लाईफस्टाईल

सोप्या घरगुती उपायांनी घालवा कपड्यांवरील जिद्दी डाग

Dipali Naphade  |  Sep 19, 2019
सोप्या घरगुती उपायांनी घालवा कपड्यांवरील जिद्दी डाग

आपले कपडे आपल्याला खूपच आवडतात. पण त्या तुमच्या प्रिय कपड्यांवर डाग पडला तर? या कल्पनेने पण नकोसं होतं. पण कधीतरी घाईगडबडीत किंवा खाताना स्वतःच्या चुकीमुळे अथवा दुसऱ्यांच्या चुकीने आपल्या आवडत्या कपड्यांवर डाग पडतातच. डाग पडल्यावर आता हा ड्रेस खराबच राहणार का? असंं वाटू लागतं. पण नाही. तुम्ही तुमच्या कपड्यांवरील डाग घरगुती उपाय करून काढून टाकू शकता.  इतर कपड्यांबरोबरच आपल्याला सर्वांनाच पांढरे कपडेही खूप आवडतात. पण त्यांना सांभाळणं खूपच कठीण वाटतं. अनेकदा पांढऱ्या कपड्यांचा रंग पिवळा पडतो. त्याची चमक नाहीशी होतो. पण ही चमक परत आणण्यासाठी आणि कपड्यांवरील डाग काढून टाकण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. तुम्ही ते घरी नक्की करून पाहा. जाणून घेऊया काय आहेत उपाय – 

तेलकट डागांसाठी टाल्कम पावडर

Shutterstock

तुम्हाला हा उपाय वाचून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण हा प्रयोग नक्की करून पाहा. तुमच्या कोणत्याही कपड्यावर जर तेलकट डाग लागले असतील तर तुम्ही त्या कपड्यावर डाग पडलेल्या ठिकाणी टाल्कम पावडर चोळा. त्यानंतर पूर्ण एक दिवस हा कपडा टाल्कम पावडर लावून तसाच ठेऊन द्या. दुसऱ्या दिवशी कपडा धुवा आणि पाहा जादू! असं केल्याने तुमच्या कपड्यांना लागलेला तेलकट डाग नक्कीच निघून गेला असेल. 

लिंबाची जादू!

Shutterstock

लिंबामध्ये असणारं विटामिन सी हे ज्याप्रमाणे आपल्या शरीराला पोषक ठरतं तसंच त्याची जादू डाग लागलेल्या कपड्यांवरही चालते. अगदी तुमच्या कपड्यांवर न जाणारे पानाचे डाग जरी असतील तरी त्या डागावर लिंबू कापून काही वेळ चोळावे. थोडा वेळ हा कपडा तसाच राहू द्यावा. त्यानंतर कपडा स्वच्छ पाण्यातून धुवा. तुम्हाला तुमच्या कपड्यांवरील डाग निघून गेलेला दिसेल. 

चेहरा क्लीन आणि चमकदार बनवण्यासाठी 10 घरगुती उपाय

टूटपेस्ट आणि डिटर्जंटची कमाल

Shutterstock

कपड्यांवर पडलेल्या डागांवर टूथपेस्ट लावून ठेवा. ती त्या डागांवर सुकू द्या. टूथपेस्ट सुकल्यावर तुम्ही त्यावर डिटर्जंट लावून धुवा.  डाग निघण्यासाठी याचा उपयोग होतो. टूथपेस्ट आणि डिटर्जंटचं कॉम्बिनेशन कपड्यांवरील डाग काढायला मदत करतं. तसंच हे कॉम्बिनेशन इतकं कमाल करतं की, कपड्यांवर डाग पडला होता हे जाणवूदेखील देत नाही. 

टर्पेन्टाईनने जातात ग्रीससारखे जिद्दी डाग

Shutterstock

ग्रीस लागल्यानंतर कपड्याचे डाग जाणारच नाहीत असं म्हटलं जातं. पण असं अजिबात नाही. ग्रीससारखे जिद्दी डागही टर्पेन्टाईन लावल्याने निघून जातात. तसंच सायकल ऑईलचे डाग  असतील तर निलगिरीच्या तेलाने हे डाग काढून टाकण्यास फायदेशीर ठरतात.  

Dark Circles दूर करा घरगुती उपायांनी!

शाईच्या डागावर लिंबू आणि मीठ गुणकारी

Shutterstock

बऱ्याचदा कळत नकळत अंगावर बॉलपेन अथवा शाईचा डाग लागतो. पण मग हा डाग कसा घालवायचा तर यासाठी गुणकारी उपाय म्हणजे लिंबू आणि मीठ. शाईच्या डागावर लिंबू आणि मीठ चोळून काही वेळ कपडा तसाच ठेवून द्या. नंतर हा कपडा व्यवस्थित धुतल्यावर यावरील डाग निघून गेल्याचं तुम्हाला दिसून येईल. 

हळदीच्या डागासाठी वापरा व्हिनेगर

Shutterstock

हळदीचा डाग कधीही जात नाही असं म्हटलं जातं. पण यावर उपाय म्हणजे व्हिनेगर. तुम्ही हळदीचा डाग असणाऱ्या ठिकाणी व्हिनेगर किंवा लिंंबू लावा आणि नंतर कपडे धुण्याच्या पावडरने कपडे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवा. हळदीचे डागही तुम्हाला कपड्यांवर दिसणार नाहीत. 

कच्च्या बटाट्याने जातो चिखलाचा डाग

Shutterstock

कच्चा बटाटा हा डाग घालवण्यासाठी उपयुक्त आहे. कपड्यांवर चिखलाचा डाग लागला असेल तर तो पहिले नीट स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर त्यावर कच्चा बटाटा घासा. थोड्या वेळाने कपडा साबणाने धुऊन टाका. तुमच्या कपड्याला लागलेला चिखलाचा डाग निघून स्वच्छ कपडा तुम्हाला मिळेल. 

आता Underarms मध्ये दिसणार नाहीत काळे डाग…घालवा ‘अशा’ पद्धतीने

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

Read More From लाईफस्टाईल