लहान मुलांचे संगोपन करणे ही काही सोपी गोष्ट मुळीच नाही. मात्र पालकत्त्व स्वीकारल्यावर अनेक गोष्टी पालकांना शिकून घ्याव्याच लागतात. लहान मुलं कोणासमोर काय बोलतील, कधी हट्ट करतील, सार्वजनिक ठिकाणी कशी वागतील याचा काहीच नेम नसतो. अशा वेळी पालक खजिल होतात आणि मुलांवर रागवतात अथवा त्यांना मार देतात. असं वागणं एक पालक म्हणून चुकीचं आहेच पण तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मुळीच योग्य नाही. यासाठीच तुमच्या हट्टी मुलांशी सार्वजनिक ठिकाणी असा संवाद साधा.
मुलं सार्वजनिक ठिकाणी हट्ट करतात तेव्हा –
मुलं मोठ्यांचे अनुकरण करत शिकत असतात. त्यांच्याजवळ सारासार विचार करून योग्य काय आणि अयोग्य काय हे समजण्याची क्षमता या काळात नसते. त्यामुळे अशा प्रसंगी एक पालक म्हणून तुमची जबाबदारी जास्त वाढते.
मुलांना समजून घ्या –
मुलं नेहमीच बाहेर गेल्यावर अथवा घरी पाहुणे आल्यावर हट्ट करतात, चुकीची वागतात हा विचार मनातून काढून टाका. त्याऐवजी आपले मुल असं का वागतं याचा विचार करा. नवीन लोकांमध्ये गेल्यावर अथवा नवीन माणसं घरी आल्यावर मुलं बिथरतात आणि चुकीची वागतात. अशा वेळी आईबाबांनी फक्त त्यांच्याकडेच लक्ष द्यावं असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे मुलांची मनःस्थिती समजून घ्या आणि त्यांच्यासोबत प्रेमाने संवाद साधा. जाणून घ्या का रडते तान्हे बाळ, शांत करण्यासाठी जाणून घ्या कारण
खोटी आश्वासने देऊ नका –
मुलांनी आपले ऐकावे म्हणून आपण घरात असताना तुला चॉकलेट देईन, खेळणं देईन, एखादी आवडती वस्तू देण्याचं प्रॉमिस देता. मात्र नंतर तुम्ही तुम्ही सांगितलेल्या गोष्टी विसरून जाता. कारण वेळ मारून नेण्यासाठी तुम्ही अशा गोष्टी मुलांसोबत बोलत असता. मात्र मुलांचे मन शुद्ध आणि साधे असते. तुम्ही जे काही बोलता ते त्यांना नेहमी खरे वाटते. जेव्हा तुम्ही बोलता त्यापेक्षा वेगळे वागता तेव्हा मुलं चिडतात. बाहेर गेल्यावर त्यांना त्यांची अपेक्षा पूर्ण व्हावी असं वाटणं नैसर्गिक आहे. त्यामुळे मुलांशी संवाद साधताना शक्य नसलेली आश्वासने मुलांना देऊ नका.
वाचा – Bhatukali Khel In Marathi
मुलांशी वाद घालू नका –
मुलं सार्वजनिक ठिकाणी हट्टीपणाने वागत असतील तर तुम्ही तुमचा हट्ट सोडा. कारण अशा वागण्यामुळे तुम्ही परिस्थिती आणखी खराब करत असता. सर्वजणांचे लक्ष तुमच्या वागण्याकडे असते. मुलं लहान असल्यामुळे त्यांच्या वागण्याचे कोणी मनावर घेत नाही. मात्र तुमचे चुकीचे वागणे तुमच्या पालकत्त्वावर बोट ठेवते. यासाठीच सार्वजनिक ठिकाणी मुलांशी वाद घालत बसू नका. जाणून घ्या उशीरा का बोलू लागतात मुलं, उच्चार शिकवण्यासाठी या टिप्स आहेत फायदेशीर
मुलांच्या सर्व प्रश्नांना उत्तर द्या –
मुलांची बुद्धी चिकित्सक आणि जिज्ञासू असते. त्यांना सर्व काही जाणून घेण्याची इच्छा असते. अशा वेळी पालक म्हणून त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त तुमच्याकडून मिळावीत अशी अपेक्षा असते. मात्र जर त्यांना योग्य उत्तर अथवा मनाला पटेल असं उत्तर मिळालं नाही तर मुलं सतत प्रश्न विचारत राहतात. अशा वेळी मुलांवर न चिडता त्यांच्या सर्व प्रश्नांची शांतपणे आणि योग्य उत्तरे द्या. ज्यामुळे मुले चिडचिड अथवा हट्टीपणा करणार नाहीत.
मुलांचे लक्ष विचलित करा –
मुलांचा हट्ट कमी करण्याचे हे एकमेव साधन आहे. मुलं बाहेर गेल्यावर अथवा पाहुणे घरी आल्यावर हट्ट करत असतील. तर थोड्या वेळासाठी त्यांचे बोलणे ऐकून घ्या त्यांचा हट्ट पुरवा. आणि थोड्या वेळाने त्यांना एकादी अॅक्टिव्हिटी करण्यात गुंतवून ठेवा. चित्र काढणे, गेम खेळणे, आवडता पदार्थ अशा गोष्टींमध्ये मन गुंतले तर मुलं त्यांचा हट्ट विसरून जातात. लक्षात ठेवा लहान बाळाला कधीच भरवू नका हे खाद्यपदार्थ