सुंदर लांब, चमकदार केस सगळ्यांना हवे असतात. केसांची निगा राखण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करुन पाहायला आपल्या सगळ्यांना आवडतात. पण काही उपाय हे सगळ्यांसाठीच फायद्याचे ठरतात असे नाही. केसांचा विचार करताना फक्त वरवरुन सौंदर्य राखण्याचे उपायच कामी येतात असे नाही तर काही उपाय असे असतात जे केल्यानंतर तुमच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. ते केसांमध्येही झालेले जाणवतात. केसांची ठराविक वाढ झाल्यानंतर तुमच्या केसांची वाढ होत नसेल तर काही तरी गोष्टी तुमच्या केसांच्य़ा वाढीला बाधा आणत आहेत हे नक्की! केसांची वाढ चांगली होण्यासाठी जाणून घेऊया सोपे उपाय
शॅम्पूच्या वापरानंतर तुमचेही गळतात का केस
केसांसाठीचा आहार
केस चांगले राहण्यासाठी चांगला आहार घेणेही तितकेच महत्वाचे आहे. जर तुमचा आहार चांगला असेल तर तुम्हाला केसगळतीचा त्रास शक्यतो होत नाही. पण जर तुमच्या आहारात खूप जंक फूड असतील तर मात्र त्याचा त्रास होऊ शकतो. जंक फूड तुमच्या पोटाची यंत्रणा बिघडवतो. पोटाची यंत्रणा बिघडली की, त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होतो. ज्या प्रमाणे तुमचे पोट साफ नसेल तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. अगदी त्याचप्रमाणे अपुऱ्या आणि पोषक नसलेल्या आहारामुळे तुमच्या केसांची गळती सुरु होते. अशावेळी आहारात व्हिटॅमिन्सनी युक्त फळ, पाणी, ज्यूस, फायबर युक्त पदार्थ, अंडी, प्रोटीन्स यांचा समावेश असून द्या. यामुळे तुमचे केस मजबूत होतात. शिवाय केसांची वाढ ही जोमाने होण्यास मदत मिळते.सकाळी उठल्यानंतर अॅलोवेरा ज्यूस किंवा गव्हांकुर प्यायल्यामुळे शरीर डिटॉक्स होते. शरीरातून नको असलेले घटक बाहेर फेकले जातात. पण त्याचा फायदा केसांना फार उत्तम होतो. त्यामुळे आजच तुमच्या आहारात बदल करा.
केसांची काळजी
केसांची काळजी ही देखील तितकीच महत्वाची आहे. केसांची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं असा विचार करत असाल तर केस धुण्यापासून ते केस विंचरण्यापर्यंत तुम्ही काही नियमांचे पालन करायला हवे. केसांची काळजी घेण्यासाठी नेमक्या काय गोष्टी करायला हव्यात ते जाणून घेऊया.
- केस आठवड्यातून किमान दोन वेळा धुवा. केस धुतल्यामुळे केसांच्या पोअर्समध्ये अडकलेली घाण, धूळ निघण्यास मदत मिळते. त्यामुळे केसांच्या पोअर्समध्ये साचून सुरु राहणारी केसगळती कमी होण्यास मदत मिळते.
- केस ओले असताना विंचरु नका. केस अधिक जोरात विंचरल्यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. केस तुटल्यामुळेही केसांची वाढ खुंटते
- केसांना तेल लावत असाल तर केस हे जास्त तासांसाठी केसांमध्ये ठेऊ नका. कारण त्यामुळेही केसांवर कोंडा तयार होण्याची शक्यता असते.
- दोन ते तीन महिन्यातून एकदा तरी केस ट्रिम करा म्हणजे केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
- महिन्यातून एकदा तरी केसांना हेअरमास्क लावा. त्यामुळे केसांची मूळ शांत होतात आणि केसांच्या वाढीला प्रेरणा मिळते.
अशाप्रकारे केसांची काळजी घेतली तर नक्कीच केसांची वाढ चांगली होण्यास मदत मिळेल.