DIY सौंदर्य

थंडीत आलेले पिंपल्स का दुखतात, जाणून घ्या

Leenal Gawade  |  Nov 8, 2021
थंडीत पिंपल्स का दुखतात

पिंपल्स येण्यासाठी कोणता काळ किंवा दिवस नसतो. त्यांना ज्यावेळी यावेसे वाटते त्यावेळी चेहऱ्यावर नको असलेल्या ठिकाणी पिंपल्स अगदी हमखास डोकावतात. खूप जणांना पिंपल्स आले की ते दुखतात. पण थंडीत आलेले पिंपल्स हे तुलनेने थोडे अधिक दुखतात.थंडीत आलेले पिंपल्स का दुखतात? त्याचा त्रास कमी करण्यासाठी पिंपल्स लवकर घालवण्यासाठी काय उपाय करायला हवे ते जाणून घेऊया. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही.

त्वचा असते कोरडी

थंडीत आलेले पिंपल्स

थंडीत पिंपल्स आले असतील तर ते अधिक दुखतात. यामागेही काही कारणं असतात. ती कारण कोणती दे जाणून घेऊया. 

  1. थंडीमध्ये त्वचा कोरडी झालेली असते. त्यामुळे पिंपल्स आल्यानंतर त्वचा ही ताणली जाते. पिंपल्स आल्यानंतर  ताणलेली त्वचा अधिक त्रास देऊ लागते. पिंपल्स जेवढा मोठा होतो तेवढा तो अधिक त्रास देतो. 
  2. थंडीमध्ये अगदी काहीही लागले तरी देखील खूप त्रास होऊ लागतो. त्यात जरा पुरळ आले की ते अधिक दुखतात. 
  3. थंडीमध्ये त्वचेमधील मॉईश्चर कमी झालेले असते. त्यामुळेही त्वचा अधिक दुखावली जाते. 
  4. पिंपल्स येणाऱ्या ग्रंथी यांच्यामध्ये थोडासा बदल झाला तरी देखील त्याचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे हे पिंपल्स मोठेही होतात. त्याचा त्रास होणे स्वाभाविक असते. 
  5. थंडीमध्ये त्वचा रिपेरिंगचा कालावधीही मंद झालेला असतो. त्यामुळे ते बरे होण्यासाठी बराच वेळ जातो. अशा पिंपल्सचा पॉप केले किंवा फोडले तर आजुबाजूचा भाग लाल होऊ लागतो. त्यामुळेही हे पिंपल्स दुखू लागतात.

अशी घ्या काळजी

जर तुम्हाला सतत पिंपल्स येण्याचा त्रास होत असेल आणि थंडीत तुमचे पिंपल्स अधिक दुखत असतील तर तुम्ही काही काळजी देखील घ्यायला हवी.

  1.  थंडीत गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर ती आंघोळ करुन झाल्यानंतर त्वचा कोरडी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आंघोळीनंतर तुम्ही मॉश्चरायझर लावायला विसरु नका. 
  2. पिंपल्स आल्यानंतर त्यावर बर्फाचा शेक द्या. वातावरणातील थंडी आणि बर्फाचा थंडपणा यामुळे पिंपल्सच्या आजुबाजूची सूज कमी होण्यास मदत मिळते. 
  3. पिंपल्स आल्यानंतर त्याला न फोडता त्याला कमी करण्यासाठी तुम्ही ऑईन्मेंट लावा. त्यामुळेही पिंपल्स कमी होण्यास मदत मिळते.
  4. शक्य असेल तर या दिवसात आठवड्यातून एकदा तरी वाफ घ्या. त्यामुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स उघडतात आणि त्यामुळे त्वचा स्वच्छ करण्यास मदत मिळते. 

आता थंडीत आलेल्या पिंपल्सची अशा पद्धतीने काळजी घ्या. तुम्हाला नक्की बरे वाटेल.

अधिक वाचा

संवेदनशील त्वचेसाठी 3 महत्त्वाचे घटक, घेतील त्वचेची काळजी

ब्लॅकहेड्स काढताना करू नका या चुका, त्वचेची घ्या काळजी

पिंपल्स कमी करण्यासाठी वापरा तुतीची पाने, जाणून घ्या फायदे

Read More From DIY सौंदर्य