Care

रीठा वापरून घरीच तयार करा आयुर्वेदिक शॅंम्पू आणि कंडिशनर

Trupti Paradkar  |  Jul 8, 2020
रीठा वापरून घरीच तयार करा आयुर्वेदिक शॅंम्पू आणि कंडिशनर

प्रत्येकीला आपले केस मजबूत आणि घनदाट व्हावे असं वाटत असतं. मात्र यासाठी प्रत्येकवेळी केसांवर महागडे प्रॉडक्ट वापण्याची आणि ट्रिटमेंट करण्याची गरज असतेच असं नाही. एवढंच नाही तर या बाजारातील केमिकलयुक्त शॅंम्पू आणि कंडिश्नर वापरण्यामुळे कधी कधी केसांचे नुकसानही होऊ शकते. यासाठीच आम्ही नेहमी तुम्हाला बऱ्याचदा अनेक नैसर्गिक आणि घरगुती उपायदेखील सांगत असतो. केसांची काळजी घेण्यासाठी अनेक आयुर्वेदिक उपचार तुम्ही घरीच करू शकता. आयुर्वेदिक रीठाचा वापर करून तयार केलेल्या शॅंम्पू आणि कंडिशनर मुळे तुमचे केस स्वच्छ तर होतीलच शिवाय ते मजबूत आणि मऊदेखील होतील. यासाठीच या टिप्स जरूर फॉलो करा.

रीठाचे केसांवर होणारे फायदे

रीठा एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. रीठाच्या बियांचा अनेक नैसर्गिक औषधांसाठी वापर केला जातो. तसंच रीठा एक उत्तम क्लिंझर म्हणून वापरलं जातं. एवढंच नाही तर त्यामध्ये भरपूर लोह अर्थात आयर्न असते जे केसांना निरोगी राखण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. रीठा नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे रीठा वापरून तुम्ही तुमचे केस गळणे थांबवू शकता. ज्यामुळे तुमचे  केस मजबूत आणि लांब होऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या यापासून शॅंम्पू आणि घरगुती केसांना कंडिशनर कसा तयार करावा. 

Instagram

रीठापासून तयार करा शॅंम्पू –

रीठा हे उत्तम क्लिंझर आहे हे तर तुम्हाला माहीत असेलच. त्यामुळे रीठापासून तयार केलेल्या शॅम्पूने तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होतात. मात्र ते या शॅंम्पूमुळे कोरडे नक्कीच होणार नाहीत.

साहित्य –

रीठा, आवळा आणि शिकेकाई

शॅम्पू तयार करण्याची पद्धत –

वाळवलेली रीठा, आवळा आणि शिकेकाई समप्रमाणात घ्या. रात्रभर हे साहित्य पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे मिश्रण अर्धा तास मंद गॅसवर उकळवा. यातील पाणी अर्धे होईल इतकं ते उकळणे गरजेचं आहे. थंड झाल्यावर हे मिश्रण स्मॅश करा. गाळून एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. तुम्ही नियमित या मिश्रणाने तुमचे केस धुवू शकता. कारण यातील घटक नैसर्गिक असल्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होत नाही. 

 

Instagram

रीठापासून तयार करा कंडिशनर –

शॅम्पूप्रमाणेच केसांमध्ये मऊपणा येण्यासाठी शॅंम्पू नंतर केसांना कंडिशनर करण्याची नक्कीच गरज असते. यासाठी देखील तुम्हील रीठाचा वापर करू शकता. 

साहित्य –

रीठा पावडर आणि पाणी 

कंडिशनर तयार करण्याची पद्धत –

रात्रभर रीठा पावडर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उकळून हे पाणी थंड करा. रीठा पासून तयार केलेली पेस्ट तुम्ही केसांवर कंडिशनरप्रमाणे वापरू शकता. यामुळे तुमचे केस गळणे नक्कीच कमी होईल. 

Instagram

रीठापासून तयार करा हेअर मास्क –

साहित्य –

रिठा पावडर, आवळा पावडर, गुलाबपाणी आणि दही 

हेअर मास्क तयार करण्याची पद्धत –

सर्व साहित्य एकत्र करा आणि जाडसर पेस्ट तयार करा. रीठापासून तयार केलेला हा हेअर मास्क तुमच्यासाठी अगदी बेस्ट असू शकतो. तेलकट त्वचा, कोंडा, निस्तेज केस अशा अनेक समस्यांवर याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. एवढंच नाही तर यामुळे तुमचे केस चमकदार आणि सुंदर दिसू लागतील. हा मास्क केसांना लावा आणि वीस मिनीटांनी केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा तुम्ही हा हेअर मास्क केसांना लावू शकता.

 

 

 

केसांना मेंदी लावताना मेंदी जर तुम्ही आवळा, रीठा आणि शिकेकाई उकळून तयार केलेल्या पाण्यात भिजवली तर तुमच्या केसांवर त्याचा नक्कीच चांगला फायदा दिसून येईल. हे सर्व उपाय नैसर्गिक असल्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. उलट हे सर्व साहित्य वापरून तुम्हाला घरीच तुमच्या केसांची  योग्य निगा राखता येईल. हा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा. 

अधिक वाचा –

जास्वंदीच्या फुलाने घरीच करा केस असे चमकदार

केस धुण्याआधी करा हा उपाय, केसांचे गळणे होईल कमी

केस पातळ असल्याने हैराण असाल तर फॉलो करा या टिप्स

Read More From Care