DIY फॅशन

कमरेजवळ अशी बांधा साडी, दिसाल अधिक बारीक – सोप्या हॅक्स

Dipali Naphade  |  Apr 6, 2022
how-to-make-saree-look-neat-near-waist-tips-in-marathi

उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळ्यात जर साडी नेसायची असेल तर कॉटन साडी हा उत्तम पर्याय आहे. या हंगामात कॉटन साडी नेसणे म्हणजे एक वेगळीच ग्रेस आहे. पण कॉटनच्या साड्या खूपच फुलतात. त्यामुळे त्या नेसणे सर्वांनाच आवडते असं नाही. जर कॉटनची साडी नीट नेसली नाही तर मग तुमच्या शरीराचा आकार अगदीच खराब दिसतो. साडी कशी नेसावी अनेकांना कळत नाही. कॉटन साड्यांची ग्रेस आणि आराम अत्यंत चांगला असतो. पण अनेक महिलांना याच कारणामुळे ही साडी नेसावी की नेसू नये असा प्रश्न पडतो. कॉटनच नाही तर साड्यांमध्ये ऑर्गेंझा साडी, टिश्यू साडी, टसर सिल्क, क्रेप साड्या या सर्वच साड्यांमध्ये ही समस्या दिसून येते. अशा साड्या मॅनेज करण्यासाठी काही सोप्या टिप्स आपल्याला आम्ही सांगत आहोत. कमरेजवळ साडी अशी बांधा की तुम्ही अधिक बारीक दिसाल. असे सोपे हॅक्स तुम्हाला नक्कीच फायदा मिळवून देतील. आम्ही तुम्हाला स्टेप – बाय – स्टेप याबाबत सांगत आहोत. 

कशी बांधावी योग्य पद्धतीने साडी 

अनेकांना साडी सुटण्याची भीती असते. त्यामुळे साडी व्यवस्थित नेसता यायला हवी आणि त्यासाठी महत्त्वाच्या टिप्स.

स्टेप 1 – साडीचे प्लीट्स काढताना ठेवा लक्ष

सर्वात पहिल्यांदा तुम्ही निऱ्या काढण्याकडे लक्ष द्या आणि त्यासाठी तुम्ही सेफ्टीपिन्सचा आधार घेण्याची गरज आहे. कॉटन साड्यांच्या निऱ्या सहजपणे काढता येतात. तुम्हाला केवळ याच गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे की सर्व निऱ्या या अगदी समान आणि एका पातळीत यायला हव्यात. कारण तुम्ही जर साडीच्या निऱ्या एका आकारात काढल्या नाहीत तर साडी वर खाली होते आणि मग साडी अधिक फुललेली दिसून येते. निऱ्या नीट काढल्या तर तुम्हाला पिन लावण्याचीही गरज नाही. 

स्टेप 2 – निऱ्याच्या शेवटच्या भागाचे टोक तुम्ही बेंबीच्या ठिकाणी खोचा, पण तुम्हाला कमरेच्या भागापासून येऊन कपड्याचे पहिले टोक हे खोचणे गरजेचे आहे आणि मगच निऱ्या आत घ्या. या ठिकाणी महिला दुसरी चूक अशी करतात, की निऱ्या आधीच खोचतात आणि मग उरलेली साडी आतमध्ये खोचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे साडी अधिक फुलते. त्यामुळे तुम्ही या बारकाईकडे व्यवस्थित लक्ष ठेवायला सांगा. ही योग्य पद्धत नाही कारण यामुळे कंबर अधिक जाडी दिसते. त्यामुळे तुम्ही साडी खोचताना बेंबीच्या भागाजवळूनच खोचावी. तुम्ही बेंबीच्या लाईनमध्ये जर निऱ्या काढल्या तर त्या अगदी व्यवस्थित सेट राहतात आणि तुम्हाला सतत सेफ्टी पिन लाऊन सेट करण्याची गरज भासत नाही. 

स्टेप 3 – सर्वात महत्त्वाचा हॅक जो साडीला फुलवत नाही 

आता निऱ्या व्यवस्थित खोचल्यानंतर हिप अर्थात तुमच्या ढुंगणाच्या बाजूच्या भागावरील साडीला अगदी लहान लहान फोल्ड करून साडी व्यवस्थित मॅनेज करा. हे छोटेसे हॅक तुमची साडी अत्यंत व्यवस्थित सेट करून देतो आणि मग साडी सतत फुलत नाही आणि तुमचे पोटही सपाट दिसते अर्थात पोट मोठे दिसत नाही

स्टेप 4 – पदर करा मॅनेज 

आता शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा पदर व्यवस्थित मॅनेज करणे. याची योग्य पद्धत म्हणजे 45 डिग्रीमध्ये अँगल घेणे. जर तुम्ही तुमच्या पदराला पिन लावत असाल तर खांद्याला न लावता खांद्याच्या थोडी मागे लावावी. खालच्या बाजूला पिन लावल्यास, तुमची साडी फुललेली राहात नाही. कॉटन साडीला तर पिन लावायलाच हवी. यानंतर तुम्ही पदर आपल्या डाव्या बाजूला घेऊन त्याच्या व्यवस्थित निऱ्या काढा. यामुळे साडी नीट सेट होईल आणि तुम्हाला जर एकहाती पदर काढता येत नसेल तर असा पदर काढणे सोपे आहे. 

अशा पद्धतीने तुम्ही कमरेजवळ व्यवस्थित साडी बांधली तर अधिक बारीक दिसण्यासाठी मदत होईल. तुम्हालाही काही हॅक्स माहीत असतील तर तुम्ही नक्की शेअर करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन