खाणंपिण आणि नाइटलाईफ

बेसन नसेल तरीही बनतील कुरकुरीत भजी, जाणून घ्या काय वापरावे

Dipali Naphade  |  Sep 22, 2021
bhajiya

पाऊस आणि गरमागरम भजी हे समीकरण कायमच आपल्याला हवंहवंसं वाटतं. पण भजी हा असा पदार्थ आहे जो आपण कधीही खाऊ शकतो. भजीमध्ये नक्की काय साहित्य घालतात असा प्रश्न कोणी विचारला तर सर्वात पहिल्यांदा डोक्यात येतो तो पदार्थ म्हणजे बेसन (Besan). कांदा, बटाटा, मिरची, पालक, दोडके, वांगं, कोबी अशा अनेक भजी आपण करत असतो. पण भजी अचानक करायची झाली आणि घरात बेसन शिल्लकच नसले तर तुम्ही भांबावून जाऊ नका. बेसनाशिवायदेखील तुम्ही घरच्या घरी कुरकुरीत भजी करू शकता. यासाठी नक्की काय वापरायचे आणि कशा प्रकारे भजी बनवायची याची सगळी माहिती या लेखातून तुम्हाला मिळेल. भजी म्हटली की आपल्याला बेसन वापरायची सवय लागली आहे. बेसनाशिवाय भजी तयार होऊ शकतात हे आपण मान्यच करत नाही. पण तुम्ही वेगवेगळे पदार्थ वापरून भजी बनवू शकता. जाणून घेऊया कशी बनवावी बेसनाशिवाय कुरकुरीत भजी. 

अधिक वाचा – बटाटा वडा रेसिपी मराठीतून, विविध पद्धतीने बनवा बटाटावडा (Batata Vada Recipe In Marathi)

बेसनच्या जागी वापरा हे घटक

बेसनाच्या जागी भजी बनविण्यासाठी तुम्ही अनेक घटक वापरू शकता. या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला धावपळ करायची अजिबातच गरज नाही. 

गव्हाचे पीठ – गव्हाच्या पिठानेदेखील भजी तयार होऊ शकतात. हे वाचून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. तुम्ही गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ आणि 2 चमचे रवा मिक्स करा आणि भिजवा. या पिठात तुम्ही भजी घोळवा आणि तळा. चवीला अप्रतिम आणि कुरकुरीत होतात.

रवा – रव्याचा वापर तुम्ही करणार असाल तर तुम्ही भजीसाठी 4-5 मोठे चमचे रवा घ्या. यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ मिक्स करा आणि इतर साहित्य अर्थात पाणी, मीठ आणि मिरची, कांदा घाला आणि भजी घोळवून तळा. बेसनाच्या पिठापेक्षा ही भजी अधिक कुरकुरीत लागतात. रव्यामुळे याचा जास्त कुरकुरीतपणा येतो. 

तांदळाचे पीठ – तुम्ही केवळ तांदळाच्या पिठाचा वापर करूनही भजी त्यामध्ये घोळवू शकता. फक्त तांदळाचे पीठ भिजवताना लक्षात घ्या की पाण्याचा वापर करण्यापेक्षा तुम्ही ताकाचा वापर करा. तसंच तांदळाच्या पिठामध्ये भजी तळण्याचा एकच तोटा आहे की, यामध्ये तेल जास्त प्रमाणात आत शिरते. त्यामुळे तुम्ही भजी तळल्यानंतर टिश्यू पेपरवरच ती काढा आणि अतिरिक्त तेल काढून घ्या आणि मग खा.

शिंगाडा पीठ – तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शिंगाडा पिठाचादेखील वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही 1 कप शिंगाडा पीठ घ्या. तसंच हे पीठ अतिशय पातळ भिजवू नका. मध्यम भिजवा आणि मग भजीचे सारण घेऊन घोळवून तळा.

उडदाची डाळ – उडदाच्या डाळीची पेस्ट भजीसाठी बॅटरचे काम करते. आपल्याला हवं त्या जाडसर अथवा पातळ भजीनुसार तुम्ही हे भिजवून घ्या. पण अतिपातळ अथवा अति जाड बॅटर बनवू नका. अन्यथा या भजीमध्ये जास्त तेल जाऊ शकते आणि चव बिघडू शकते. 

मूगडाळ – मूगडाळ भजी तर चवीला अप्रतिमच लागते. यासाठी बेसनची गरज भासत नाही. मूगडाळ भिजत घालून ती वाटून घ्या. त्यामध्ये तुम्ही मिरची, धणे, मसाला मिक्स करून त्याची डायरेक्ट भजी तळू शकता. ही भजी अत्यंत कुरकुरीत होतात आणि चवीलाही चटणीसह अगदी मस्त लागतात. 

अधिक वाचा – बटाटा भजी होईल नेहमी चविष्ट,ट्राय करा या सोप्या ट्रिक्स

लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी 

हे सगळे पदार्थ वापरून तुम्ही बेसनाशिवाय भजी नक्कीच बनवू शकता. मात्र बेसनाच्या जागी याचा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे. 

या सर्व ट्रिक्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. त्यामुळे बेसन नसेल तर तुम्ही नक्की यापैकी कोणतीही रेसिपी वापरून भजी करा आणि कोणत्याही हंगामात घ्या भजीचा स्वाद. 

अधिक वाचा – असं ओळखा बाजारातील भेसळयुक्त बेसन, फॉलो करा या सोप्या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ