मेहंदी हे रचनेवाली हातों में गहरी लाली… हातावर मेंदी काढल्यानंतर मेंदीची कितीतरी गाणी मनात येतात. मेंदी जितकी गडद तितके जोडीदाराचे प्रेम जास्त असे म्हटल्यामुळे मेंदी ही जास्तीत जास्त रंगायला हवी असा हट्ट प्रत्येकाचा असतो. मेंदी काढल्यानंतर आपण नेमकं काय करायला हवं जेणेकरुन आपल्या हातावरील मेंदी छान गडद रंग घेईल यासाठीच जाणून घेऊया काही सोप्या आणि घरगुती टिप्स
जाणून घ्या लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या तिलक /टिळा समारंभाविषयी
खोबरेल तेल
खोबरेल तेल हा सगळ्यात उत्तम असा पर्याय आहे. मेंदी काढून झाल्यानंतर म्हणजे ती पूर्णपणे वाळल्यानंतरच खोबरेल तेल लावायचे असते. म्हणजे ज्यावेळी मेंदी सुकून काळी पडते तेव्हा मेंदी पाणी न लावता हातावरुन चोळून काढून टाकावी.असे करताना थोडीशी मेंदी हातावर राहिली तरी देखील चालू शकेल. आता त्याच हातावर थोडेसे खोबरेल तेल घेऊन तुम्ही ते चांगले चोळा. असे केल्यामुळे मेंदी आणि खोबरेल तेलाची प्रक्रिया होते. मेंद गडद होण्यास त्यामुळे मदत मिळते. मेंदी रंगण्यासाठीचा हा सगळ्यात सोपा आणि साधा अस प्रयोग आहे.
प्री वेडिंग शूटसाठी बेस्ट वेस्टर्न ड्रेस डिझाईन्स
साखर पाणी
साखर पाणी हा पर्यायसुद्धा खूप जणांना माहीत असेल. पण हा उपाय मेंदी लावल्यानंतर अवघ्या काहीच तासांमध्ये करायचा असतो. आता तुम्हाला सगळ्यात आधी मेंदी लावल्यानंतर ती थोडीशी हातावर वाळली की एक चमचा साखर आणि त्यात दुप्पट पाणी घाला. साखर चांगली विरघळली की, त्यामध्ये कापूस भिजवून तो मेंदीवर फिरवा. मेंदीवर फिरवल्यामुळे मेंदीचा रंग येण्यापेक्षा मेंदी जास्त काळ हातावर टिकण्यासाठी याचा उपयोग होतो. साखर ही विरघळल्यानंतर चिकट होते. त्यामुळे मेंदी हातावर अगदी व्यवस्थित चिकटते
लवंगेची वाफ
ज्यांची मेंदी अजिबात रंगत नाही किंव ज्यांना मेंदीचा काळा कुळकुळीत असा रंग हवा असतो. त्यांनी मेंदी काढून टाकल्यानंतर तव्यावर काही लवंगेच्या कळ्या टाकून त्या चांगल्या गरम झाल्या की, त्याची वाफ घ्यावी. अशा लवंगची वाफ घेतल्यामुळे मेंदी लाल होण्यास मदत होते. लवंगची वाफ घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच मेंदी काळी होण्यास मदत मिळते.
चुना
चुना हा उष्ण असतो. चुना लावल्यानंतर मेंदी गडद होते. खूप जण हा प्रयोग करतात. पण चुना हा खूपच गरम असतो. जर चुना थेट हाताला लावला तर हाताची त्वचा ही जळण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही चुना लावताना थोडी काळजी घ्या कारण त्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. चुना लावताना तो अगदीच कोरडा फासू नका. अगदी थोडासा चुना आणि त्यात पाणी घालून हा प्रयोग करा. हातावर जरा जास्त जळजळ होत असेल तर तुम्ही ते लगेच काढून टाका
हिंदू लग्न विधी समारंभ असतो असा, विवाह विधी घ्या जाणून (Lagna Vidhi Marathi)
आता मेंदी रंगायची असेल तर हा प्रयोग नक्की करा.