DIY फॅशन

पातळ केसांची अशी बनवा क्रिस-क्रॉस हेअरस्टाईल, स्टेप्स घ्या जाणून

Dipali Naphade  |  Feb 6, 2022
how-to-do-criss-cross-ponytail-

पोनीटेलचा ट्रेंड कधीही जुना होत नाही. अगदी बॉलीवूडमधील सेलिब्रिटी वेगवेगळ्या आऊटफिट्ससह पोनीटेल हेअरस्टाईल करण्याला प्राधान्य देतात. पण पोनीटेलप्रमाणेच मेसी पोनीटेल, लो पोनीटेल, क्रिसक्रॉस पोनीटेल अशा अनेक हेअरस्टाईल्स आहेत ज्या अगदी ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनाही फायदेशीर ठरतात. यासह सध्या अजून एका हेअरस्टाईलने महिलांना आकर्षित केले आहे आणि ती म्हणजे क्रिस क्रॉस पोनीटेल (Criss Cross Ponytail). ही पोनीटेल तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी करू शकता. कॉकटेल पार्टी असो अथवा घरातील पूजा असो ही पोनीटेल तुम्हाला नक्कीच सुंदर दिसते. कॅज्युअल आऊटफिटपासून ते भारतीय आऊटफिटपर्यंत सर्व कपड्यांवर तुम्हाला क्रिस क्रॉस पोनीटेल उठावदार आणि आकर्षित दिसते. 

पातळ केसांसाठी अप्रतिम

पण तुमचे केस अधिक पातळ असतील तर क्रिस कॉस पोनीटेल ही तुमच्यासाठी अधिक सुटेबल आहे. यामुळे केस घनदाट दिसतात. क्रिस क्रॉस पोनीटेल हेअरस्टाईल तुम्ही घरीही बनवू शकता. यासाठी तुम्हाला सतत पार्लरमध्ये जायची गरज नाही. इतकंच नाही तर ही हेअरस्टाईल 10 मिनिट्समध्ये तुम्ही तयार करू शकता. पातळ केसांसाठी ही हेअरस्टाईल अप्रतिम आहे. ही हेअरस्टाईल करणे अजिबातच कठीण नाही. कशी करायची ही सोपी हेअरस्टाईल जाणून घेऊया.  

स्टेप 1 – कोणतीही हेअरस्टाईल बनविण्यापूर्वी सर्वात पहिले तुम्ही तुमचे केस विंचरून घ्या. पोनीटेल बनविण्यासाठी तुम्ही केसांचे तीन भाग करा. यानंतर कानाच्या दोन्ही बाजूला एक भाग करून घ्या. जो खाली मानेपर्यंत येईल. यानंतर एक मोठा भाग घ्या आणि त्याची वेणी घाला. पोनीटेल व्यवस्थित सेट करून घ्या. 

स्टेप 2 – पोनीटेल बनविल्यानंतर बाजूच्या भागांना तीन समान हिश्शामध्ये करून घ्या. तिसऱ्या भागात केसांना गुंतवल्यानंतर समोरून दोन भाग घ्या आणि पोनीटेल वर ठेवा आणि उजव्या बाजूला बॉबी पिन लावा आणि नीट सेटअप करून घ्या. त्यानंतर सेक्शन क्रॉस करून केस पुन्हा वर ठेवा. आपल्या केसांना बांधून क्रॉस पॅटर्न करून घ्या. 

स्टेप 3 – बाकी उरलेले सेक्शन एकत्रित करून जोडून घ्या. त्यानंतर हेअरबँडच्या खाली बॉबी पिन लावा आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने केस व्यवस्थित सेट करून घ्या 

स्टेप 4 – केस सेट करण्याच्या आधी केसांच्या मागे ट्विस्ट करून घ्या. यामुळे केसांना अधिक चांगला लुक मिळतो. 

तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करून पाहा. घरच्या घरीही तुम्हाला ही हेअरस्टाईल करता येते आणि मुळात तुम्हाला कोणाचीही मदत यासाठी लागत नाही. याशिवाय कुठेही बाहेर जाताना ही हेअरस्टाईल करायला अधिक वेळ लागत नाही आणि स्टाईल करण्यासाठी सतत पार्लरमध्ये जायचीही गरज नाही. तुम्हाला कोणत्याही लुक वर ही स्टाईल चांगलीच दिसते. मात्र तुम्ही वेस्टर्न लुक करणार असाल तर तुम्हाला याचा अधिक उपयोग होईल आणि तुम्ही अधिक आकर्षक दिसाल. त्यामुळे आता पटकन कोणत्याही कार्यक्रमासाठी हेअरस्टाईलचा विचार करत असाल तर क्रिस क्रॉस हेअरस्टाईल तुम्ही करून पाहू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन