मेकअप

DIY: तुमची फेव्हरेट लिपस्टिक अचानक तुटली, तर करा तिचा असा वापर

Trupti Paradkar  |  Nov 18, 2019
DIY: तुमची फेव्हरेट लिपस्टिक अचानक तुटली, तर करा तिचा असा वापर

लिपस्टिक हा प्रत्येकीचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे प्रत्येकीच्या बॅगेत तिची एकतरी फेव्हरेट लिपस्टिक असतेच. कधी कधी एखाद्या लिपस्टिकचा रंग तुम्हाला फारच आवडतो म्हणून ती तुमची फेव्हरेट असते. तर कधी कधी एखादी लिपस्टिक तुम्हाला कोणीतरी स्पेशल व्यक्तीने गिफ्ट केलेली असते त्यामुळे तुमची ती फेव्हरेट असते. काही लिपस्टिकचे रंग आणि ब्रॅंड तुम्हाला एवढे आवडतात की वर्षानूवर्ष तुम्ही ते पुन्हा पुन्हा विकत घेता. मात्र तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का ? तुमची एखादी फेव्हरेट लिपस्टिक वापरण्याआधीच तुमच्या हातातून पडते आणि तुटून जाते. जर तुमच्या फेव्हरेट लिपस्टिकबाबत असं काही घडलं तर सहाजिकच तुम्हाला फारच वाईट वाटतं. पण काळजी करू नका. कारण तुम्ही तुमच्या तुटलेल्या लिपस्टिकचा पुन्हा वापर करू शकता.यासाठी या सोप्या टिप्स जरूर वाचा. 

shutterstock

तुटलेल्या लिपस्टिकचा असा करा पुर्नवापर –

तुमच्या तुटलेल्या लिपस्टिकला टाकून न देता तिचा पुन्हा वापर कसा करायचा यासाठी या टिप्स जरूर वाचा. 

– जर लिपस्टिक लावताना तुमची लिपस्टिक तुमच्या हातून तुटली तर मुळीच काळजी करु नका. ती लिपस्टिक टाकून देण्यापेक्षा त्या लिपस्टिकचा तुटलेला भाग एका धातुच्या चमच्यामध्ये घ्या आणि वितळवा. तुमच्याकडील एखाद्या जुन्या लिपबामच्या डबीत अथवा बाजारात मिळणाऱ्या टॅव्हल किटच्या छोट्या डब्यांमध्ये तो भरून ठेवा. अशी डबीत भरून  ठेवलेली लिपस्टिक तुम्ही लिपब्रशच्या मदतीने पुन्हा वापरू शकता.

– जर तुम्हाला तुमची लिपस्टिक पुन्हा तुमच्या त्याच लिपस्टिक बुलेटमध्ये भरून वापरायची  असेल तर तिचा तुटलेला भाग पुन्हा त्या लिपस्टिक बुलेटमध्ये टाकून त्या भागाला लायटर अथवा मेणबत्तीने थोडं गरम करा. या उपायाने तुमची तुटलेली लिपस्टिक पूर्वीसारखी होईल. फक्त ती वापरताना तुम्हाला आधीपेक्षा थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. 

– तुमच्याकडील तुटलेल्या एक ते दोन रंगाच्या लिपस्टिक मिसळून एक वेगळ्याच रंगाची लिपस्टिक तयार करा.   जर तुमच्या दोन्ही लिपस्टिकचं मटेरिअल वेगवेगळं असेल तर त्यामध्ये थोडं व्हॅसलिन त्यामध्ये मिसळा. ज्यामुळे तुमच्याजवळ एखादी नवीन रंगाची लिपस्टिक तयार होईल. जर तुम्ही एखाद्या त्यात तुमच्याजवळील मॅटॅलिक आयशॅडो वापरलं तर त्यामुळे मॅटॅलिक फिनिश लिपस्टिक तयार होऊ शकते. 

– तुमच्याकडची लाल अथवा ऑरेंज लिपस्टिक जर अचानक तुटली तर तुम्ही त्याचा वापर स्कीन करेक्टर म्हणून वापर करू शकता. यासाठी तुमची तुटलेली लिपस्टिक एखाद्या छोट्या डबीत भरून ठेवा. मेकअप करताना ती तुमच्या डार्क सर्कल्स अथवा चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा. त्यावर तुमचं फाऊंडेशन अथवा कन्सिलर लावा. बोटांनी ते व्यवस्थित ब्लेंड करा. रेड आणि ऑरेंज कलर नैसर्गिक रंग असल्याने त्यामुळे तुमचे डार्क सर्कल्स अथवा इतर डाग झाकले  झाकले जातात.

– जर तुमची लिपस्टिक शिमर टेक्शरची असेल अथवा गुलाबी रंगाची असेल तर तिचा वापर तुम्ही हायलायटर अथवा ब्लशरप्रमाणे वापरू शकता. तुटलेली लिपस्टिक छोट्या डबीत भरून ठेवा आणि मेकअप करताना ब्रशने ती तुमच्या चिकबोन्स अथवा गालावर लावा. बोटांच्या मदतीने ती व्यवस्थित स्कीनमध्ये ब्लेंड करा. ज्यामुळे तुमचा लक परफेक्ट दिसेल.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या क्लिक करा.

अधिक वाचा –

ओठांवरील लिपस्टिक काढण्याच्या या आहेत योग्य पद्धती

लिपस्टिकचा रंग निवडताना करा या गोष्टींचा विचार

नखांचे सौंदर्य वाढवणाऱ्या नेलपॉलिशचा असा लागला शोध

लिपस्टिकचे फायदे

तुमच्यासाठी लिपस्टिकची निवड करताना लक्षात घ्या या गोष्टी

Read More From मेकअप