लाईफस्टाईल

जाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत

Aaditi Datar  |  Feb 18, 2019
जाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत

जर तुम्ही विचार करत असाल की, पाणी पिण्याचीही काही योग्य पद्धत असते का? तर तुम्ही अगदी योग्य विचार करत आहात. खरंतर पाणी हे आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक अशी गरज आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. पाणी पिणं नेहमीच आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. पण हेही खरं आहे की, जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला नुकसानही होऊ शकतं. आयुर्वेदानुसार तुमच्या पाणी पिण्याच्या पद्धतीनुसार तुमच्या शरीराला नुकसान किंवा फायदा होतो. म्हणूनच प्रत्येकाला हे माहीत हवं की, कधी, किती आणि कसं पाणी प्यावं. चला तर मग जाणून घेऊया पाणी पिण्याची योग्य पद्धत –

पाणी कसं प्यावं?


आजकाल पाण्याच्या बाटलीने वरून पाणी पिण्याची पद्धत वाढली आहे, जी अत्यंत चुकीची आहे. पाणी नेहमीच ग्लास किंवा भांड्याला तोंड लावून हळूहळू आणि घोटघोट प्यावं. जसं आपण गरम चहा पितो, अगदी तसंच. यामुळे पाणी आपल्या शरीराच्या तापमानानुसार पोटात जातं. जर तुम्ही कोणाला गटागटा पाणी पिताना पाहिलंत तर त्यांना लगेच थांबवा. कारण अशा पद्धतीने पाणी पिणं शरीरासाठी नुकसानदायक आहे. यामुळे पोटात अनेक प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात. तसंच न थांबता पाणी प्यायल्याने अॅसिडीटी, गॅस, ढेकरा येणं यांसारख्या समस्याही जाणवू लागतात.

गरजेपेक्षा जास्त पाणी कधीच पिऊ नये

तज्ञांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलं तर त्याच्या किडनीवर एक्स्ट्रा प्रेशर पडू शकतं. ज्यामुळे किडनीचं गंभीर नुकसान होऊ शकतं. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने किडनीच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करावं लागतं आणि ज्याचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जितकी गरज असेल तितकंच पाणी प्यावं.  

किती पाणी प्यावं ?
आयुर्वेदानुसार आपल्या शरीराच्या वजनाचा 10 व्या भागाला 2 ने वजा केल्यास जी संख्या येईल तितकं लीटर पाणी आपण प्यायला हवं. समजा की, तुमचं वजन 70 किलो आहे तर त्याचा 10 वा भाग 7 असेल. आता त्याला 2 ने वजा केल्यास 5 संख्या येईल. याचाच अर्थ असा की, तुम्हाला रोज 5 लीटर पाणी प्यायला हवं.  

Also Read About पाणी कसे वाचवायचे

पाणी कधी प्यावं?
– सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी किमान 3 ग्लास कोमट पाणी प्यावं म्हणजे रात्रभर शरीरात जमा झालेली अशुद्धी मूत्रामार्गे बाहेर पडेल.

– जेवण जेवताना कमीत कमी 30 मिनिटं आधी पाणी पिणं योग्य असतं. असं केल्याने वजन वाढत नाही.

– जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा आवर्जून तीन ते चार घोट पाणी पिऊन निघावं.

– रात्री झोपण्याआधी एक तास तीन घोट पाणी प्यावं, हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतं.

– दिवसा जास्तीतजास्त पाणी प्या आणि संध्याकाळ होताहोता मात्र पाणी पिण्याचं प्रमाण कमी करा. यामुळे रात्री तुमची झोप आरामात पूर्ण होईल.

– जेवण जेवल्यावर एक तासानंतर पाणी प्यायलाने पचन सहज होतं.

– कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याआधी पाणी प्यावं, ज्यामुळे मांसपेशींना उर्जा मिळते.

पाणी कधी पिऊ नये?


– आयुर्वेदानुसार जेवण झाल्या झाल्या लगेच पाणी पिणे हे विषसमान आहे. अगदीच गरज असल्यास घोटभर पाणी प्यावं. पण यापेक्षा जास्त पाणी जेवल्यावर पिऊ नये.

– उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नये.

– व्यायाम, योगा, वॉक केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

– कधी गरम दूध, चहा किंवा पक्वान्न खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये.

– काही फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण त्यामुळे शरीराला नुकसान पोचू शकते. जसं काकडी, टरबूज, खरबूज इ. ही फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

– युरीन किंवा स्टूल नंतर लगेच पाणी पिऊ नये. याचा पचन तंत्रावर वाईट परिणाम होतो.   

– याशिवाय तळलेल्या आणि भाजलेल्या गोष्टी आणि शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये.

तसेच कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचा

या पद्धतींनी तर अजिबात पाणी पिऊ नये

– शक्य असल्यास प्लास्टीकचा ग्लास किंवा बाटलीने पाणी पिऊ नये.

– पाणी पिण्याची ईच्छा नसल्यास जबरदस्ती पाणी पिऊ नये.

– पाणी कधीही उभं राहून पिऊ नये. नेहमी बसून पाणी प्यावं.

– थंड पाणी पिणं नेहमी टाळावं. शक्य असल्यास उन्हाळ्यात थंड पाण्याऐवजी साधं पाणी प्या. खरंतर थंड पाणी प्यायल्याने शरीरातील काही भागात रक्त योग्यरितीने पोचत नाही. ज्यामुळे अशक्तपणा आणि त्यासोबतच आतडंही संकुचित होतं.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेही वाचा –

लग्नाचा सीझन आला, नैसर्गिक पद्धतीने आणा चेहऱ्यावर *ग्लो*

डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी फॉलो करा या ‘10 टीप्स’

Read More From लाईफस्टाईल