अॅक्सेसरीज

अस्सल मोती कसे ओळखावे, अशी करा मोत्याची पारख

Trupti Paradkar  |  Oct 21, 2021
How to identify real pearl tips in Marathi

नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात… असं म्हणत कवी स्त्रीच्या सौंदर्याचं कौतुक करतो. कारण महिलांच्या सौंदर्यामध्ये मोत्याचे दागिने अधिकच भर घालतात. मोत्याचे दागिने नाजूक तर असतातच शिवाय ते आरोग्यासाठीदेखील लाभदायक ठरतात. मोत्यामध्ये थंडावा आणणारे गुणधर्म असल्यामुळे तापट स्वभावाच्या लोकांना खास मोती धारण करण्याचा सल्ला दिला जातो. मोत्याचे दागिने सध्या ट्रेंडमध्ये असल्यामुळे पारंपरिक असो वा वेस्टर्न कोणत्याही पेहरावासोबत ते शोभून दिसतात. पण मोती खूप महाग असल्यामुळे तुम्हाला ते खरेदी करण्यापूर्वा मोत्याची पारख असणं गरजेचं आहे. अस्सल मोती आणि बनावट मोती यामध्ये नेमका काय फरक असतो ते जाणून घ्या आणि मगच मोती खरेदी करा.

मोत्यांच्या दागिन्यांची घरच्या घरी घ्या सोप्या पद्धतीने काळजी

कसे ओळखावे अस्सल मोती 

How to identify real pearl tips in Marathi

मोती हे एक मौल्यवान रत्न असल्यामुळे दिवसेंदिवस त्याची मागणी वाढत आहे. सहाजिकच मागणीचा पूरवठा करण्यासाठी बाजारात अस्सल मोत्यासोबत बनावट मोत्याचे दागिनेही विकले जातात. बऱ्याचदा गिऱ्हाईकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांना अस्सल मोत्याच्या भावात बनावट मोती विकून त्यांची फसवणूक केली जाते. यासाठी मोती खरेदी करण्यापूर्वी खरे मोती आणि खोटे मोती ओळखण्याचे कौशल्य तुमच्याजवळ असायला हवे. मोत्याच्या रंग, आकार, चमक आणि इतर काही लक्षणांवरून तुम्ही अस्सल मोती ओळखू शकता. यासाठी फॉलो करा या टिप्स

नववधूसाठी ‘पर्ल पर्ल’ दिल के पास (Pearl Jewellery Designs In Marathi)

मोत्याचा रंग 

How to identify real pearl tips in Marathi

अस्सल मोत्याला एक नैसर्गिक चमक असते. खरे मोती कधीच पांढरे शुभ्र नसतात. त्यांना एक प्रकारचा गुलाबी छटा असलेला रंग असतो. प्लास्टिकचा वापर करून पांढरेशुभ्र बनावट मोती अस्सल म्हणून बाजारात विकले जातात. पण जर तुम्हाला खरे मोती हवे असतील तर त्यांचा रंग नीट पाहून मगच विकत घ्या. 

मोत्याचे तापमान 

खऱ्या मोत्याची आणखी एक ओळख म्हणजे हे मोती तुमच्या शरीराच्या तापमानानुसार बदलतात. मोत्याला हात लावताच ते तुम्हाला अगदी थंड लागतात मात्र जसे तुम्ही त्यांना हाताळू लागता तुमच्या शरीरातील तापमानानुसार ते हळूहळू गरम लागू लागतात. मात्र जर मोती खोटे असतील तर ते थंडही लागत नाहीत आणि तुमच्या हाताळण्यामुळे गरमही होत नाहीत.

अशी घ्या मोत्यांच्या दागिन्यांची काळजी How to take care of Pearl Jewellery

मोत्याचा आकार

मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे. अस्सल मोती शिंपल्यामध्ये निर्माण होतो त्यामुळे त्याचा आकार कधीच एकसमान नसतो. शिवाय अस्सल मोती पूर्ण गोलाकारही नसतात. त्यामुळे जर तुम्हाला अस्सल मोती म्हणून कोणी पूर्ण गोल आकाराचे एकसमान मोती विकत असेल तर तुमची फसवणूक होत आहे हे समजून घ्या.

मोत्याचे वजन

मोती जर खरे असतील तर ते वजनाला नेहमी जड असतील हे लक्षात ठेवा. यासाठी मोती तळहातावप घेऊन ते तोलून पाहा. ज्यामुळे तुम्हाला मोत्याचे वजन जाणवेल. खोटे मोती मात्र वजनाला खूपच हलके असतात ज्यामुळे तुम्हाला त्यांची ओळख लगेच पटू शकते.

मोती ओखळण्याची आणखी एक युक्ती

आम्ही सांगितलेल्या या युक्ती वापरून जर तुम्हाला मोती ओळखता आला नाही तर हा आणखी एक उपाय तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. मोती दिवसभर म्हणजे जवळजवळ 24 तास गोमूत्रामध्ये बुडवून ठेवा. जर त्या मोत्याचा रंग बदलला तर मोती नकली आहे आणि मोत्याचा रंग कायम राहिला तर मोती अस्सल आहे हे ओळखा. 

Read More From अॅक्सेसरीज