उन्हाची काहिली वाढली की, थंड हवेचे ठिकाण चांगलेच डिमांडमध्ये येतात. देशात फिरण्यासारखी बरीच थंड हवेची ठिकाणं असली तरी देखील सध्या कोरोना काळात खूप जणांना महाराष्ट्राबाहेर जाणे ही नको झाले आहे. आता महाराष्ट्रात फिरण्यासारखे सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ‘महाबळेश्वर’. जवळ आणि बजेटमध्ये बसणारे असे ठिकाण म्हणून तुम्ही महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणं असलेल्या महाबळेश्वरची निवड केली असेल तर या सफरीदरम्यान तुम्ही नेमक्या कोणत्या चुका टाळायला हव्यात या जाणून घेऊया. म्हणजे महाबळेश्वरला गेल्यानंतर तुमचे पैसे नको त्या कारणामुळे वाया जाणार नाही.
यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील या ठिकाणांना द्या भेट
फिरण्याचा वेळ आणि ठिकाणं
महाबळेश्वरमधील आर्थर पॉईंट
महाबळेश्वर म्हटले की, आर्थर पॉईंट, इको पॉईंट,एलिफंट हेड पॉईंट, सनसेट पॉईंट, विल्सन पॉईंट, केट्स पॉईंट, महाबळेश्वर मंदिर असे सगळे पॉईंट मिळून 20 तरी पॉईंटस होतात. हे सगळे पॉईंटस एकमेकांपासून फारच जवळ आहे. जर तुम्ही तेथे गेल्यावर गाडी करत असाल तर तुम्हाला हे सगळे पॉईंट एकाच फेरीत दाखवतात. जर तुमच्यासोबत वृद्ध माणसं असतील तर तुम्हाला हे सगळे करण्यासाठी थोडा वेळ नक्कीच जातो. त्यामुळे या पॉईंटसचा आनंद ऊन येण्याआधी घ्यायचा असेल तर तुम्ही सकाळी थोडं लवकर निघा. म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. पहिला दिवस हा तुम्ही सगळे पॉईंटस बघून घालवा. त्याला साधारण संध्याकाळचे 4 तरी नक्कीच वाजतात
दुसरा दिवस हा तुमचा संपूर्ण किल्ला बघण्यासाठी घालवाल तर फारच उत्तम कारण महाबळेश्वरला येऊन जर तुम्ही प्रतापगड पाहिला नाही तर काहीच अर्थ नाही. महाराजांची शान असलेला प्रतापगड पाहायलाच हवा असा आहे. सकाळी तुम्ही गडाची सफर सुरु केली तर संपूर्ण गड शांत फिरेपर्यंत आणि सगळी माहिती घेईपर्यंत दुपारचे 1 वाजतात. त्यानंतर काही पाहणे शक्य नसते. गड उतरुन जेवणे आणि आराम करणे हेच उत्तम असते.
तिसऱ्या दिवशी तपोला लेक आणि पाचगणी फिरवली जाते. तपोला लेक हे मार्केटपासून साधारण 1 ते 1.30 तासांच्या अंतरावर आहे. घाटमाध्याचा रस्ता असल्यामुळे खूप जणांना याचा त्रास होतो. ज्यांना समुद्र सफरीची सवय असेल त्यांन तपोला अजिबात आवडणार नाही. या ठिकाणी फक्त बोटींग केली जाते. जर तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसा या ठिकाणी घालवायचा नसेल तर तुम्ही हे ठिकाणं नाही फिरलात तरी चालू शकेल. त्यामुळे पैसे आणि वेळ दोन्ही वाचतील. त्या ऐवजी तुम्ही पाचगणीची सफर करु शकता. घोडेस्वारी, मॅप्रोमध्ये तुम्हाला तुमचा निवांत वेळ घालवता येईल. त्यानंतर तुम्ही परतीचा प्रवास सुरु करु शकता.
समुद्र आवडत असेल तर कोकणातील देवबाग आहे तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण
राहण्याचे ठिकाणं
महाबळेश्वरमध्ये अगदी पावला पावलाला हॉटेल्स आहेत. अगदी 500 रुपयांपासून तुम्हाला या ठिकाणी हॉटेल्स मिळतात. तुम्ही तुमच्या बजेटनुसार थोडासा सर्च करुन हॉटेल निवडा. जर तुम्ही अचानक प्लॅन केला असेल तरी देखील तुम्हाला तेथे बरीच हॉटेल्स मिळू शकतील. अगदी स्वस्तापासून महागड्या फाईव्ह स्टार हॉटेल्सपर्यंत या ठिकाणी बरीच हॉटेल्स आहेत. जर तुम्ही मित्रांचा ग्रुप असाल तर तुमचा पैसा तुम्ही फार महागड्या हॉटेल्समध्ये घालवू नका. उत्तम सोयीचे होम स्टेही तुमच्यासाठी बेस्ट आहेत.
जेवण
गावरान कोंबडी आणि ज्वारीची भाकरी
एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे म्हणजे तेथील खासियत असलेल्या गोष्टी चाखणे हे सगळ्यात महत्वाचे असते. जर तुम्ही तिथे जाऊनही चायनीज किंवा पंजाबी जेवणाचा आनंद घेणार असाल तर तुम्ही महाबळेश्वरच्या खऱ्या जेवणाचा आनंद अनुभवणार नाही. मस्त बाजरीची गरम गरम भाकरी, पिठलं, गावरान कोंबडा, भरलेलं वांग, भरताचं वागं आणि अख्खा मसूर मसाला ही तेथील खासियत आहे. ती तुम्ही खायलाच हवी. येथे मिळणाऱ्या बाजरीची भाकरी तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही अशी आहे. एकदम वाजवी दरात हे जेवण आणि आनंद दोन्ही मिळतो.
स्ट्रॉबेरीचा प्रदेश अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरला गेलात आणि तुम्ही स्ट्रॉबेरी खाल्ली नाही असे कसे होईल. तेथे गेल्यानंतर तुम्ही भरपूर स्ट्रॉबेरीज खा. स्ट्रॉबेरीजपासून तयार केलेले स्ट्रॉबेरीज क्रिमही खा. तर तुमचा हा प्रवास खऱ्या अर्थाने पूर्ण होईल.
सांदण दरी (Sandan Valley) एक थरारक अनुभव
खरेदी
खूप जणांना जेथे जाऊ तेथे खरेदी करायची सवय असते. पण काही ठिकाणी तुम्ही ही खरेदी नाही केली तरी चालू शकेल. महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी आणि मॅप्रो गार्डन वगळता खरेदी करण्यासाठी बाजार असला तरी देखील अशा काही वेगळ्या गोष्टी मिळत नाहीत ज्या तुम्ही घ्यायलाच हव्यात अशा आहेत. या ठिकाणी तुम्ही स्ट्रॉबेरीजची खरेदी जरुर करा. याशिवाय काही सिरप आणि ज्युस पण त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा पैसा नको त्या गोष्टीवर खर्च करु नका.
आता महाबळेश्वरला जाण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवा आणि प्लॅन करा.