नेलपॉलिश शेडचं तुमच्याकडे चांगलं कलेक्शन असू शकतं. शिवाय आजकाल बाजारात तर विविध रंगाच्या शेड उपलब्ध असतात. मात्र असं असूनही बऱ्याचदा हवी तेव्हा हवी तशी शेड तुम्हाला मिळेलच असं नाही. मात्र काळजी करू नका कारण एखाद्या ड्रेसवर तुम्हाला अगदी हवी तशी नेलपॉलिश शेड हवी असेल तर ती तुम्ही घरी देखील तयार करू शकता. तुमच्याकडे असलेल्या साहित्यापासूनच तुम्ही तुमची फेव्हरेट नेलपेंट शेड तयार करू शकता. शिवाय एकदा तुम्हाला ही टेकनिक समजली की तुम्हाला हव्या असलेल्या शेडसाठी मार्केटमध्ये ब्युटी सेंटरमध्ये चक्कर मारण्याची अथवा ऑनलाईन सर्च करण्याचीही गरज नाही. जाणून घ्या या सोप्या टिप्स आणि घरीच बनवा तुमची फेव्हरेट नेलपॉलिशची शेड.
pexels
होममेड नेलपॉलिश कशी बनवावी –
घरच्या घरी नेलपॉलिश तयार करण्याचे साहित्य –
- क्लिअर नेलपॉलिश अथवा व्हाईल नेलपेंट
- तुम्हाला हवा असलेल्या रंगाची आयशॅडो
- कॉटन इअर बड
- पेपर
तुमच्या फेव्हरेट शेडची नेलपेंट कशी तयार कराल –
- क्लिअर नेलपेंट अथवा व्हाईट नेलपॉलिशची बॉटल थोडी रिकामी करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या शेडची नेलपेंट त्यात तुम्हाला तयार करता येईल.
- तुमच्या फेव्हरेट आयशॅडो पॅलेटमधील तुमचा फेव्हरेट आयशॅडो थोडा क्रश करून घ्या.
- इअरबडच्या मदतीने तुम्ही तो काढून घेऊ शकता
- पेपर घेऊन त्या रंगाची स्मूद पावडर तयार करा
- आयशॅडोचे तुकडे त्यामध्ये असता कामा नये नाहीतर तुमची नेलपेंट चांगली होणार नाही
- पेपरची गुंडाळी करून त्याला नरसाळ्याच्या आकार द्या आणि त्यातून आयशॅडो पावडर नेलपॉलिशच्या बॉटलमध्ये टाका
- तुमच्या हाताला नेलपॉलिशचे डाग लागू नयेत यासाठी सतत हातात टिश्यू पेपर ठेवा
- नेलपॉलिशच्या बॉटलचे झाकण बंद करा आणि ती बॉटल व्यवस्थित शेक करा
- तुम्ही जितक्या ताकदीने ती शेक कराल तितकी परफेक्ट नेलपेंट शेड तयार होईल
- तुमच्या नेलपेंटचा शेड डार्क करण्यासाठी जास्त आयशॅडो पावडर वापरा आणि हलका करण्यासाठी कमी ऑयशॅडो पावडर वापरा
- अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला हवी ती शेड हवी तेव्हा घरच्या घरी तयार करू शकता.
- यासाठी जुना आयशॅडो पॅलेट आणि व्हाईट आणि क्लिअर नेलपॉलिश तुमच्याजवळ असायला हव्या.
- ग्लिटर नेलपॉलिश तयार करण्यासाठी तुमच्या आवडीचे ग्लिटर, आयशॅडो आणि क्लिअर नेलपॉलिश समप्रमाणात घ्या.
- ग्लिटर नेलपॉलिश तयार करण्यासाठी देखील समान पद्धत वापरा
- ग्लिटर नेहमी बॉटलच्या खालच्या दिशेने जमा होते यासाठी वापरण्यापूर्वी बॉटल व्यवस्थित शेक करणं गरजेचं आहे
- मॅट अथवा शिमर जसं तुमचं आयशॅडो असेल तशी तुमची नेलपेंटची शेड तयार होऊ शकतो
- अशा पद्धतीने तयार केलेलं नेलपॉलिश लगेच सुकतं आणि बाजारात मिळणाऱ्या इतर नेलपॉलिशप्रमाणेच दिसतं.
- नेलपॉलिश जास्त काळ टिकवण्यााठी तुम्ही त्यावर बेसकोट आणि टॉप कोट देऊ शकता
- पाणी अथवा गरम पाण्यामुळे ते खराब होत नाही
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
असिटोन की नॉन-अॅसिटोन नेलपॉलिश रिमूव्हर, नखांसाठी काय चांगलं