Care

डार्क अंडरआर्म्ससाठी घरगुती उपाय (Underarms Black Removal Home Remedies In Marathi)

Dipali Naphade  |  Aug 12, 2019
Underarms Black Removal Home Remedies In Marathi

कोणताही मॉडर्न आणि स्लीव्हलेस टॉप घालायचा असेल तर सर्वात पहिले डोक्यात काय येत असेल तर नक्कीच Underarms केले की नाही. बऱ्याच मुलींना यामुळे स्लीव्हलेस घालायला लाज वाटते किंवा त्यांना काळे डाग असतील तर नक्की काय करायचं हे कळत नाही. सारखं पार्लरमध्ये जाऊन त्यावर उपचार घेणंही शक्य नसतं. पण या गोष्टीसाठी आता पार्लरला सतत जायची गरज नाही. खरं तर डार्क अथवा काळ्या अंडरआर्म्स ची बरीच कारणं असू शकतात. शेव्हिंग, खराब दर्जाच्या् डिओड्रंटचा वापर अथवा अनुवंशिकता यापैकी काहीही. कारण काहीही अ्सो पण काळे अंडरआर्म्स कोणालाच आवडत नाहीत. त्यामुळे यासाठी नक्की घरच्या घरी आपल्याला काय आणि कसे डार्क अंडरआर्म्ससाठी घरगुती उपाय (Underarms Black Removal Home Remedies In Marathi) करायचे ते आपण पाहूया.

शरीर काळे पडण्याचे कॉमन भाग (Common Areas Of Darkening)

शरीरातील असे काही भाग आहे ज्याची तुम्ही कितीही काळजी घेतली तरीही ते काळे पडतात. त्यापैकीच एक आहे तो म्हणजे अंडरआर्म्स. पण याव्यतिरिक्तदेखील तुमच्या शरीराचे काही भाग आहेत जे काळे पडतात. याव्यतिरिक्त कोणते भाग आहेत ते घेऊया जाणून – 

मानेची मागची बाजूमानेवर बऱ्याचदा मळ साचून राहतो आणि मान काळी पडते. त्यामुळे नेहमी आंघोळ करताना मान साफ करणं आवश्यक असतं. 

हाताचा कोपरा – हाताचा कोपरा सतत आपण टेकवून ठेवतो त्यामुळे बऱ्याच जणांना हातांचा कोपरा काळंवडलेला दिसून येतो. 

गुडघा – पायाचा गुडघा हादेखील शरीराचा असा भाग आहे जो काळा पडतो. सतत आपण टेकून राहिलो अथवा त्यावर काही प्रेशर येत राहिलं तर शरीराचे हे भाग काळे पडतात. 

अंडरआर्म्स काळे होण्यामागील कारणं (Causes Of Dark Underarms)

अंडरआर्म्स नक्की का काळवंडतात हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच नेहमी सतावतो. त्याची नक्की काय कारणं आहेत हेदेखील आपल्याला जाणून घ्यायचं असतं. त्याची कारणं आम्ही तुम्हाला सांगतो 

वाचा – नक्की वापरुन पाहा हे 10 फूट स्क्रब (Foot Scrub Available In India)

लठ्ठपणा (Obesity)

जर तुमच्या अंगात चरबी साठली असेल आणि लठ्ठपणा आला असेल तरत त्याचा परिणाम शरीरातील इन्शुलिनवर होतो. तुमच्या शरीरातील साखर वाढून शरीरावर पिगमेंट सेल्स वाढायला सुरुवात होते आणि त्यामुळे काळेपणा अधिक येतो. जास्तीत जास्त लठ्ठ असलेल्या व्यक्तींना अंडरआर्म्स काळे असण्याचा त्रास दिसून येतो. त्याचं कारण लठ्ठपणा हेच आहे.

मधुमेह (Type 2 Diabetes)

लठ्ठपणा हा त्याच्याबरोबर मधुमेहदेखील घेऊन येतो. खरं तर हा तुमच्या शरीरासाठी रिस्क फॅक्टर ठरतो. तुमच्या शरीरात साखर झाल्याचा परिणाम शरीराबाहेरदेखील होतो. शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे पिगमेंटेशन येऊन शरीराचा भाग उदाहरणार्थ अंडरआर्म्स काळे पडू लागतात. 

हार्मोन सिंड्रोम (Hormone Syndrome)

काही वेळा तुम्हाला असलेल्या आजारांमुळेही अंडरआर्म्स काळे पडण्यास कारणीभूत ठरतात. थायरॉईडसारखा आजार तुम्हाला झाल्यास, तुम्हाला हा त्रास नक्की होतो. तसंच तुमच्या हार्मोनमध्ये होणाऱ्या बदलांमुळेही हा त्रास उद्बवतो. 

मेडिकेशन (Medication)

तुम्हाला कोणत्याही प्रकारची औषधं चालू असतील तर काही औषधांमुळे तुमच्या शरीरातील इन्शुलिनचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम होऊनदेखील अंडरआर्म्स काळे पडतात. खरं तर इन्शुलिन वाढलं की त्याचा परिणाम त्वरीत तुमच्या शरीरावर होत असतो ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 

कॅन्सर (Cancer)

अचानक जर तुमची त्वचा काळी पडू लागली तर हे कॅन्सरचं लक्षण आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही वेळेवर याकडे लक्ष द्यायला हवं. तुमची त्वचा काळी पडू लागली तर त्याचबरोबर पोटात दुखणं, लिव्हरला सूज येणं या गोष्टीदेखील घडतात. 

डिओड्रंटचा वापर (Use Of Deodorants)

अंडरआर्म्समध्ये तुम्ही सतत डिओड्रंटचा वापर केल्यास, तुमची त्वचा अधिक प्रमाणात काळी पडते. डिओड्रंटमधील केमिकल्स तुमच्या नाजूक त्वचेला हानी पोहचवतात आणि त्वचा काळी पाडण्यास भाग पाडतात. 

शेव्हिंग (Shaving)

अंडरआर्म्सची त्वचा ही अतिशय नाजूक असते. तिथे येणारे केस काढण्यासाठी बरेचदा शेव्हिंगचा वापर केला जातो. पण त्यामुळे तुमची त्वचा काळी पडते. शेव्हिंग करताना त्वचा घासली जाते आणि त्याचा परिणाम काळपटपणा येण्यावर होतो. तसंच हा भाग अतिशय खरखरीतही होतो. 

घट्ट कपडे घालणं (Wearing Tight Clothes)

घट्ट कपडे घातल्यानंतर तुमच्या काखेखाली येणारा घाम हा साचून राहतो. सतत आपण तो घाम साफ करू शकत नसल्याने त्वचा काळी पडते. त्यामुळे सहसा टाईट कपडे न घालणं योग्य ठरतं. तुम्हाला जर अति घाम येत असेल तर शक्यतो टाईट कपडे घालणं टाळावं.

काळ्या डागांवर करा घरगुती उपाय (Underarms Black Removal Home Remedies In Marathi)

अंडरआर्म्समध्ये काळे डाग दिसू नयेत यासाठी सतत पार्लरला जायची गरज नाही. त्यासाठी आपण घरगुती उपायदेखील करू शकतो. 

वाचा – अंडरआर्म्समधील Dark Patches घालवण्यासाठी 7 सोप्या टिप्स

1. वॅक्सिंगला द्या संधी (Waxing)

डार्क underarms चं मुख्य कारण म्हणजे शेव्हिंग. खूप लवकर लवकर शेव्हिंग केल्यास, केसांची वाढ एकसारखी होत नाही. त्यामुळे संवदेनशील त्वचा खराब होते आणि त्याठिकाणी काळी पडते. यापासून वाचण्यासाठी तुम्ही वॅक्सिंग हा चांगला पर्याय निवडू शकता. शेव्हिंगच्या तुलनेत या प्रक्रियेत कमी त्रास होतो. तसंच हे केसांना मुळापासून काढून टाकतं आणि यामुळे armpit एरिया ब्राईट होतो. शेव्हिंगच्या तुलनेत वॅक्सिंग केल्यास, केसांची वाढ लवकर होत नाही. त्यामुळे सहसा तुम्ही रेजरने शेव्हिंग करणं टाळा आणि वॅक्सिंगचा आधार घ्या

2. लिंबाचा रस (Lemon Juice)

तुमच्यापेकी बऱ्याच जणींना हे माहीत नसेल की, लिंबामध्ये ब्लिचिंगचा अंश असतो. तुम्हाला जर तुमच्या काळ्या अंडरआर्म्स पासून लवकरात लवकर सुटका हवी असेल तर, तुम्ही आंघोळीच्या आधी तुमच्या खाकेखाली लिंबाचा रस लावायला विसरू नका. या प्रक्रियेने तुम्हाला लगेचच परिणाम दिसणार नाही. पण तुम्हाला काही आठवड्यातच याचा परिणाम दिसून येईल. तुम्हाला जर रोज लिंबाचा रस काढण्याचा कंटाळा असेल तर तुम्ही canned स्प्रे चा देखील वापर करू शकता. यासाठी तुम्ही लेमन हेअर रिमूव्हल स्प्रे चा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला दोन फायदे होतील. एक म्हणजे तुमचे केस निघून जातील आणि तुमची underarm त्वचा स्वच्छ राहील. 

3. Deodorant चा वापर करू नका (Don’t Use Deodorants)

नक्कीच deodorant तुमच्या शरीराला चांगला सुगंध देतात पण यातील केमिकल्स त्वचेवर डायरेक्ट परिणाम करतात. जर तुम्ही underarms वर डायरेक्ट डिओ लावलात तर त्याचा परिणाम त्वचा काळी होण्यात होतो. याऐवजी तुम्ही परफ्युमचा वापर करा. डिओच वापरायचा असेल तर तुम्ही स्किन लाईटनिंग डिओचा वापर करा. तुम्हाला घरगुती उपाय करून पाहायचा असेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचा वापरही करून पाहू शकता. कारण बेकिंग सोडा हा नैसर्गिक क्लिन्झिंग एजंट आहे. यामुळे dead cells आणि clogged pores साफ होतात. तसंच यामुळे दुर्गंधी आणि बॅक्टेरियाचादेखील नाश होतो आणि त्वचा अधिक चमकदार होते. 

4. काकडी आणि बटाट्याची कमाल (Cucumber & Potato)

या दोन्ही भाज्या त्वचा काळसर पडली असल्यास यापासून सुटका मिळवून देतात. या दोन्ही भाज्यांमध्ये acidic आणि ब्लिचिंग घटक असतात. त्यामुळे याचे स्लाईस अथवा पेस्ट तुम्ही underarms वर वापरल्यास, याचा चांगला परिणाम होतो. हे लावून तुम्ही साधारण 15-20 मिनिट्स तसंच ठेवा. तुमच्या घरात कोरफडचं झाड असेल तर त्याची ताजी जेलही तुम्ही वापरू शकता. याचा वापर केल्यास, तुमच्या स्किन टोनमध्ये तुम्हालाच फरक जाणवेल. 

5. Lightening स्क्रबचा वापर (Choose Scrub Wisely)

हे स्क्रब केवळ स्वस्तच असतात असं नाही तर तुम्हाला बाजारामध्ये लगेच उपलब्ध होतात. पण आजकाल बाजारामध्ये इतक्या तऱ्हेची उत्पादनं आली आहेत त्यामुळे नीट रिसर्च करून मगच त्याची खरेदी करा. तुमच्या त्वचेला सूट होईल अशाच उत्पादनांचा वापर करण्याचा सल्ला आम्ही देऊ. एक उत्पादन सूट झाल्यानंतर त्याचाच वापर करा. सतत बदल करत राहू नका. Nivea, The Body Shop, Everyouth Naturals आणि St Ives अशा काही चांगल्या आणि प्रसिद्ध ब्रँड्सच्या उत्पादनांच्या स्क्रबचा वापर तुम्ही करा.

6. व्हिनेगरचा वापर (Use Of Vinegar)

व्हिनेगरमध्ये डाग काढण्याची आणि बॅक्टेरियाची लढण्याशी ताकद मोठी असते. त्यामुळे डार्क underarms पासून सुटका हवी असल्यास, हा एक चांगला पर्याय आहे. किटक आणि दुर्गंधी दोन्ही नष्ट करण्याबरोबरच त्वचा अधिक चमकदार बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. तांदूळ पीठ आणि व्हिनेगरची पेस्ट बनवून तुम्ही ती जर अंडरआर्म्स वर लावली आणि साधारण 15-20 मिनिट्सनंतर धुतलंत तर त्याचा तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.

7. दह्याचा करा वापर (Curd)

दह्यामध्ये असणारे probiotics बॅक्टेरिया आणि किटाणू मारून टाकण्यास मदत करतात. यामध्ये असणारं lactic अॅसिड त्वचेला exfoliate करण्यासह त्वचा नैसर्गिक मॉईस्चराईज करण्यासाही फायदेशीर ठरतं. लवकरात लवकर चांगला परिणाम हवा असल्यास, डार्क underarms वर दह्याचा वापर रोज करा. तुम्हाला दही लावणं विचित्र वाटत असेल तर तुम्ही एखाद्या ब्युटी स्टोअरमधून दह्याचा मास्क खरेदी करू शकता आणि त्याचा वापर करू शकता. या उत्पादनात विटामिन ए असतं जे त्वचेला सौम्य ठेऊन त्याला योग्य पोषण देतं. 

8. परिणामकारक केशर (Kesar)

हा पर्याय महाग नक्कीच आहे पण तितकाच परिणामकारक आहे. केशर आणि दूध/क्रिम मिसळून एक क्रिमी बेस तयार करून घ्या आणि झोपण्यापूर्वी अंडरआर्म्स ला लावा. पूर्ण रात्र हे असंच राहू द्या. सकाळी उठून आंघोळ करताना धुवा. हे मिश्रण antibacterial आणि lightener प्रमाणे काम करतं. तुम्हाल जर घरी हे बनवण्याचा वेळ नसेल तर तुम्ही कोणत्याही स्टोअरमधून सॅफ्रन क्रिम पॅक खरेदी करून त्याचा वापर करा.

9. टी ट्री ऑईल (Tea Tree Oil)

अंडरआर्म्समधील काळेपणा दूर करण्यासाठी टी ट्री ऑईल हा अप्रतिम पर्याय आहे. यामुळे केवळ काळेपणाच दूर होतो असं नाही तर घामाच्या दुर्गंधीपासूनही तुमची सुटका करण्यासाठी हे फायदेशीर आहे. यामध्ये असणाऱ्या अँटिमायक्रोबायल घटकांमुळे तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. यासाठी तुम्ही पाणी आणि टी ट्री ऑईल मिक्स करा. त्यानंतर हे मिक्स्चर एका स्प्रे बाटलीमध्ये घाला आणि तुमच्या अंडरआर्म्सवर या स्प्रे चा वापर करा. याचा नियमित वापर केल्यास, तुम्हाला लवकरच अंडरआर्म्समधील काळेपणापासून सुटका मिळेल.  

10. कोरफड (Aloe Vera)

कोरफडमध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात. कोरफड ही त्वचेसाठी उत्कृष्ट औषधी ठरते. त्यामुळे अंडरआर्म्समधील काळ्या डागांवरही तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. कोरफड कापून त्यातील जेल काढून घ्या. त्यानंतर त्यातील ताजी जेल तुम्ही काखेखाली लावा. साधारण 20 मिनिट्स हे असंच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने तुम्ही हा भाग स्वच्छ करून घ्या. रोज तुम्ही हे करून पाहिलंत तर तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम होते. 

11. गुलाबपाणी आणि बेकिंग सोडा (Rose Water & Baking Soda)

गुलाबपाणी आणि बेकिंग सोडा हे थोडं वेगळं कॉम्बिनेशन आहे. पण यामुळे तुम्हाला अंडरआर्म्सच्या काळ्या डागांपासून नक्कीच सुटका मिळते. यासाठी तुम्ही 1 चमचा बेकिंग सोडा आणि गुलाबपाणी मिक्स करून घ्या. त्यानंतर तुमच्या काळ्या डागावर हे मिश्रण लावा. 10 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग कोमट पाण्याने हा भाग स्वच्छ करा. चांगल्या परिणामासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करू शकता. यामुळे काळे डाग दूर होण्यास मदत मिळेल. 

12. अॅप्पल साईड व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

अॅप्पल साईड व्हिनेगर वाचल्यानंतर थोडं आश्चर्य वाटू शकतं. पण आपल्या त्वचेवरील छिद्र ओपन करायला आणि काळेपणा घालवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. तुमची डेड स्किन काढून टाकण्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करू शकता. यात असणारे अँटिबॅक्टेरियल तत्व तुम्हाला अधिक चांगला परिणाम मिळवून देतं. अंडरआर्म्समधील काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही अॅप्पल साईड व्हिनेगर आणि पाणी मिक्स करा. त्यात कॉटन बॉल घालून ते पाणी शोषून घ्या आणि काळेपणा असलेल्या ठिकाणी लावा. 10 मिनिट्स तसंच ठेवा. त्यानंतर पुन्हा कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला आठवड्यातून जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करून पाहा. याचा चांगला परिणाम दिसून येईल. 

प्रश्नोत्तरं (FAQ’s)

1. अंडरआर्म्समधील काळेपणा हा परंपरागत येतो का?

तुम्हाला लठ्ठपणा आणि मधुमेह जर परंपरागत मिळाला असेल तर कदाचित हा अंडरआर्म्समधील काळेपणा तुम्हाला परंपरागत मिळू शकतो. पण त्यासाठी तुम्ही आधीपासूनच काळजी घ्यायला हवी.  

2. अंडरआर्म्स काळे होऊ नयेत यासाठी नियमित वॅक्स करणं योग्य आहे का?

शेव्हिंगमुळे अंडरआर्म्स अधिक खरखरीत होतात. पण वॅक्समुळे तुमच्या मुळासकट केस निघून जातात. त्यामुळे काळपटपणा राहात नाही. तुम्ही वॅक्स नियमित करू शकता.  

3. डिओड्रंटचा वापर किती प्रमाणात करावा?

ड्रिओड्रंटमध्ये किती प्रमाणात केमिकल आहे ते तुम्ही जाणून घ्या. सहसा तुम्ही काखेत डिओड्रंटचा वापर करू नये. कारण त्याने काळे डाग अधिक लवकर निर्माण होतात. त्याची काळजी घ्यावी. 

You Might Like This:

चेहऱ्यावरील काळ्या डागांवर उपचार (Treatments For Dark Spots)

Read More From Care