खाणंपिण आणि नाइटलाईफ

घरच्या घरी बनतील स्वयंपाकासाठी लागणारे बेस्ट मसाले    

Leenal Gawade  |  Mar 24, 2022
किचनमध्ये लागणारे मसाले

तुम्हाला किचनमध्ये वावरायला आवडत असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. किचनमधील मसाल्याचा डबा त्या किचनचे ह्रदय असते. तुमच्या मसाल्याच्या डब्यात कोण- कोणते मसाले तुम्ही ठेवता? कारण काही मसाले असे असतात जे तुमच्या किचनमध्ये असायलाच हवेत. गोडा मसाला, काळा मसाला, कांदा-लसूण मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला, लाल तिखट असे काही मसाले तुमच्या जेवणाची चव वाढवतात. काही जणांना बाहेरुन आणलेले मसाले चालून जातात. तर काही जण त्यांच्या चवीनुसार घरातच काही मसाले बनवतात. तुम्हालाही तुमच्यापुरता असा थोडा थोडा मसाला बनवून ठेवायला आवडत असेल तर तुम्ही आम्ही सांगितलेले काही सोपे मसाले आमच्यापद्धतीने बनवू शकता.

 गोडा मसाला

गोडा मसाला

भाजीची चव जर कोणत्या मसाल्याने वाढते तर तो आहे गोडा मसाला. गोडा मसाला बाजारात विकत मिळतो. पण तुम्ही बनवलेल्या गोडा मसाल्याची चव ही वेगळी आणि ताजी असते. त्यामुळे तुमच्या भाजीची चव चांगली वाढते. 

साहित्य:  प्रत्येकी 20 ग्रॅम पांढरे तीळ,खसखस, प्रत्येकी 10 ग्रॅम सुके खोबरे, दगडफुल, मोठी वेलची, तमालपत्र, जावेत्री, शहाजिरे, हिंगाचा खडा, दालचिनी, काळे मिरी, लवंग, त्रिफळा, 250 ग्रॅम धणे, तेल 

कृती :

कांदा-लसूण मसाला

कांदा-लसूण मसाला

झणझणीत आणि चमचमीत अशा भाजी किंवा आमटीचे प्रकार तुम्ही घरी बनवत असाल तर तुमच्यासाठी कांदा-लसूण मसाला हा एकदम परफेक्ट आहे. कांदा-लसूण मसाला हा बनवणे अजिबात कठीण नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कांदा-लसूण मसाला बनवता येईल.

साहित्य: प्रत्येकी 50 ग्रॅम धणे,बेडगी मिरची, लाल सुक्या मिरची,लसूण,  20 ग्रॅम सुकं खोबरं, प्रत्येकी 10 ग्रॅम जीरे, शहाजिरे, तीळ, काळी मिरी लवंग, नागकेशर, दालचिनी, स्टार फुल, जावेत्री, 4 मोठी वेलची, 7-8 तमालपत्र, खडा हिंग

कृती:  

किचन किंग मसाला

किचन किंग मसाला

रोजच्या भाज्यांना एक मस्त चव देण्यासाठी खूप जण किचन किंग मसाला वापरतात. अगदी कोणत्याही जेवणात हा मसाला चांगली चव देतो. त्यासाठीच अगदी घरीच बनवा किचन किंग मसाला 

साहित्य: 
1 टेबलस्पून हळद, जिरे, मोहरी, बडीशेप, चणाडाळ,खसखस 3 टेबलस्पून धणे, 4 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 1 जावेत्री, 8-10 काळीमिरी, लवंग, ¼ चमचा जायफळ पूड, ⅔ दालचिनी, २ स्टारफुल,½ चमचा मेथी, ½ चमचा सुंठ पावडर, ½ चमचा मीठ, 2-3 तमालपत्र, लाल मिरच्या

कृती: 

आता तुम्हाला लागणारे हे तीन मसाले घरच्या घरी मस्त बनवून घ्या

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ