Care

DIY : फक्त तीन गोष्टींपासून असा तयार करा होममेड हेअर स्प्रे

Trupti Paradkar  |  Nov 2, 2020
DIY : फक्त तीन गोष्टींपासून असा तयार करा होममेड हेअर स्प्रे


एखादं ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करताना तुम्ही काय विचार करता ? त्या प्रॉडक्टमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक घटक असावेत किंवा केमिकल्स कमी असावेत. बरोबर ना, कारण केमिकल्समुळे तुमच्या त्वचेचं आणि केसांचं नुकसान होऊ शकतं. पण बाजारात विकत मिळणरे ब्युटी प्रॉडक्ट पूर्णपणे केमिकलमुक्त असतीलच याची खात्री नक्कीच देता येत नाही. यासाठीच तुम्हाला हवे असलेले घटक वापरून घरीच ब्युटी प्रॉडक्ट वापरणे नेहमीच सोयीचे असते. शिवाय यामुळे तुमच्या ब्युटी प्रॉडक्टवरील खर्चही आटोक्यात राहतो. अशा प्रकारे फक्त फेसपॅक किंवा वॅक्सच घरी करता येते असं नाही. तु्म्ही तुमच्या केसांची निगा राखण्यासाठी हेअर स्प्रेदेखील घरीच तयार करू शकता.

Shutterstock

तुमच्या केसांसाठी असा तयार करा हेअर स्प्रे

केसांसाठी होममेड हेअर स्प्रे तयार करणं अतिशय सोपं आहे. 

साहित्य –

इतर साहित्य –

कसा तयार कराल हेअर स्प्रे

हेअर स्प्रे तयार करताना या गोष्टी ठेवा लक्षात –

हेअर स्प्रे तयार करणं अतिशय सोपं आहे. तुम्ही या मिश्रणामध्ये रोझमेरी इसेंशिअलच्या ऐवजी तुमच्या आवडीचे कोणतेही इसेंशिअल ऑईल वापरू शकता. जर तुमचे केस चिकट आणि तेलकट असतील तर तुम्ही यासाठी टी ट्री ऑईल, लव्हेंडर ऑईल वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या स्काल्पवर येणारी खाज नक्कीच कमी होईल. विशेष म्हणजे या होममेड हेअर स्प्रेमध्ये कोणतेही केमिकल वापरण्यात येत नाही. शिवाय ते पॅरोबेन फ्री आणि प्रक्रिया मुक्त आहे. या हेअर स्प्रेमध्ये फक्त नैसर्गिक घटक असल्यामुळे हा स्प्रे फक्त एक आठवडाभर टिकू शकतो. आठ ते दहा दिवसांनी तो खराब होऊन त्यातून घाणेरडा वास येऊ लागतो. आठवडाभरदेखील वापर झाल्यावर लगेचच तो फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला  आठवडाभर पुरेल इतकंच मिश्रण तयार करा. हा हेअर स्प्रे तयार करणं अतिशय सोपं आणि कमी खर्चाचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या  सोयीनुसार हेअर स्प्रे अगदी पटकन तयार करू शकता. 


हा हेअर स्प्रे करायला सोपा आणि बिन खर्चाचा असला तरी याचे फायदे नक्कीच जास्त आहेत. संत्र्याचा वापर केल्यामुळे तुमच्या केसांवर याचा चांगला परिणाम होतो आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते. केसांना चांगला सुंगध येण्यासाठी आणि केसांचे आरोग्य वाढण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त हेअर स्प्रे वापरण्यापेक्षा हा नक्कीच सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. 

हेअर स्प्रे तयार करताना वस्तू आणि हात सॅनिटाईझ करण्यासाठी मायग्लॅमचे हे वाईपआऊट प्रॉडक्ट वापरा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

अधिक वाचा –

केसांना कापूर तेल लावण्याचे हे आहेत फायदे, हेअर केअर मध्ये करा समावेश

केस अधिक चमकदार करण्यासाठी करा कोथिंबीरचा उपयोग

सुंदर केसांसाठी वापरा बेस्ट हर्बल शॅम्पू (Best Herbal Shampoo In Marathi)

Read More From Care