जेवण अत्यंत चविष्ट आणि चटकदार, लज्जतदार भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी मिळतं. भारतामध्ये अनेक पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी जेवणात आणि अन्य अगदी नाश्त्याच्या पदार्थांमध्येही चटणी हा असा पदार्थ आहे जो अधिक चव वाढवतो. चटणी असा पदार्थ आहे, जो कोणत्याही पदार्थाला अधिक लज्जतदार आणि चविष्ट बनवतो. तसंच जेवण सपक असेल तर चटणी त्याचा स्वाद अधिक वाढविण्यासाठी मदत करते. खरं तर चटणी खायला जितकी स्वादिष्ट असते तितकीच ती बनवणेही सोपी असते. सकाळच्या झटपट नाश्त्याला डोसे, समोसे, आंबोळी, पोहे अथवा इडली असा बेत असेल तर तुम्ही डोशासह शेंगदाणे आणि दह्याची चटणी नक्की तयार करून खाऊ शकता. ही चटणी चवीला तर मस्तच असते. पण त्याशिवाय ही चटणी सकाळच्या घाईघाईत नक्कीच पटकन तयार करता येते आणि डोशासह ही चटणी खाल्ल्यास, डोसा खायला अधिक मजा येते.
साहित्य
शेंगदाण्याची चटणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
- एक वाटी शेंगदाणे (भाजलेले)
- एक कप दही
- अर्धा कप कोथिंबीर
- 3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
- अर्धा चमचा जिरे पावडर
- चवीनुसार मीठ
- एक लहान चमचा लसूण
- 2 चमचे तेल
बनविण्याची पद्धत
- दही चटणी बनविण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही कोथिंबीर व्यवस्थित धुवा आणि मग शेंगदाणे जर भाजलेले नसतील तर भाजून घ्या
- एका पॅनमध्ये तेल घ्या आणि मग शेंगदाणे भाजून घ्या. भाजल्यावर शेंगदाणे थंड होऊ द्या
- त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, मिरची, लसूण, मीठ एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या
- हे मिश्रण व्यवस्थित वाटून घेताना अगदी कमी पाण्याचा वापर करावा.
- मिश्रण नीट वाटून झाले की, त्यामध्ये तुम्ही वाटीत दही घाला आणि व्यवस्थित फेटून घ्या
- त्यामध्ये मीठ घाला आणि फ्रिजमध्ये ठेवा. तुमची दह्यातली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. तुम्ही यासह सामोसे, चिकन टिक्का, तंदूरी चिकन, पराठे आणि पोळीसहदेखील खाऊ शकता
लक्षात ठेवा महत्त्वाच्या टिप्स
- डोशासह केवळ नारळाची चटणीच नाही तर तुम्हाला शेंगदाण्याची चटणीदेखील अत्यंत चविष्ट लागते. मात्र ही चटणी करताना शेंगदाणे कच्चे ठेऊ नका. अन्यथा त्याची चव लागणार नाही. शेंगदाणे हे भाजूनच घ्या
- तसंच या चटणीमध्ये तुम्ही दही घातले तर डोशासह अधिक चांगली चव येते
- तसंच तुम्ही शेंगदाण्यासह अन्य घटक वाटून घेतल्यास, त्याचे मिश्रण चांगले तयार होते. त्यामुळे नुसते शेंगदाणे भाजून त्यामध्ये वरून इतर घटक मिक्स करू नये. तर मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करतानाच इतर घटक घालावे. जेणेकरून त्याचा स्वाद अत्यंत चांगला येतो
- गरमागरम डोशासह फ्रिजमधील थंड चटणी अधिक चविष्ट लागते. त्यामुळे सहसा चटणी तयार करून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवा
- नारळाच्या चटणीपेक्षा दह्यातली शेंगदाण्याची चटणी डोशाबरोबर अधिक चविष्ट लागते आणि त्याचे आरोग्याला फायदेही अधिक मिळतात. मुळात काही जणांना खोबऱ्यामुळे लागणारा ठसकादेखील लागत नाही
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक