DIY सौंदर्य

पायावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर वापरा सोपा घरगुती उपाय

Dipali Naphade  |  Jun 4, 2022
how-to-get-rid-of-wrinkled-and-dry-feet-in-marathi

आपल्यापैकी अनेक जण आहेत, जे आपल्या चेहऱ्याची उत्तम काळजी घेतात. काही जण तर चेहरा अधिक सुंदर दिसावा म्हणून चेहऱ्यावर एकापेक्षा एक ट्रीटमेंट करू घेतात. पण आपले हात आणि पायाचे सौंदर्य मात्र विसरतात. जर आपण अँटी एजिंग ब्युटी रूटीनबाबत बोलायचं ठरवलं तर असे कितीतरी DIY उपाय आणि केमिकल ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. मात्र हात आणि पायाकडे सगळीकडे दुर्लक्षच होतं. पण तुम्हाला माहीत आहे का? वाढत्या वयाचा परिणाम सर्वात अधिक मान, हात आणि पायांवर दिसून येतो. तुम्ही सुरूवातीपासूनच लक्ष दिलं नाही तर तुमचे पाय हे तुमच्या चेहऱ्यापेक्षा पाच वर्ष तरी किमान अधिक म्हातारे दिसू शकतात. आम्ही तुम्हाला काही सोपे हॅक्स सांगत आहोत, जे तुम्हाला यासाठी मदत करू शकतील. 

पायावरील सुरकुत्या काढण्यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies To Remove Feet Wrinkles)

पायावरील सुरकुत्या हटविण्यासाठी तुम्ही केळ्याचा वापर (Banana Use) करू शकता. केळ्यामध्ये पोटॅशियम अधिक असते आणि केळ्याला नैसर्गिक बोटोक्स मानले जाते. याचा त्वचेची काळजी घेण्यासाठी अत्यंत फायदा होतो. पायाच्या सुरकुत्या काढण्यासाठीही पिकलेल्या केळ्याचा जास्त फायदा होतो. पायांवरील सुरकुत्या या कोरड्या त्वचेमुळे पडतात आणि हे टाचांना भेगा पडल्या असतील अथवा पायाची त्वचा कोरडी पडली असेल तरीही अत्यंत फायदेशीर ठरते. हे एक्सफोलिएशनसह तुमच्या पायाच्या त्वचेचे पोषणही करेल. 

साहित्य 

हे सर्व साहित्य एकत्र करा आणि याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट तुम्ही पायाला लावा आणि प्लास्टिकने पाय बांधा. साधारण 10-15 मिनिट्स तसंच राहू द्या आणि मग एक्सफोलिएशनप्रमाणे हे काढा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा वापरू शकता. तसं तर हे तुम्ही केवळ केळं आणि मधाचे मिक्स्चर घेऊनही पायावर वापरू शकता. पण केवळ कोरड्या पायांची समस्या असेल तर तुम्ही हे मिश्रण वापरा. 

हा पॅक तुमच्या पायांच्या अनेक समस्यांवर प्रभावी ठरतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये जे साहित्य वापरण्यात येते, ते सर्व घरात असते. केवळ 10 रुपयाच्या खर्चात तुम्ही तुमच्या पायांची काळजी घेऊ शकता. 

पायाला सुरकुत्या आल्यास, अन्य घरगुती उपाय ज्यात होतील केवळ 10 रूपये खर्च 

पायाला सुरकुत्या आल्यास, तुम्ही घरातील अशा काही नैसर्गिक घटकांचा वापर करू शकता, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. याशिवाय याचा खर्चही अधिक असणार नाही. 

1. कोरफड जेलचा करा वापर (Use Of Aloe Vera)

सौंदर्यासाठी कोरफडचे अनेक फायदे होतात. रोज तुम्ही पायांवर कोरफड जेलचा वापर करा. ज्यामुळे तुमच्या त्वचेला मॉईस्चराईजर मिळते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे पायाला लावा आणि सकाळी उठून स्वच्छ करा. तुम्हाला रात्रभर लाऊन ठेवायचे नसेल तर तुम्ही 15-20 मिनिट्स तरी किमान रोज हे पायांना लावा. पायांना हायड्रेट करण्यास याची खूप जास्त मदत होते. 

2. टॉमेटोचा वापर (Use Of Tomato)

तुमच्या पायांची त्वचा अधिक कोरडी झाली असेल आणि त्वचा निघत असेल तर त्वचेला हायड्रेशनसह एक्सफोलिएशनचीही गरज आहे. यासाठी तुम्हाला टॉमेटोचा फायदा करून घेता येऊ शकतो. टॉमेटो अर्धा कापा आणि त्यात थोडीशी साखर मिक्स करून हे मिश्रण पायांवर घासा. हे पायांवरील डेड स्किन घालविण्यासाठी मदत करते आणि पायांवरील सुरकुत्याही कमी करते. 

3. फूट सोक (Foot Soak)

कोमट पाण्यात तुम्ही काही थेंब ऑलिव्ह ऑईल, थोडासा शँपू, थोडेसे सी – सॉल्ट अथवा रॉक सॉल्ट घाला आणि या पाण्यात पाय थोडा ठेवा आणि मग स्वच्छ करा. त्यानंतर पाण्याने धुवा आणि मग मॉईस्चराईज करा. यामुळे तुमच्या पायांवर सुरकुत्या येणार नाहीत. 

टीप – हे घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर आहेत आणि या उपयांनी पायांचे सौंदर्यही वाढते. मात्र तुम्हाला संवेदनशील त्वचेसाठी समस्या असेल अथवा तुम्हाला यापैकी कोणत्याही पदार्थांची अलर्जी असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचा वापर करावा. अनेकदा पायांवर आलेला फंगस कळत नाही, त्यामुळे कोणत्याही पदार्थांचा वापर करण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट नक्की करून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य