Care

केसांचे परफ्युम वापरुन घालवा केसांची दुर्गंधी

Leenal Gawade  |  Oct 27, 2020
केसांचे परफ्युम वापरुन घालवा केसांची दुर्गंधी

केसांच्या सगळ्याच गोष्टीबाबत आपण फारच आग्रही असतो. केस स्वच्छ, चांगले आणि निरोगी राहावे असे आपल्या सगळ्यांना कायमच वाटते. पण केसांची काळजी घेणे हे काही सोपे काम नाही. कधी कधी काही कारणास्तव आपल्याला केसांची योग्य ती काळजी घेता येत नाही. अशावेळी केसांमधून दुर्गंधी येणे हे अगदी स्वाभाविक असते. योग्यवेळी केस धुतले नाही तर केसांना घामामुळे दुर्गंधी येते. प्रवासात असताना किंवा घराबाहेर जाताना तुम्हाला केस धुवायला वेळ मिळाला नसेल अशावेळी तुम्ही केसांची दुर्गंधी घालवण्यासाठी हेअर परफ्युमचा वापर करु शकता. चला तर जाणून घेऊया या हेअर परफ्युमचे महत्व आणि त्यामध्ये नेमकं काय असतं?

कंगव्यापेक्षा केसांसाठी का फायदेशीर आहे हेअर ब्रश… जाणून घ्या

हेअर परफ्युम म्हणजे काय?

Instagram

ज्या प्रमाणे तुमच्या शरीराच्या घामाची दुर्गंधी काढण्यासाठी बॉडी मिस्ट किंवा परफ्युम वापरले जाते. अगदी तसेच केसांसाठी खास हेअर मिस्ट बनवले जाते. हेअर मिस्टमध्ये केसांसाठी आवश्यक असे घटक असतात. हेअर मिस्टचा वापर केल्यानंतर केसांना असलेली दुर्गंधी निघून जाण्यास मदत मिळते. हेअर परफ्युमजचा उपयोग तुम्हाला केसांची दुर्गंधी घालवण्यास मदत करतो. 

काळ्याभोर दाट केसांसाठी वरदान ‘आवळा’ (Amla), जाणून घेऊया केसांच्या प्रत्येक समस्येवरील घरगुती उपाय (Benefits Of Amla For Hair)

हेअर परफ्युमचे फायदे- तोटे

हेअर परफ्युमचा वापर करत असाल तर तुम्हाला ते वापरण्याचे फायदे आणि तोटे देखील माहीत हवे. जर तुम्ही त्याचे योग्य फायदे जाणून घेतले तर तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल. 

फायदा : 

तोटे:

सुंदर केसांसाठी या 8 क्लुप्त्या वापरा आणि बदला तुमचं जग (Hair Care Tips In Marathi)

असा वापरा हेअर परफ्युम

Instagram

 हेअर परफ्युमचा वापर करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्या. 

  1. केस मोकळे करुन घ्या. जर तुम्ही बाहेर असाल तर  केस मोकळे करुन केस वाळवून घ्या. त्यावर हेअर परफ्युम लावा.
  2.  हेअर परफ्युम निवडताना तो फार तीव्र सुगंधाचा निवडू नका. कारण त्यामुळे तुमच्या केसांना तीव्र वास येऊ शकतो. 
  3. केसांना हेअर परफ्युम लावताना एकाच ठिकाणी तो जास्त लावू नका. कारण जर तुम्ही तो केसांजवळ जास्त लावत असाल तर  तुमचे केस कोरडे होऊ शकतात. 
  4. केसांवर सतत याचा प्रयोग करु नका. हेअर परफ्युम केसावर अधिक काळासाठी टिकते. 

 

 

जर तुम्ही हेअर परफ्युमच्या शोधात असाल तर आम्ही हे हेअर परफ्युम तुमच्यासाठी निवडले आहेत. ज्याचा वापर करुन तुम्ही केसांची दुर्गंधी घालवू शकता. 

Read More From Care