.

3. आपल्या त्वचेला द्या योग्य मॉईस्चराईजिंग

तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या त्वचा कोरडी असेल तर त्यावर काळेपणा अर्थात dark patches होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची त्वचा रोज मॉईस्चराईज करण्याची गरज आहे. हे तुम्ही स्क्रबिंग झाल्यानंतर अथवा आंघोळ झाल्यावरही अथवा झोपतानाही करू शकता. तुम्ही असं लोशनही लाऊ शकता ज्यामध्ये शिया बटर, जोजोबा अथवा ऑलिव्ह ऑईल आहे. विश्वास ठेवा यामुळे तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळेल. तसंच तुम्ही अजून एक पर्याय वापरू शकता तो म्हणजे व्हॅसलिन. व्हॅसलिन तुमच्या कोरड्या आणि काळ्या त्वचेवर लावा आणि कॉटनच्या कपड्याने रात्रभर त्वचा झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर तुम्हालाच यातील फरक जाणवेल.

4. चांगलं आणि निरोगी डाएट करा फॉलो

तुमची त्वचा निरोगी राखण्यासाठी गरजेचं आहे ते चांगलं खाणं. उकडलेला पालक, रताळं, गाजर, लेट्युस आणि कोरडे अॅप्रिकोट्स खाल्याने तुम्हाला विटामिन ए आणि ई (vitamin A आणि E) चांगल्या प्रमाणात मिळतात. तुम्ही जितक्या हिरव्या भाज्या खाल तितकी तुमची त्वचा जास्त चांगली राहील.

5. लिंबाची जादू

लिंबू दिसायला तितकं लहान दिसतं त्याचा फायदा मात्र तितकाच मोठा आहे. तुमच्या त्वचेसाठी लिंंबासारखा चांगला पर्याय नाही. लिंबू एक नैसर्गिक ब्लिचिंग आहे. यामुळे तुमची त्वचा टाईट राहाते. लिंबाचे स्लाईस करून तुम्ही तुमच्या हाताच्या कोपरा आणि गुढघ्यावर झालेल्या काळेपणावर घासा. साधारण 3-4 तासांसाठी याचा रस गुडघा आणि कोपऱ्यावर लाऊन ठेऊन द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. नंतर पुसून त्यावर मॉईस्चराईजर लावा. तुम्हाला लगेचच तुमच्या त्वचेतील फरक दिसून येईल. काळेपणा जाईपर्यंत तुम्ही हा प्रयोग रोज करू शकता. असं केल्याने लवकरच तुमचे काळे डाग निघून जातील.

6. बेकिंग सोडा (Baking Soda) करेल तुमची मदत

थोडं आश्चर्य वाटलं ना? बेकिंग सोडा हे नैसर्गिक सौंदर्य घटक आहे. यामध्ये जर तुम्ही लिंबू मिसळलंत तर हे तुमच्या त्वचेवर ब्लिचींगप्रमाणे काम करतं. याचं मिश्रण तुमच्या काळ्या हाताच्या कोपऱ्यावर आणि गुढघ्यावर चांगला परिणाम दिसून येतो. याचा वापर करण्यासाठी तुम्ही यामध्ये दूधदेखील मिसळू शकता. तुम्ही एक चमचा बेकिंग सोडा एका बाऊमध्ये दूध घेऊन त्यामध्ये मिसळा. ही पेस्ट तुम्ही कोपरावर आणि गुडघ्यावर लावा. रोज याचा वापर केल्यास, तुम्हाला याचा चांगला परिणाम मिळतो.

7. कोरफड बनेल तुमचा जवळचा मित्र

तुम्हाला lighter complexion आणि softer texture हवं असल्यास, कोरफडला तुमचा मित्र बनवा. तुमच्या त्वचेवर डायरेक्टली तुम्ही कोरफडची जेल लावल्यास तुमची त्वचा सूर्याची किरणं आणि धूळीपासून वाचते. कोरफड चाकूने थोडसं कापून घ्या आणि त्यातील जेल काढा. आता तुमच्या काळेपणा असणाऱ्या भागाला ही जेल लावा आणि अर्धा तास तशीच राहू द्या. गरम पाण्याच्या मदतीने नंतर हे धुऊन टाका. हे केल्यानंतर तुम्हाला तुमची त्वचा अतिशय मुलायम, मऊ, तजेलदार दिसेल. त्यामुळे आता या सगळ्याचा वापर करा आणि तुमच्या हाताचा कोपरा आणि गुढघ्यावरील काळेपणा पटकन घालवा.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा – 

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

ओठ काळे पडले असतील तर करा 10 घरगुती उपाय

पोट आणि पाठीवरच्या केसांपासून सुटका मिळवा 6 पद्धतीने

Read More From Combination Skin