खाणंपिण आणि नाइटलाईफ

लोणच्याला बुरशी येते, जाणून घ्या लोणचं टिकवण्याच्या टिप्स

Leenal Gawade  |  May 30, 2021
लोणच्याला बुरशी येते, जाणून घ्या लोणचं टिकवण्याच्या टिप्स

पावसाळा सुरु झाला की, काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे असते. पावसाळ्यात वातावरण इतके दमट होते की, काही पदार्थांना बुरशी लागण्याची शक्यता जरा जास्त असते. विशेषत: वाळवणीचे पदार्थ… हे जर नुकतेच केले असतील तर ते फार जपावे लागतात. लोणची, पापड यांच्यावर बुरशी बसू नये असे जर तुम्हाला वाटत असेल त्या पदार्थांची साठवणूक ही खास पावसाच्या दिवसात अधिक चांगली करावी लागते. तुम्हीही या काही काळात लोणचं केलं असेल तर त्यावर बुरशी येऊ नये म्हणून आणि ते खराब न होऊ देण्यासाठी काही खास टिप्स

उन्हाळ्यातील बोअरींग जेवणाला करतील ही झटपट लोणची चटकदार

लोणचं आणि बरणी

Instagram

लोणचं हे मुरणं फार गरजेचं असतं. मुरलेलं लोणचं हे नेहमीच छान लागतं. त्यासाठी आपण विशिष्ट बरण्यासुद्धा वापरतो. खूप जणांकडे वर्षभरासाठी लोणचं केलं जातं. अशावेळी चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरण्या या आणून ठेवलेल्या असतात. जर तुम्ही देखील यंदा लोणचं केलं असेल तर ते प्लास्टिकच्या डब्यात ठेवण्याची चुकी अजिबात करु नका. कारण काचेचे भांड आणि चिनी मातीच्या भांड्यात लोणचं अधिक काळासाठी टिकतं. शिवाय ही बरणी उन्हात ठेवल्यानंतर लोणचं टिकण्याही मदत मिळते. त्यामुळे लोणचं केलं असेल तर तुम्ही ते काचेच्या आणि चीनी मातीच्या हवाबंद डब्यात ठेवा. म्हणजे त्यामध्ये ओलावा शिरणार नाही आणि लोणचं टिकायला मदत मिळेल. 

लिंबाच्या लोणच्याने वाढवा प्रतिकारशक्ती जाणून घ्या फायदे

लोणचं आणि हिगांची धुरी

ज्यावेळी तुम्ही लोणचं करता त्यावेळी ते लोणचं बरणीत भरण्याआधी डब्याला हिंगाची धुरी देण्यास सांगितले जाते. हिंगाची धुरी दिल्यामुळे लोणचं टिकण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर हिंगामुळे लोणच्याला एक वेगळाच स्वाद सुद्धा येतो. हिंग हे लोणच्यामध्ये घालतात. पण त्याचसोबत डब्याला धुरी देऊन हे लोणचं भरले तर त्याला एक छान स्मोक मिळतो. जो चवीला खूपच छान लागतो. त्यामुळे लोणचं भरण्याआधी या गोष्टी नक्की करा.

लोणचं आणि काळजी

Instagram

लोणचं एअर टाईट अशा डब्यात भरल्यानंतर ते तसेच ठेऊन चालत नाही. ते लोणचं उघडून मिक्स करुन घ्यायचं असतं. असं केल्यामुळे मसाला जर एका बाजूला गेला असेल आणि तेल वर आलं असेल तर ते लोणच्यामध्ये जाण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही दररोज एकदा तरी लोणच्याची बरणी उघडून लोणचं चांगलं फिरवून घ्या. त्यामुळे लोणच्याकडे लक्षही दिले जाईल आणि लोणचं खराब होणार नाही.

लसूण आणि हिरव्या मिरचेचे चटपटीत लोणचे बनवा घरच्या घरी

लोणचं आणि तेलाचं प्रमाण

कोणतीही रेसिपी करताना त्याचे प्रमाण हे नेहमीच योग्य असायला हवे. जर प्रमाण योग्य असेल तर तुमचे लोणचं अजिबात खराब होणार नाही. पण जर प्रमाण गडबडले तर मात्र लोणचं गडबडण्याची शक्यता असते. विशेषत:तेलाचे प्रमाण हे या रेसिपीसाठी फारत महत्वाचे असते. त्यामुळे तेल हे योग्य प्रमाणात हवे. तेल भरपूर असेल तर लोणंच्याला बुरशी येत नाही. 

लोणचं ठेवा वर

खूप जणं लोणचं घातलं आणि ते ठरलेल्या दिवसापैकी उन्हात ठेवलं की, त्यानंतर ते आत टाकून देतात. असे मुळीच करु नका. कारण असे केल्यामुळे लोणचं केलं आहे हे लक्षात राहात नाही. ज्यावेळी आपण आठवतं त्यावेळी ते पाहायला गेल्यावर लोणच्यावर तोपर्यंत बुरशी आलेली असते. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायला विसरु नका. 

आता घरी लोणचं केलं असेल तर अशा पद्धतीने काळजी घ्यायला विसरु नका. 

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ