Care

सुंदर केसांसाठी अशी तयार करा कांदा पावडर, असा करा वापर

Leenal Gawade  |  Dec 27, 2020
सुंदर केसांसाठी अशी तयार करा कांदा पावडर, असा करा वापर

सुंदर केसांसाठी कांदा हा फार फायदेशीर असतो. कांद्याचा अर्क हा केसांच्या वाढीसाठी फारच चांगला असतो. म्हणूनच हल्ली कांद्याचा तेल, कांद्याचा पॅक आणि कांदा सीरम असे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात. सुंदर, जाड, सिल्की केसांसाठी कांद्याचा उपयोग करायचा विचार करत असाल तर तुम्ही कांदा पावडरचा उपयोग करु शकता. कांद्याची पावडर बाहेरुन आणायची गरज नाही ही कांदा पावडर तुम्ही घरीच करु शकता. ही कांदा पावडर कशी बनवायची आणि त्याचा वापर कसा करायचा ते देखील जाणून घेऊया

केस पांढरे का होतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

अशी बनवा कांदा पावडर

Instagram

 कांदा पावडर बनवण्यासाठी फार काही साहित्य लागत नाही. कोणतेही चांगले कांदे तुम्ही यासाठी वापरु शकता. 

मोहरीचा हेअरमास्क वापरून केस होतील अधिक घनदाट

अशा करा केसांसाठी कांदा पावडरचा वापर

Instagram

केसांसाठी कांद्याची तयार केलेली कांदा पावडर ही कांदा पावडर बनवण्याची सर्वसामान्य पद्धत आहे. अनेक जण ही पावडर जेवणासाठी सुद्धा वापरतात.त्यामुळे केसांच्या आरोग्यासोबतही तुम्ही याचा खाद्यपदार्थांमध्येही उपयोग करु शकता. पण आज आपण कांदा पावडरचा केसांसाठी कसा उपयोग करता येईल ते पाहुया.

साधारण दोन चमचे कांदा पावडर आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या.ते छान एकजीव करुन केसांचे सेक्शन काढून स्काल्पला हा कांदा मास्क लावा. तेल असल्यामुळे छान मसाज करुन स्काल्पला मोकळे करा. कमीत कमी 2 तास तरी हा मास्क केसांमध्ये तसाच राहू द्या. त्यानंतर एखाद्या माईल्ड शॅम्पूने केस धुवून घ्या.  कांदा मास्कच्या नियमित वापरामुळे केसांचा कोंडा कमी होतो आणि केसांच्या वाढीला चालना मिळते. 

केसांच्या वाढीला चालना देऊन केसांना चमकदार बनवण्यासाठी हा मास्क फारच फायदेशीर आहे. 2 चमचे कांदा पावडर आणि 2 चमचे मध घेऊन त्याची थपथपीत पेस्ट तयार करा.केसांचे वेगवेगळे सेक्शन काढून केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत हा हेअर मास्क केसांना लावून ठेवा. साधारण 20  मिनिटांसाठी हा हेअरमास्क  केसांमध्ये चांगला मुरु द्या. त्यानंतर केस धुवून टाका. केस अधिक चमकदार आणि मजबूत दिसतील. 

जर तुम्हाला केसांना अंड लावलेले चालत असेल तर तुम्ही कांदा पावडर आणि अंड असा देखील एक मास्क तयार करु शकता. अंड्याचा पांढरा बलक घेऊन तो कांदा पावडरमध्ये एकत्र करा. एखाद्या हेअर मास्क प्रमाणे हा मास्क लावा. केस चांगले सुकले की, कोमट पाण्याने केस धुवून टाका. केस सिल्की आणि मजबूत होण्यास मदत मिळेल. 


आता घरीच कांदा पावडर तयार करुन त्याचा केसांसाठी असा वापर करा. केस सुंदर दिसतील.

गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं

Read More From Care