दृष्टी उत्तम ठेवण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी अनेक उपाययोजना करता येतील. निरोगी जीवनशैली, पुरेशी झोप, संतुलित आहार, चांगले सनग्लासेस वापरून आणि व्यसनपासून दूर राहून तुम्ही डोळ्यांची योग्य निगा नक्कीच राहू शकता. डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय म्हणून काही सोप्या आणि सहज अशा टिप्स जरूर फॉलो करा. ज्यामुळे तुम्हाला लवकर चष्मा लागणार नाही आणि दृष्टी कायम चांगली राहील. समजा तुम्हाला काही डोळ्यांच्या अथवा दृष्टीबाबत समस्या असतील तर त्यादेखील या नैसर्गिक उपायांनी हळूहळू कमी होत जातील.
Table of Contents
- संतुलित आहार घ्या (Eat Balanced Diet)
- नियमित डोळ्यांची तपासणी करा (Obtain Regular Eye Exams)
- स्क्रिनपासून काही ठराविक वेळेमध्ये ब्रेक घ्या (Take Breaks From Screen Time)
- पुरेशी झोप घ्या (Get Enough Sleep)
- डोळ्यांचे व्यायाम करा (Exercise Your Eyes)
- सुर्यकिरणांपासून डोळ्यांचे रक्षण करा (Protect Your Eyes From The Sun)
- धुम्रपान करणे टाळा (Don’t Smoke)
- योग्य स्वच्छता राखा (Practice Good Hygiene)
- हायड्रेट राहा (Stay Hydrated)
- फॅमिली हिस्ट्री जाणून घ्या (Learn Your Family History)
- दृष्टी सुधारण्याबाबत मनात असलेले काही निवडक प्रश्न – FAQ’s
संतुलित आहार घ्या (Eat Balanced Diet)
निरोगी शरीराप्रमाणेच उत्तम दृष्टीसाठीही तुम्ही नियमित संतुलित आणि पोषक आहार घ्यायला हवा. डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय आहारात भरपूर अॅंटि ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचा समावेश असायला हवा. हिरव्या पालेभाज्या, रंगीत फळे असे पदार्थ तुमच्या डोळ्यांचे आरोग्य वाढवण्यासाठी मदत करतात. गाजर, लाल भोपळी मिरची, ब्रोकोली, पालक, स्टॉबेरी, बटाटा, आंबट फळे यामधून तुमच्या शरीराला व्हिटॅमिन ए, सी , झिंक आणि अॅंटि ऑक्सिडंट्स मिळतात. यासाठी असा आहार घ्या ज्यामध्ये हे सर्व पोषक घटक असतील त्यामुळे तुमची दृष्टी तर तेज होईलच शिवाय भविष्यात लवकच चष्मादेखील लावावा लागणार नाही. त्याचप्रमाणे डोळयाचे दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय घरच्या घरी देखील करू शकता.
Shutterstock
नियमित डोळ्यांची तपासणी करा (Obtain Regular Eye Exams)
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखायचं असेल आणि दृष्टी कायम चांगली हवी असेल तर नियमित आय चेकअप करायला हवं. डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय हा सोपा आणि चांगला मार्ग आहे. वर्षातून एकदा आपण जेव्हा बॉडी हेल्थ चेकअप करतो तेव्हा डोळे देखील चांगल्या नेत्र तज्ञांकडून तपासून घ्यावेत. कारण यामुळे जर तुमच्या डोळे अथवा दृष्टीमध्ये काही समस्या असेल तर ती लवकर समजून त्यावर लवकर उपचार केले जातील. फार उशीर झाल्यास या समस्या बळावून डोळे दगावण्याची शक्यता असते. यासाठी नियमित आय चेकअप हे तुमच्या वार्षिक चेकलिस्टमध्ये अवश्य समाविष्ठ करा.
स्क्रिनपासून काही ठराविक वेळेमध्ये ब्रेक घ्या (Take Breaks From Screen Time)
आजकालच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात सतत लॅपटॉप अथवा मोबाईलवर काम करणं ही काळाची गरज झाली आहे. मात्र कंप्युटर, लॅपटॉप, मोबाईल, टिव्ही अशा इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समधून येणाऱ्या प्रकाश किरणांचा तुमच्या नाजूक डोळ्यांवर वाईट परिणाम होत असतो. यासाठीच जरी तुम्हाला सतत काम करणं गरजेचं असलं तरी काही ठराविक काळानंतर छोटा ब्रेक घेण्यासाठी सवय स्वतःला लावा. तज्ञ असं सांगतात की तुम्ही बराच काळ कंम्युटरवर काम करत असाल तर तुम्हाला दर वीस मिनिटांनी कमीत कमी वीस सेंकदासाठी स्क्रिनपासून दूर जवळजवळ वीस फूट अंतराकडे पाहून एक मिनी ब्रेक घेता यायला हवा. ज्यामुळे तुमच्या डोळ्यावर या प्रकाश किरणांचा ताण येणार नाही. असं न केल्यास तुम्हाला सतत डोळे दुखणं, डोळे चुरचुरणं अथवा डोळे लाल होण्याचा त्रास जाणवू शकतो. अगदीच शक्य नसेल तर कमीत कमी वीस मिनिटांनी दृष्टी लॅपटॉपपासून दूर न्या आणि डोळे काही सेंकदासाठी उघडझाप करा. ज्यामुळे डोळ्यांना व्यायाम मिळेल आणि तुम्हाला बरे वाटेल.
पुरेशी झोप घ्या (Get Enough Sleep)
अती जागरण अथवा पुरेशी झोप न मिळाल्यास तुमचे डोळे कोरडे आणि निस्तेज होतात, डोळ्यांवर ताण आल्यामुळे तुमचे डोके दुखू लागते, डोळ्यांना आराम न मिळाल्यामुळे डार्क सर्कल्स दिसू लागतात. डोळ्यांना ऑक्सिजनचा पूरवठा कमी होतो. जर तुमचे झोपेचे सायकल नियमित नसेल तर याचा परिणाम हळूहळू तुमच्या डोळ्यांवर आणि पर्यायाने आरोग्यावर होतो. यासाठी डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार आवश्यक आहे. निरोगी जीवनशैलीसाठी कमीत कमी आठ तास निवांत झोप शरीराला गरजेची असते.
डोळ्यांचे व्यायाम करा (Exercise Your Eyes)
निरोगी आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी नियमित व्यायाम, योगासने आणि मेडिटेशन केल्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. व्यायामामुळे शरीराचे रक्ताभिसरण सुधारते आणि ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्याचा हा एक सोपा आणि योग्य मार्ग आहे. डोळ्यांचे काही व्यायाम तुम्ही तुमचे काम करता करता मधल्या ब्रेकमध्येदेखील करू शकता. ज्यामुळे तुम्हाला पटकन फ्रेश वाटतं आणि काम करण्याचा उत्साह वाढतो. यासाठी अधुनमधुन डोळे क्लॉक वाईज आणि अॅंटि क्लॉक वाईल गोलाकार फिरवा, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करा. थोडावेळ वर आणि खाली बघण्याचा व्यायाम करा.
सुर्यकिरणांपासून डोळ्यांचे रक्षण करा (Protect Your Eyes From The Sun)
प्रखर सुर्यकिरणांमधील अतिनिल किरण तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक असतात. अती कडक उन्हात फिरण्यामुळे तुमचे डोळे लाल होतात, डोळ्यांना खाज येते. यासाठीच अशा प्रखर सुर्य प्रकाशात फिरणे टाळा. उन्हात प्रवास करणे गरजेचं असेल तर चांगल्या सनग्लासेसचा वापर करा. टोपी, स्कार्फ आणि सनग्लासेस याने तुमचे डोके पुर्ण झाका आणि मगच प्रवास करा. बाजारात यासाठी युव्ही प्रोटेक्शन देणारे खास सनग्लासेस तयार केले जातात.
धुम्रपान करणे टाळा (Don’t Smoke)
धुम्रपान करणं हे संपूर्ण आरोग्यासाठीच हानिकारक असतं. डोळ्यांच्या आरोग्यासााठी धम्रपान मुळीच हितकारक नाही. अती धुम्रपानामुळे तुमच्या डोळ्यांच्या आतील नाजूक नसांचे नुकसान होते. वयाच्या आधीच यामुळे तुम्हाला मोतीबिंदू, काचबिंदू सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. दृष्टीवर वाईट परिणाम होऊन अंधुक दिसू लागते. यासाठीच धुम्रपान करणे तातडीने सोडून द्या. कारण डोळ्यांचे आरोग्य बिघडले तर ते पुन्हा पुर्ववत होणं नक्कीच शक्य नसतं. डोळे हे अतिशय अनमोल आहेत. परमेश्वराने दिलेल्या या अमुल्य भेटीचा आदर राखा आणि योग्य वेळीच व्यसनापासून दूर राहा. सतत धुम्रपान केल्यामुळे निर्माण होणारी अंडरआय बॅगची समस्या तुम्ही काही घरगुती उपाय करून आणि धुम्रपान करणे सोडून कमी करू शकता.
योग्य स्वच्छता राखा (Practice Good Hygiene)
स्वच्छतेचे योग्य् नियम पाळुन तुम्ही तुमचे आरोग्य नक्कीच सुधारू शकता. यासाठी वेळच्या वेळी हात आणि चेहरा धुणं गरजेचं आहे. स्वच्छता राखण्यामुळे आजारपणे कमी येतात. वारंवार हात डोळ्यांवर चोळू नकादोन वेळ स्वच्छ अंघोळ करण्यासोबतच हात, चेहरा आणि अधुनमधुन डोळे स्वच्छ केल्याने इनफेक्शन टाळता येतं. त्याचप्रमाणे मेकअप केल्यावर अथवा डोळ्यांवर कोणेही केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधन लावल्यानंतर ते योग्य पद्धतीने काढणे खूप गरजेचं आहे. ज्यामुळे तुमचे डोळे खराब होत नाहीत.
हायड्रेट राहा (Stay Hydrated)
पाणी हे जीवन आहे. मानवी शरीर हे पंच्याहत्तर टक्के पाण्यापासून तयार झालेले आहे. त्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत आणि योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला सतत आणि मुबलक पाण्याची गरज असते. त्याचप्रमाणे डोळ्यांनाही हायड्रेट राहण्यासाठी पाण्याची गरज असते. डिहायड्रेशन झाल्यास त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या डोळ्यांवर दिसू लागतो. डिहायड्रेशनमुळे डोळे खोलवर आत जातात आणि निस्तेज दिसू लागतात. बऱ्याचदा डोळ्यांना योग्य रक्तपुरवठा न झाल्यास तुमच्या डोळ्याची पापणी फडफडू लागते. यासाठीच नियमित पुरेसे पाणी प्या. डोळ्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी चेहरा साध्या पाण्याने धुवा. चेहरा धुताना डोळे स्वच्छ केले जातील याची काळजी घ्या. आहारात भरपूर फळे आणि पालेभाज्यांचा समावेश केल्यामुळेदेखील तुम्ही हायड्रेट राहू शकता.
फॅमिली हिस्ट्री जाणून घ्या (Learn Your Family History)
काही आजार हे अनुवंशिक असतात. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबातील कोणाला डोळ्यांच्या समस्या असतील तर अनुवंशिकतेने तुम्हालाही हा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या आईवडीलांना जर डोळ्यांची अथवा दृष्टीबाबत काही समस्या असेल तर त्याबाबत सावध राहून तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
दृष्टी सुधारण्याबाबत मनात असलेले काही निवडक प्रश्न – FAQ’s
डोळ्यांसाठी ज्या फळांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असेल अशी फळे खावीत. साधारणपणे पपई, आंबा, जर्दाळू अशी रंगीत फळे दृष्टी सुधारण्यासाठी खाण्याचा सल्ला दिला जातो.
दूधामध्ये तुमच्या शरीराला पोषण देणारे घटक असतात. त्यामुळे ते डोळ्यांसाठीदेखील फायदेशीरच ठरते. नियमित दूध पिण्यामुळे मोतिबिंदू, काचबिंदू सारख्या समस्यांपासून बचाव होतो. मात्र यासाठी लो फॅट दूधाचा आहारात समावेश करा.
डोळ्यांसाठी नारळाचे तेल नियमित लावणे फायदेशीर ठरू शकते. मात्र ते डोळ्यात घातल्यामुळे डोळे फार चुरचुरतात.यासाठी डोळ्यांच्या वर आणि खालच्या भागावर लावून त्यावर हलक्या हाताने मसाज करावा. डोळ्यात तेल घालायचं असेल तर ते शुद्ध आहे याची खात्री करून घ्यावी अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
फोटोसौजन्य – Pexels