खाणंपिण आणि नाइटलाईफ

स्वयंपाकानंतर हाताला येणारा लसूण-कांद्याचा वास असा करा दूर

Trupti Paradkar  |  Apr 29, 2020
स्वयंपाकानंतर हाताला येणारा लसूण-कांद्याचा वास असा करा दूर

स्वयंपाक कौशल्य शिकताना आपण नेहमीच इतरांच्या अनुभवातून आलेल्या काही सोप्या किचन टिप्स फॉलो करत असतो. स्वयंपाकाची मनापासून आवड असेल तर उत्तम कूक होणं सहज शक्य आहे. बऱ्याचदा स्वयंपाक करताना आपल्याला कांदा कापणे, लसूण सोलणे, मांस-मासे स्वच्छ करणे अशा गोष्टी कराव्या लागतात. मात्र कांदा – लसणाला एक प्रकारचा उग्र वास असतो. स्वयंपाक झाल्यावर हात धुतल्यावरही हा वास निघून जात नाही. मासांहारी लोकांना मांस अथवा मासे स्वच्छ केल्यावर हा त्रास नेहमीच जाणवतो. स्वयंपाक केल्यावर या वासापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नही करता मात्र तरिही तो वास तुमच्या हातावर चिकटून राहतो. ज्यामुळे दिवसभर तुम्हाला हा उग्र वास सहन करावा लागतो. या वासापासून सुटका हवी असेल तर या सोप्या किचन टिप्स जरूर फॉलो करा. 

मीठ –

हात साबणाने धुवून जर कांदा लसणीचा वास जात नसेल  तर तुमचे हात मीठाने धुवा. याचे कारण एकतर मीठ हे नैसर्गिक आहे ज्यामुळे मीठामुळे तुमच्या हाताच्या त्वचेचं यामुळे नुकसान होणार नाही. शिवाय मीठामुळे तुमचे हात निर्जंतूकदेखील होतील. मीठ हातावर लावून पाण्याने ते स्वच्छ केल्यामुळे तुमच्या हाताला येणारा उग्र वास नक्कीच कमी होईल.

बेकींग सोडा –

प्रत्येकाच्या किचनमध्ये खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा असतोच. स्वयंपाकासाठी अनेक पदार्थांमध्ये आपण चिमूटभर सोड्याचा वापर करतो. मात्र हा सोडा वापरून जर हात धुतले तर तुमच्या हाताचा कांदा लसणीचा वास कमी होऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का

कॉफी –

जर तुम्ही कॉफी लव्हर असाल तर तुम्हाला हा उपाय नक्कीच आवडेल. कारण  कॉफीच्या वासानेच मेंदू तरतरीत होतो आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागतं. म्हणूनच हाताचा उग्र वास घालवण्यासाठी हातावर कॉफी चोळून हात स्वच्छ धुवा. ज्यामुळे उग्र आणि घाणेरडा वास जाऊन तुमच्या हाताला कॉफीचा रिफ्रेशिंग वास येऊ लागेल.

Shutterstock

लिंबू –

लिंबाच्या रसात कोणताही उग्र वास दूर करण्याची क्षमता असते. विशेषतः मासे स्वच्छ केल्यावर हात लिंबाच्या पाण्याने स्वच्छ करण्यास मुळीच विसरू नका. कारण त्यामुळे तुमचे हात चांगल्या पद्धतीने स्वच्छ देखील होतील.

टूथपेस्ट –

तुमचे दात स्वच्छ  आणि निरोगी ठेवणारी टूथपेस्टदेखील तुम्ही यासाठी नक्कीच वापरू शकता. यासाठी हातावर थोडी टूथपेस्ट घ्या आणि हात चोळून धुवा. मात्र लक्षात ठेवा हाताची दुर्गंधी घालवण्यासाठी सफेद टूथपेस्टच वापरा जेल टूथपेस्टमुळे तुम्हाला चांगला परिणाम मिळणार नाही. 

या घरातील काही साध्या गोष्टी वापरून तुम्ही तुमच्या हाताला कांदा,लसूण आणि माशांमुळे येणारा वास नक्कीच कमी करू शकता. मात्र या गोष्टी प्रमाणातच वापरा. स्वयंपाक करण्याआधी आणि स्वयंपाक केल्यावर हात स्वच्छ धुणं फार गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुम्ही तुमचे आणि इतरांचे आरोग्य सांभाळू शकता. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

झटपट लसूण सोलण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

लसूण आणि कांद्याच्या सालांचा असा करा उत्तम वापर

किचन एक्सपर्ट बनण्याआधी लक्षात घ्या या 10 गोष्टी

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ