आरोग्य

डोळ्यांचा ताण आणि जळजळ कमी करण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

Trupti Paradkar  |  Jan 3, 2022
How to reduce or prevent eye strain tips in Marathi

डोळे हा आपल्या व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचा भाग आहे. डोळ्यांमधून माणूस त्याच्या भावना व्यक्त करत असतो. शिवाय काम करताना सतत डोळ्यांचा वापर केला जातो. आजकाल सर्व कामं मोबाईल, लॅपटॉप आणि कंम्युटरवर होतात. शिवाय मनोरंजनासाठी टीव्ही आणि मोबाईल सतत वापरला जातो. ज्यामुळे नकळत डोळ्यांवर अती ताण वाढत जातो. जर तुम्ही दिवसभरात दहा ते बारा तासांच्या वर मोबाईल वापरत असाल तर डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी काही घरगुती उपाय करून तुम्ही डोळ्यांवरचा ताण दूर करू शकता.

कसा दूर कराल डोळ्यांवरील ताणतणाव

डोळ्यांवर ताण आला की डोळे लाल होणे, जळजळणे असा त्रास जाणवू लागतो. अशा वेळी काही सोपे घरगुती उपाय तुमच्या डोळ्यांचा ताण कमी करण्यास मदत करतात.

थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या

काम करताना सतत मोबाईल अथवा लॅपटॉप वापरावा लागत असेल तर तुम्ही काही वेळाने ब्रेक घेऊन डोळ्यांना आराम देऊ शकता. दर एक तासाने वीस सेंकदासाठी अशा उपकरणांपासून दूर पाहा आणि डोळ्यांवर ताण येणार नाही याची काळजी घ्या.

डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी सोपे डोळे दुखणे घरगुती उपाय (Home Remedies For Eye Pain)

डोळ्यांचा व्यायाम करा 

डोळ्यांचा व्यायाम करणे हा डोळे निरोगी राखण्याचा सोपा मार्ग आहे. यासाठी दर एक तासाने वीस सेंकदासाठी डोळ्यांची उघडझाप करा अथवा वीस फूट लांब नजर टाका. डोळ्यांना व्यायाम देण्यासाठी आय रोल, स्लो ब्लिंक, फोकस चेंज, क्लोज अॅंड ओपन असे व्यायाम नक्कीच उपयुक्त ठरतात.

कामाचा अती ताण घेऊ नका

सध्या कामाचा ताण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कामाच्या चिंतेमुळे डोळ्यांवर येणारा ताण वाढत जातो. शिवाय सध्या अनेक लोक अजूनही वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे स्क्रीन टाइम वाढलेला आहे. यासाठीच कामाचा ताण शक्य तितका दूर ठेवा कारण त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते. नाश्ता करताना, जेवताना, वॉक करताना मोबाईल पासून दूर राहा आणि प्रत्येक अॅक्टिव्हिटीचा आनंद घ्या. ज्यामुळे तुमचा कामाचा आणि डोळ्यांवरचा ताण कमी होईल.

डोळे जळजळ उपाय, करा सोप्या पद्धतीने (Dolyana Khaj Yene Upay)

झोप पूर्ण घ्या

जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे आजकाल झोपेची वेळ साधणे आणि शांत झोप मिळणे कमी झाले आहे. जर तुम्ही जास्त वेळ मोबाईल, लॅपटॉप वापरत असाल तर वेळेत झोपणे आणि शांत झोप घेणे तुमच्यासाठी जास्त गरजेचं आहे. कारण असं न केल्यास तुमच्या मेंदूचे आणि डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते.

मानसिक ताण कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय (Relieve Mental Pressure In Marathi)

कॉफी कमी प्या

कामाचा थकवा दूर करण्यासाठी अनेकांना सतत कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीमुळे पटकन तरतरी येते आणि थकवा दूर झाल्यासारखा वाटतो. मात्र कॉफीमुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होते. अती प्रमाणात कॉफी पिण्यामुळे डोळे जळजळात आणि सूजतात. यासाठी दिवसभरात एक अथवा दोनदाच कॉफी प्या. शिवाय संध्याकाळनंतर कॉफी पिणे टाळा. कारण त्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. 

Read More From आरोग्य