DIY सौंदर्य

भारंभार मेकअप कशाला ‘न्यूड’ मेकअपनेही दिसाल सुंदर (How To Do Nude Makeup)

Leenal Gawade  |  Mar 16, 2020
Nude_Makeup_fb

मेकअपने सौंदर्य खुलते हे काही सांगायला नको. पण सतत मेकअप करुन तोच तोच लुक करायचा कंटाळा येतो. शिवाय समोरच्या व्यक्तीलाही तुमचा सतत तोच मेकअप करायला आवडत असेल तर आजचा विषय तुम्हाला नक्की आवडेल. कारण खूप जणांना मेकअपचे वेगवेगळे प्रकार ट्राय करायला आवडतात. सध्याचा काळ हा मिनीमल नो मेकअप लुक आणि न्यूड मेकअपचा असा आहे. तुम्हाला तुमच्या रोजच्या मेकअपची स्टाईल थोडी बदलायची आहे का? म्हणजे मेकअप तर करायचा आहे. पण तो थोडा हटके आणि वेगळा. मग तुम्ही सध्याच्या ट्रेंडनुसार ‘न्यूड मेकअप’ करायला हवा. नो मेकअप लुक देणारा असा हा मेकअपचा प्रकार याची अधिक माहिती आपण आज घेऊया. याशिवाय हा मेकअप कसा करायचा? कोणते प्रॉडक्ट निवडायची याची माहिती देखील आज आपण घेणार आहोत. चला करुया सुरुवात

न्यूड मेकअप म्हणजे काय – What Is Nude Makeup

Nude Makeup Look

न्यूड मेकअप म्हणजे असा मेकअप जो तुम्ही चेहऱ्यावर केला आहे असा पटकन दिसून येणार नाही. यालाच इंग्रजीमध्ये No Makeup Look असे म्हणतात. अगदी सौम्य स्वरुपातील हा मेकअप तुम्हाला कुठेही कधीही करता येतो. तो फार दिसत नसल्यामुळेच याला न्यूड असे म्हटले जाते. या मेकअपसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपस्टिक, ब्लशरच्या शेड्सदेखील वेगळ्या असतात. हल्ली हा मेकअपचा प्रकार आणि मेकअपचे साहित्य फारच ट्रेंडमध्ये आहेत. न्यूड मेकअपचे वेगवेगळे प्रकार देखील आहेत. पण यामध्ये एक गोष्ट सर्वार्थानेसारखी आहे ती म्हणजे हा मेकअप लाईट असायला हवा

तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे जाणून घेण्यासाठी वाचा या टीप्स

न्यूड मेकअपसाठी प्रोडक्ट आणि स्टेप बाय स्टेप मेकअप – Products For Nude Makeup With Step By Step Make Up

न्यूड मेकअप काय हे जाणून घेतल्यानंतर आता या मेकअपसाठी प्रोडक्टची निवड कशी करायची हे आता आपण जाणून घेणार आहोत. कारण या मेकअप प्रोडक्टची योग्य निवड केलीत तरच तुमचा मेकअप खुलून दिसेल. करुया सुरुवात

मॉईश्चरायझर (Moisturiser)

कोणत्याही मेकअपची सुरुवात ही चांगल्या मॉईश्चरायझरने करणे फारच जास्त गरजेचे असते. तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असे चांगले मॉईश्चरायझर लावले तर बेस अधिक चांगला बसतो. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी जर काही लावायचे असेल तर तुम्ही मॉईश्चरायझर लावायला हवे. मॉईश्चरायझर लावून ते काही त्वचेत चांगले मुरले की, मगच तुम्हाला मेकअपची खऱ्या अर्थाने सुरुवात करायची आहे. 

फाऊंडेशन आणि कन्सिलर (Foundation  And Concealer)

मेकअपची सुरुवात ज्या गोष्टीने ती गोष्ट म्हणजे फाऊंडेशन आणि कन्सिलर. याची निवड अत्यंत महत्वाची असते. न्यूड मेकअपमध्ये फाऊंडेशन हे कधीच ग्लॉसी असता कामा नये ते नेहमीच मॅट असायला हवे. शिवाय तुमचा शेडही अगदी परफेक्ट असायला हवा.कन्सिलरही तुमच्या चेहऱ्याला  पांढरे करणारे नसावे. तर ते तुमच्या त्वचेमध्ये  ब्लेंड होणारे असावे.

फाऊंडेशन आणि कन्सिलर लावताना

काजळ आणि मस्कारा (Kajal And Mascara)

काजळ आणि मस्काराबाबत फार असे काही नियम नाहीत. तुम्ही लाँग लास्टिंग आणि  स्मज फ्री असे काजळ आणि मस्कारा निवडा. कारण याचा वापर तुम्हाला फारसा करायचा नसतो. त्यामुळे तुमच्याकडे असलेले कोणतेही काजळ किंवा मस्कारा तुम्ही वापरु शकता. त्यामुळे यासाठी तुम्हाला खास काही खर्च करण्याची गरज नाही.

काजळ मस्कारा लावताना

आयशॅडोची निवड (Eye Shadows Selection)

आयशॅडो हा डोळ्यांच्या मेकअपचा फारच महत्वाचा भाग आहे. जर तुम्हाला न्यूड रंगाचे आयशॅडो हवे असेल तर ग्लॉसी आयशॅडो टाळा. त्याऐवजी मॅट रंगाचे आयशॅडो निवडा.यामध्येही तुम्हाला वेगवेगळ्या शेड्स मिळतील. याचा वापर करताना तुम्हाला जपून करायचा आहे ही गोष्ट लक्षात असू द्या.

आयशॅडो लावताना

ब्लशरचे शेड्स (Blusher Shade Guide)

गालांना चमकवणारे ब्लशरचे शेड्सही न्यूड मेकअपमध्ये फार महत्वाचे असतात. न्यूड शेडच्या पॅलेटमध्ये तुम्हाला न्यूडचे वेगळे शेड मिळू शकतील. जे तुमच्या चेहऱ्यावर लावल्यासारखेही वाटत नाहीत.

ब्लशर लावताना

लिपस्टिकच्या शेड्स (Lipstick Shades)

गडद लाल रंग न्यूड शेडमध्ये येत नाही. हल्ली न्यूड शेडचे वेगळे पॅलेटच तुम्हाला मिळते. तुम्ही नव्याने लिपस्टिक घेण्याच्या विचारात असाल तर कोणत्याही ग्लॉसी रंगाच्या मेकअपची निवड करु नका. तर मॅट रंग निवडा. फिक्कट गुलाबी ते फिकट चॉकलेटी अशा रंगाची निवड करा. अनेक चांगल्या ब्रँडमध्ये तुम्हाला या लिपस्टिक मिळतात. लिक्विड लिपस्टिकमध्येही तुम्हाला असे शेड्स मिळतात. या लिपस्टिक लावल्यानंतर त्या मॅट होतात.

लिपस्टिक लावताना

न्यूड मेकअप करताना टाळा या चुका – Mistakes To Avoid While Doing Nude Makeup

न्यूड मेकअप करताना आपण काही अशा चुका करतो की, त्या आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत पण त्याकडे तुम्ही लक्ष देणे फारच गरजेचे असते या चुका कोणत्या ते आता जाणून घेऊया.

तुम्हाला पडलेत का प्रश्न | FAQ

प्रश्न : न्यूड लिपस्टिक म्हणजे काय? (What Is Nude Make Up)
उत्तर : हल्ली बाजारात गेल्यानंतर तुम्हाला न्यूड लिपस्टिक शेड्स अशा लिपस्टिकच्या वेगळ्या शेड्स मिळतात. या लिपस्टिक फार गडद नसतात आणि फार फिक्या रंगाच्यासुद्धा नसतात. या लिपस्टिक लावल्यानंतर तुमच्या ओठांना एक नॅचरल लुक येतो. उदा. जर तुम्ही ओठांसाठी न्यूड शेडमधील गुलाबी रंगाची शेड निवडली असेल तर ही लिपस्टिक तुमच्या ओठांवर तुमच्या ओठांचा रंग असल्याप्रमाणेच दिसते. न्यूड लिपस्टिक या नेहमी मॅट असतात. त्यामुळे त्या चमकत नाहीत. 

प्रश्न :न्यूड मेकअप रोज करता येऊ शकतो का? (Can We Do Nude Make Up Regularly)
उत्तर : हो ,अगदी आरामात तुम्ही हा मेकअप रोज करु शकता. न्यूड मेकअप म्हणजेच नो मेकअप लुकसारखा असतो. जर तुम्हाला खूप मेकअप करुन कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय फारच उत्तम आहे. म्हणजे तुम्ही मेकअप तर केला आहे पण तो न केल्याप्रमाणेच भासेल शिवाय हा मेकअप तुमचे सौंदर्य अधिक खुलवेल. या मेकअपचा टचअप तुम्हाला सतत द्यावा लागत नाही त्यामुळे जर तुमच्या कामाचे स्वरुप हे फार व्यग्र स्वरुपाचे असेल तर तुम्ही न्यूड मेकअपलाच पसंती द्या. 

प्रश्न : न्यूड मेकअपचा शेड वेगवेगळ्या स्किन टाईपनुसार वेगळ असतो का?  (Nude Makeup Shade Is Different For Every Skin Type?)
 उत्तर : हो,तुमच्या त्वचेच्या शेडनुसारच तुम्हाला न्यूड मेकअपची निवड करणे अनिवार्य आहे. म्हणजे अगदी फाऊंडेशनच्या शेड्सपासून ते ओठांच्या लिपस्टिक शेडपर्यंत सगळे तुम्ही तुमच्या स्किनटोन नुसार घेणे आवश्यक आहे. जर तुमची त्वचा सावळ असेल आणि तुम्ही फार लाईट रंगाची न्यूड लिपस्टिक निवडली तर ती तुम्हाला एखादा खडू ओठाला लावल्याप्रमाणे दिसेल. पण गुलाबीतील थोडी गडद अशी शेड तुम्ही निवडली तर ती तुम्हाला नॅचरल दिसेल. या काही गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या त्वचेसाठी योग्य शेडची निवड करा. 

प्रश्न : न्यूड मेकअपसाठी वेगळे साहित्य घ्यावे लागते का? (Do We Need To Buy New Product For This Makeup Look)

उत्तर: न्यूड मेकअप करण्यासाठी लिपस्टिक शेड्स, आयशॅडो याचे रंग वेगळे घ्यावे लागते. याचे रंग हे तुमच्या स्किनटोनशी मिळते जुळते असतात. त्यामुळे शेड्स निवडताना तुम्ही थोडी काळजी घ्यायला हवी. जर तुम्हाला न्यूड मेकअप घ्यायचे असेल तर तुम्ही शेड्स उत्तम निवडा. 

प्रश्न : न्यूड मेकअप कधी करावा ?  (When Nude Makeup Can Be Done)

उत्तर : बरेचदा आपल्याला नो मेकअप लुक असा मेकअप हवा असतो. एखाद्या कार्यक्रमात आपल्याला खूप भडक मेकअप सुद्धा आवडत नाही. अशावेळी तुम्हाला न्यूड मेकअप करता येतो. हा मेकअप लुक चांगला उठून दिसतो. या मेकअप लुकमधील लिपस्टिक आणि वापरलेला बेस हा इतका नॅचरल असतो की हा मेकअप केल्यासारखा देखील वाटत नाही. 

प्रश्न : न्यूड मेकअप म्हणजेच नो मेकअप मेकअप लुक ? (Nude makeup look is same as No Make up look)

 हो,थोड्याफार फरकाने हा मेकअप लुक हा सारखाच असतो. न्यूड मेकअपमध्ये तुम्हाला चेहऱ्याला साधर्म्य असले तरी देखील यामध्ये काही शेड्स या वेगळ्या असतात. त्यामुळे थोड्याफार फरकाने हा मेकअप लुक सारखाच असतो. 

आता जर कधी तुम्हाला फार  मेकअप करायचा नसेल. किंवा नो मेकअप लुक हवा असेल तर अशा पद्धतीने न्यूड मेकअप करा आणि सुंदर दिसा. 

Read More From DIY सौंदर्य