DIY सौंदर्य

वॅक्सिंग (Waxing) जास्त वेळ टिकून ठेवायचं असेल तर करा ‘हे’ उपाय

Dipali Naphade  |  Nov 1, 2019
वॅक्सिंग (Waxing) जास्त वेळ टिकून  ठेवायचं असेल तर करा ‘हे’ उपाय

कोणत्याही मुलीसाठी वॅक्सिंग करणं आणि ते जास्त काळापर्यंत टिकवून ठेवणं हा एक मोठा टास्क आहे. वॅक्सिंग केल्यानंतर काही दिवस बरं वाटतं. पण पुन्हा एकदा हातापायावर केस यायला लागल्यानंतर वॉर्डरोबमध्ये असणारे सेक्सी ड्रेस घालणं बंद करून पुन्हा एकदा कुरते अथवा जीन्स आणि टॉपचा पर्याय निवडावा लागतो. खरं तर वॅक्सिंग हा बऱ्याच मुलींना कंटाळवाणा प्रकार वाटतो. पण वॅक्सिंग करण्याशिवाय काही पर्यायदेखील नसतो. काही मुलींना अंगावर केस येत नाहीत. पण त्याचं प्रमाण फारच कमी असतं. साधारण 20 दिवस गेले की, अंगावरील केस पुन्हा वाढू लागतात. अशावेळी नक्कीच तुम्हाला कंटाळा येणं साहजिक आहे. पण वॅक्सिंग जास्त काळ टिकवून ठेवायचं असेल तर आम्ही तुम्हाला त्यासाठी काही टिप्स देणार आहोत. त्यामुळे तुमचे पाय सेक्सी आणि स्मूद जास्त काळापर्यंत दिसतील. 

Waxing केल्यावर टाळा ‘या’ 7 गोष्टी!! – Post Waxing Care in Marathi

वॅक्सिंग केल्यानंतर कशी घ्यावी त्वचेची काळजी – Post Waxing Care Tips For Skin

Shutterstock

केस वाढू द्या

Shutterstock

तुमच्या हातापायावरील केस जर एक इंचापेक्षा लहान असतील तरत वॅक्स करण्यासाठी काही वेळ वाट पाहा. हे केस काही दिवसातच वाढतील. तुम्हाला पुन्हा वॅक्सिंगची गरज भासते तेव्हा किमान केस एक इंच तरी वाढलेले असावेत. कारण त्यावेळी वॅक्सिंग केल्यास, अगदी मुळापासून केस निघतात. त्यामुळे पुन्हा केस येण्यास वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला जास्त काळ वॅक्सिंगपासून दूर राहाता येतं आणि त्रास होत नाही. 

वॅक्सिंग नंतर त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

वॅक्स करण्यापूर्वी एक्सफोलिएट करणं विसरू नका

Shutterstock

वॅक्स करण्याच्या एक दिवस आधी तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करणं योग्य आहे. जेणेकरून डेड स्किन निघून जाते आणि इनग्रोन हेअरदेखील वॅक्सिंगदरम्यान लगेच निघून जातात. वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा एक्सफोलिएट केल्याने डेड स्किन निघून जाते आणि तुम्हाला तुमच्या नको असलेल्या केसांपासूनही सुटका मिळते. इतकंच नाही तर वॅक्सिंग दरम्यान राहिलेले केसदेखील निघून जाण्यास मदत होते. तसंच केसांची वाढदेखील हळूहळू होते. 

वॅक्सच्या आधी काही दिवस शेव्हिंग करू नका

Shutterstock

शेव्हिंग केल्याने केस लवकर येतात. तसंच काही दिवसांनी तुम्ही जेव्हा वॅक्स करायला जाता तेव्हा हे केस काढून टाकण्यास खूपच त्रास होतो. पण जेव्हा शेव्ह करणं गरजेचं असेल तेव्हा वॅक्स करण्याच्या आधी किमान दोन आठवडे शेव्ह करा. यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होऊ शकते. शेव्हिंगमुळे इनग्रोन हेअर वाढतात. पण तुम्हाला वॅक्सिंगचा जास्त  काळापर्यंत परिणाम हवं असेल तर तुम्ही हे करण्यापासून सहसा वाचा. 

अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रीमपैकी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या

मॉईस्चराईजर अत्यंत गरजेचं आहे

Shutterstock

त्वचेला हायड्रेट करणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ सॉफ्ट आणि मुलायम त्वचेसाठी अर्थात चांगल्या वॅक्सिंगसाठी त्वचा हायड्रेट असणं अत्यंत आवश्यक आहे. कोरड्या आणि फाटलेल्या त्वचेमुळे वॅक्सदरम्यान केस तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे केस लवकर येतात आणि तुम्हाला मग लवकर वॅक्स करावं लागतं. 

जास्त कालावधीचा करा विचार

बऱ्याचदा तुम्ही लवकर आणि सोपं म्हणून शेव्ह करता. पण तुम्ही शेव्हिंग न करता दर महिन्याला केवळ वॅक्सिंग केलंत तर तुमच्या केसांची वाढ आपल्या आपण कमी होईल. त्यामुळे तुम्ही वाट पाहणं गरजेचं आहे. तुम्ही वरचेवर शेव्हिंग करण्यापेक्षा वॅक्सिंग करा. जास्त काळ वॅक्सिंग टिकून राहण्यासाठी तुम्ही पूर्ण ग्रोथ झाल्यानंतच वॅक्सिंग करा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY सौंदर्य