भारतीय स्वयंपाकात अनेक पदार्थांना फोडणी देण्यासाठी कढीपत्ता हमखास वापरला जातो. कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यातील फायबर्स, कॅल्शिअम, लोह, व्हिटॅमिन सी, बी आणि ई मुळे तुमचे आरोग्य तर सुधारतेच शिवाय ते तुमच्या सौंदर्यासाठीही लाभदायक असते. कढीपत्ता खाण्यामुळे शरीराला पुरेसे लोह मिळते आणि अशक्तपणा कमी होतो. जर तुम्हाला अॅनिमिया सारखा त्रास असेल तर तुम्ही नियमित कढीपत्ता चावून खायला हवा. त्याचप्रणाणे पचनशक्ती वाढवण्यासाठीही कढीपत्त्याचा फायदा होतो. जर तुम्हाला अपचन, गॅस, पोटदुखीचा त्रास असेल तर आहारात कढीपत्त्याचा समावेश जरूर करा. कढीपत्त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. आजकाल वाढणारे वजन अथवा अतिलठ्ठपणा हा अनेकांची मोठी समस्या झाली आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या आहारात कढीपत्त्याच्या समावेश करून वजन नियंत्रणात ठेवू शकता. एकूणच निरोगी आरोग्यासाठी आणि आजारपण येऊ नये यासाठी आहारात कढीपत्त्या असणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. यासाठीच जाणून घ्या फोडणी व्यतिरिक्त कढीपत्त्याचा आहारात समावेश करण्यासाठी नेमकं काय करावं. कढीपत्त्याची फोडणी देण्यासोबतच तुम्ही कढीपत्त्यापासून निरनिराळ्या प्रकारच्या चटणी तयार करू शकता. कारण भारतीय स्वयंपाकात भाजीप्रमाणेच चटणी, लोणचं, सलाड, कोशिंबीरीला खूप महत्त्व आहे. अशा पदार्थांमुळे जेवणाची लज्जत तर वाढतेच शिवाय ताटही भरलेलं दिसतं. अन्न पचायला उपयुक्त असे पदार्थ वापरून चटणी, लोणची केल्यास ती शरीरासाठी फायदेशीर ठरतात. यासाठीच जाणून घ्या कढीपत्त्यापासून कशी करावी चटणी
कढीपत्त्याची कुरकुरीत चटणी
साहित्य –
- एक कप कडीपत्त्याची पाने
- एक चमचा तीळ
- एक चमचा तेल
- लाल तिखट
- जिरे पावडर
- मीठ चवीनुसार
कृती –
- कढीपत्त्याची पाने धुवून कोरडी करावी
- तीळ तव्यावर थोडे भाजून घ्यावे
- कढीपत्ता तेलात तळून कुरकुरीत करून घ्यावा
- तळलेला कढीपत्ता, तीळ, मीठ, लाल तिखट, जिरे पावडर एकत्र करून चटणी बनवून ठेवावी. ही चटणी हातानेच एकत्र करून थोडी क्रश करावी. मिक्सरला लावण्याची गरज नाही. कुरीकुरीत झालेल्या कढीपत्त्यामुळे ती अतिशय स्वादिष्ट लागते.
कढीपत्याची चटणी आणखी निराळ्या पद्धतीने
साहित्य –
- एक कप कढीपत्ता
- एक कप चणाडाळ
- अर्धा कप उडीद डाळ
- अर्धा कप ओले खोबरे
- लाल मिरच्या
- जिरे
- चिंच
- हिंग आणि मोहरी
- मीठ
कृती –
- कढीपत्त्याची पाने धुवून कोरडा करा
- चणाडाळ आणि उडीद डाळ तव्यावर भाजून घ्या
- त्याच तव्यावर लाल मिरची, कढीपत्त्याची पाने, जिरे भाजून घ्या
- सर्व रोस्ट केलेले साहित्य मीठ, ओले खोबरे, चिंच घालून वाटा
- वाटताना चटणी पातळ हवी असेल तर थोडे पाणी टाका
- वाटलेल्या चटणीवर हिंग आणि मोहरीची फोडणी द्या
या दोन्ही चटणी तुम्ही वरणभात, डोसा, पराठा, फुलका, धिरडे,भाकरीसोबत खाऊ शकता. कढीपत्त्याची चटणी आहारात नियमित असल्यास ती तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच चांगली आहे. त्यामुळे नियमित अशी चमचमीत, कुरकुरीत चटणी खा आणि निरोगी राहा.आम्ही शेअर केलेल्या या दोन प्रकारच्या कढीपत्ता चटणी तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्ही या रेसिपिज ट्राय
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
अक्रोडचा वापर करून तयार करा या स्वादिष्ट रेसिपीज
ओट्स पासून तयार करा सकाळच्या नाश्त्यासाठी ‘या’ स्वादिष्ट रेसिपीज
आप्पेपात्रात अगदी कमी तेलात बनवा असे स्वादिष्ट ‘बटाटेवडे’