DIY लाईफ हॅक्स

डास चावल्यावर आलेल्या दादी घालविण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Dipali Naphade  |  Oct 18, 2021
mosquito bite

लवकरच थंडीचे दिवस सुरू होतील आणि डासांची संख्याही जास्त वाढते. संध्याकाळ झाली की, सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करावे लागतात. आसपास अनेक डास दिसू लागतात. हातापायावर डास चावल्यामुळे दादी येतात आणि नंतर त्वचेवर जळजळ होत राहाते. तसंच त्वचेवर लाल चट्टे अथवा पुळ्या येतात आणि पुढचे दोन ते तीन दिवस त्याचा त्रास होत राहातो. बऱ्याचदा डास अथवा किड्यांमुळे त्वचेवर ज्या दादी येतात त्यामुळे खूपच खाज येते आणि साधारण याचा पुढचे काही दिवस त्रास होत राहातो. यावर त्वरीत काही उपचार करता येत नाही. पण याची खाज कमी व्हावी आणि पुळ्या येऊ नयेत यासाठी काही घरगुती उपाय करता येतात. खाज यायला लागल्यावर नखांनी यावर खाजवू नये हा जरी उपाय असला तरीही काही असे घरगुती उपाय आहे ज्यामुळे तुम्हाला पटकन समाधान मिळू शकते. तुम्ही यावर बऱ्याचदा कोणतेही नॉर्मल अँटिसेप्टिक क्रिम लावता, पण अजूनही काही घरगुती उपायांचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. 

बर्फाचा करा वापर

बर्फाचा वापर केल्याने त्वचेची सूज कमी होते. मात्र जास्त वेळ तुम्ही बर्फाने डास चावल्याने आलेल्या दादीचा भाग शेकू नका. तसंच बर्फ लावण्याचीदेखील एक पद्धत आहे. बर्फ पहिले क्रश करून घ्या आणि मग एका कपड्यामध्ये तुम्ही लपेटून बर्फाने त्वचा शेकून घ्या. असं केल्यामुळे पुळ्या येणे कमी होते आणि आलेल्या दादीमुळे खाजही येत नाही. तसंच तो भाग सहसा सुजत नाही. 

मधाचा करा प्रयोग

मधामध्ये अँटिबॅक्टेरियल घटक असतात. तुम्ही मधाचा वापर दादी घालविण्यासाठी करू शकता. तुम्हाला डास चावल्यावर जर शरीरावर दादी आल्या असतील तर याचा नक्कीच फायदा मिळेल. पुळ्या आल्यावर जर खाज येत असेल तर तुम्ही मधाचा प्रयोग करू शकता. यामुळे होणारी जळजळ कमी होण्यास मदत मिळते. मध तुम्ही 10-15 मिनिट्स लाऊन ठेवा आणि मग थंड पाण्याने धुवा. 

कोरफड जेल लावा

कोरफड जेल तुम्ही आलेल्या दादींवर लाऊन त्याचा उपयोग करून घेऊ शकता. तुम्ही जर कोरफड जेलचा वापर करणार असाल तर लक्षात ठेवा की, तुम्हाला याची अलर्जी असेल तर याचा वापर टाळा. कोरफड जेल ही अँटीइन्फ्लेमेटरी असते आणि त्वचेवर येणारी सूज कमी करण्यास फायदेशीर ठरते. तुम्ही कोरफड जेल नारळाच्या तेलासह मिक्स करा आणि लालपणा आला असेल आणि खाज येत असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता.

टी ट्री ऑईलचा वापर करा

टी ट्री ऑईल हे अत्यंत चांगले एसेन्शियल ऑईल आहे. तुम्ही आंघोळीच्या पाण्यात मिक्स करून याचा वापर करू शकत आणि कोणत्याही तेलासह याचे काही थेंब मिक्स करून त्वचेवर लावा जेणेकरून तुम्हाला या डासांच्या दादीपासून सुटका मिळण्यास मदत होईल. मात्र लक्षात ठेवा की, टी ट्री ऑईलच्या 5 थेंबापेक्षा अधिक थेंबाचा वापर करू नका.

तुळशीच्या रसाचानेदेखील होतो फायदा

तुळशीची पाने अथवा तुळस हे अँटीफंगल आणि अँटिबॅक्टेरियल असून याच्या पानांचा रस तुम्ही डासांनी चावल्यानंतर वापरू शकता. मात्र तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही याचा वापर करू नका. यामुळे तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो अथवा त्वचेला नुकसान होण्याची समस्या होऊ शकते.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स