DIY फॅशन

सिल्कच्या साड्या जपण्यासाठी घ्या अशी काळजी, अन्यथा साड्या होतील खराब

Dipali Naphade  |  Mar 27, 2020
सिल्कच्या साड्या जपण्यासाठी घ्या अशी काळजी, अन्यथा साड्या होतील खराब

आपल्याकडे खूप साड्या असतात. पण त्या साड्यांमध्येही सिल्कच्या साड्या या आपल्या सर्वांनाच जास्त प्रिय असतात. या साड्या इतर साड्यांच्या तुलनेत महागही असतात. इतकंच नाही तर याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. सिल्कच्या साड्यांची बाजारामध्ये खूपच मागणी असते. या साड्यांची ठेवण आणि याची कलाकुसर इतकी सुंदर असते की ही साडी प्रत्येकीलाच आपल्या वॉर्डरोबमध्ये असावी असं वाटतं. असं म्हटलं जातं की, सिल्कच्या साड्या खूप जपाव्या लागतात. तसंच या साड्या आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी बऱ्याच महिला त्या साड्या जपूनही ठेवतात. पण बऱ्याचदा या जपण्याच्या नादात काही महिला या साड्या न धुताच आपल्या वॉर्डरोबमध्य तशाच ठेवतात.  त्यामुळे या साड्या लवकर खराब होतात. साडी कितीही महाग असली तरी ती व्यवस्थित ठेवली नाही तर ती खराबच होणार हे आधी लक्षात घ्या. तुम्हाला जर सिल्कची साडी व्यवस्थित ठेवायची असेल तर कशी काळजी घ्यायला हवी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या गोष्टी नक्की लक्षात घ्या आणि सिल्कच्या साड्यांची अशी काळजी तुम्ही घेतली तर तुमच्या साड्या नक्कीच खराब होणार नाहीत. 

वेळोवळी घड्या बदला

Shutterstock

तुम्हाला सिल्कची साडी जास्त काळ टिकवायची असेल तर या साडीची घडी तुम्ही वेळोवेळी बदलत राहायला हवी. असं केल्याने दोन फायदे मिळतात. एक तर वेळोवेळी या साडीला काही कीड तर लागली नाहीये ना हे तुम्हाला पाहता येते आणि दुसरं म्हणजे साडीचा कोणताही भाग दुसऱ्या साडीला चिकटला तर नाही ना अथवा त्याचा रंग तर लागला नाही ना हे पण जाणून घेता येते. पण सर्वात जास्त या गोष्टीकडे लक्ष द्या की, सिल्कच्या साड्या  जेव्हा तुम्ही घड्या घालून ठेवता तेव्हा तुम्ही त्या सुती अथवा मलमलच्या कपड्यात लपेटून ठेवा. जेणेकरून साडी खराब होणार नाही. 

हँगरवर लटकून ठेऊ नका

Shutterstock

सिल्कची साडी जपताना तुम्ही  कपाटामध्ये ती हँगरवर लटकून ठेऊ नका. यामुळे हँगरचे डाग त्या साडीवर पडण्याची शक्यता असते. असं केल्याने साडी त्या जागी विरळ होण्याची शक्यताही असते. त्यामुळे जास्त काळ सिल्कची साडी टिकवायची असेल तर तुम्ही ती साडी एखाद्या बॉक्समध्येही ठेवू शकता. तुम्ही असं केल्यास, तुम्हाला सिल्कची साडी कितीही वर्षांनी बाहेर काढलीत तर नव्यासारखीच दिसणार. बॉक्समध्ये ठेवतानाही ही साडी सुती कापडात ठेवलीत तर त्याची अधिक चांगली काळजी घेतली जाऊ शकते.  

लग्नातील साड्यांचा पुनर्वापर करून बनवा नवे डिझाईन्स

धूप दाखवा

आपण बऱ्याचदा घरी असं पाहिलं असेल की आपल्या आजी आजोबांनी साधारण थंडीच्या दिवसात कपड्यांना धूप दाखवला आहे. हे यासाठी करण्यात येतं जेणेकरून जर कपड्यांवर कोणतीही कीड बसली असेल तर ती संपुष्टात यावी. तसंच कपड्यांना एक कुबट वास येऊ लागतो तो निघून जाण्यासाठीही धूप लावला जातो. सिल्क साड्यांसाठीही तुम्ही ही युक्ती वापरू शकता.  एक दोन महिन्याने एकदा या साड्यांना नक्कीच धूप दाखवा. त्यामुळे सिल्क साड्यांची जी चमक आहे ती तशीच राहील. 

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी

परफ्यूमचा सुगंध गेलाय की नाही ते पाहा

साडी नेसल्यानंतर आपण परफ्यूम लावतोच. पण साडीला परफ्यूम लावल्यानंतर साडी कपाटात ठेवण्यापूर्वी त्या परफ्यूमचा सुगंध पूर्ण गेला की नाही याची खात्री करून घ्या. तुम्ही साडीला हवेवर काही काळ ठेऊन त्याचा सुगंध काढून टाकू शकता. जर तुम्ही परफ्यूमच्या सुगंधासह साडी आत तशीच घडी करून ठेवली तर सिल्कच्या साडीवर करण्यात आलेल्या कलाकुसरीवर काळे डाग पडतात. त्यामुळे साडी पटकन खराब होण्याची शक्यता असते. तसंच साडी ड्रायक्लीनला देणार असाल तर त्यावर जास्त स्टार्च न लावण्याच्या सूचना तुम्ही द्या. 

कांजिवरम आणि बनारसी साड्यांमधील फरक ओळखणं होतंय कठीण तर ओळखा असे

इस्त्री करताना पाण्याचा अजिबात उपयोग करू नका

Shutterstock

तुम्हाला सिल्कच्या साड्यांना घरात इस्त्री करायची असेल तर एक लक्षात घ्या की, इस्त्री करताना अगदी हलक्या हाताने इस्त्री करा. पण पाण्याचा अजिबात उपयोग करू नका. त्यामुळे साडीवर डाग पडून साडीचा रंग उडू शकतो अथवा काळी पडू शकते. इस्त्री करताना जर डाग लागले तर मऊ कपड्याने पुसून घ्या अथवा डाग घालवण्यासाठी तुम्ही पूर्ण साडी सुकवा आणि मगच साडीची घडी करून ती कपाटात ठेवा. 

साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक

ऊबदार कपड्यांसह स्टोअर करू नका

सिल्कच्या साड्या  कधीही अन्य गरम कपडे अर्थात ऊबदार कपड्यासह स्टोअर करू नका. ऊबदार कपड्यांना नीट ठेवण्यासाठी बऱ्याचदा नॅपथेलीन बॉल्सचा उपयोग करण्यात येतो. पण सिल्कच्या साडीसाठी याचा उपयोग करू नका. कारण यामुळे सिल्कच्या साडीवर जरीकामावर पूर्ण काळेपणा येतो आणि साडी खराब होते. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From DIY फॅशन