DIY सौंदर्य

त्वचा क्लिन करण्यासाठी घरीच बनवा हळदीचा टोनर

Dipali Naphade  |  Oct 25, 2021
turmeric-toner

फेस्टिव्ह सीझनला (Festive Season) सुरूवात झाली आहे. अशावेळी प्रत्येकाला आपली त्वचा अधिक डागविरहित आणि क्लिन असावी असंच वाटतं. अशा त्वचेसाठी टोनरचा वापर करणे अत्यंत फायदेशीर समजण्यात येते. हळद (Turmeric) अनादी काळापासून आपण त्वचेसाठी वापरत आलो आहोत. अगदी लग्नाच्या पूर्वीही नवरा आणि नवरीची त्वचा उजळावी म्हणून आजही हळदीचा खास कार्यक्रम करण्यात येतो. हळदीचा टोनर (turmeric toner) हा त्वचेला अधिक आतपर्यंत स्वच्छता मिळवून देतो. हळदीच्या टोनरमुळे त्वचेवरील डाग, सुरकुत्या, मुरूमांचा समस्या निघून जाण्यास मदत मिळतो. यासाठी तुम्ही बाजारात जाण्याची अजिबातच गरज नाही. घरच्या घरी तुम्ही हळदीचा टोनर बनवू शकता. कशा पद्धतीने हा टोनर बनवायचा आणि वापरायचा याबाबत जाणून घेऊ. 

हळदीचा टोनर बनविण्याची पद्धत (How to make turmeric toner)

हळदीचा टोनर बनविण्यासाठी लागणारे साहित्य 

हळदीचा टोनर बनविण्याची पद्धत 

हळदीचा टोनर कसा वापरावा (How to use Turmeric Toner)

हळदीचा टोनर वापरण्याची एक पद्धत आहे. आम्ही तुम्हाला ही पद्धत सांगत आहोत. तुम्ही यानुसार वरच्या पद्धतीने तयार करण्यात आलेला हळदीचा टोनर वापरावा. 

टोनर लावताना या गोष्टींची घ्या काळजी

टोनर कोणत्याही प्लास्टिकच्या बाटलीत ठेऊ नये. हळदीचा टोनर नेहमी काचेच्या बाटलीतच ठेवावा. तसंच नेहमी टोनर फ्रिजमध्ये ठेवावा जेणेकरून तो खराब होणार नाही. टोनर तयार केल्यानंतर तुम्ही साधारण 15 दिवस याचा वापर करून घेऊ शकता. 15 दिवसांनंतर हा टोनर खराब होतो. आठवड्यातून साधारण 2-3 वेळा तुम्ही या हळदीच्या टोनरचा वापर करावा. 

हळदीच्या टोनरचे फायदे 

हळदीचा टोनर हा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. हळदीचा टोनर लावल्यामुळे ओपन पोर्स बंद होतात. हळदीमध्ये ब्लिचिंग गुण आढळतात ज्यामुळे त्वचा उजळते आणि अधिक चमकदार दिसते. हळदीच्या टोनरचा वापर केल्याने चेहरा अधिक कसदार होतो. तसंच हळदीचा टोनर लावल्यामुळे त्वचेची पीएच लेव्हल संतुलित राहाते. हळदीच्या टोनरचा वापर केल्याने त्वचेच्या इन्फेक्शनचा त्रासही कमी होतो. त्यामुळे तुम्ही या फेस्टिव्हल सीझनसाठी घरच्या घरी हळदीचा टोनर बनवून त्याचा वापर करू शकता. याचा तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी फायदा होतो. तसंच सतत पार्लरमध्ये जाऊन भरपूर पैसे खर्च करण्याचीही गरज भासत नाही. हळद ही अँटिसेप्टिक असल्याने त्वचेला कोणतीही हानीदेखील होत नाही. मुरूमांसाठीही घरगुती उपाय म्हणून उपयोग होतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य