सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. दुसऱ्यांच्या लग्नाला जायचे म्हणजे खूप खर्च करुनही चालत नाही. पण लग्न कोणाचेही असो दिसायचे तर प्रत्येकालाच सुंदर असते. अशावेळी क्विक ग्लो हवा असेल तर खूप जण शीट मास्कचा उपयोग करतात. पूर्वी शीट मास्क हे फार कमी मिळत होते. म्हणजे त्यामध्ये इतके ब्रँड आणि प्रकार नव्हते. पण आता बाजारात कितीतरी कंपन्याचे शीट मास्क मिळतात. तुमच्या त्वचेसाठी कोणते शीट मास्क चांगले आणि ते कसे निवडायचे ते आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. चला करुया सुरुवात
शीट मास्क मधील कंटेट
शीट मास्कमध्ये इतके प्रकार आहेत की एक संपूर्ण स्किन केअर रुटीन होईल इतकी यामध्ये क्षमता आहे. शीट मास्कमध्ये हल्ली वेगवेगळे घटक असतात. तुमच्या त्वेच्या प्रकारानुसार हे घटक बदलत राहतात. उदा. टी ट्री ऑईल, बनाना, ऑरेंज, व्हिटॅमिन E, सी वीड, राईस असे वेगवेगळे घटक त्वचेसाठी वेगवेगळे फायदे देणारे असतात. त्यामुळे तुमच्या त्वचेला या पैकी कोणत्या घटकाचे कोणते फायदे मिळवायचे आहेत ते तुम्हाला माहीत असायला हवेत. तर तुम्ही वापरत असलेल्या शीट मास्कचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त मिळण्यास मदत होते.
घरीच सोप्या पद्धतीने बनवा आय शीटमास्क आणि वाचवा पैसे
शीट मास्कवरील फायदे वाचा
वाचायला खूप जणांना कंटाळा असतो. पण तुम्ही शीट मास्क खरेदी करताना त्यावर लिहिलेली माहिती तुम्ही वाचायला हवी. त्यावर त्यामध्ये असलेले घटक आणि त्याचे फायदे लिहिलेले असतात. काही मास्क हे टायटनिंगसाठी महत्वाचे असते. तर काहींमध्ये असलेले घटक हे त्वचेला केवळ मॉश्चराईज करणारे असतात. तुम्हाला कोणत्या कारणासाठी शीट मास्कचा वापर करायचा आहे त्यानुसार तुम्ही तो निवडायचा असतो. म्हणूनच की काय तुम्ही शीट मास्कवरील सगळ्या गोष्टी नीट वाचायला हवा.
एक्सपायरी बघा
खूप ठिकाणी शीट मास्क ऑफरमध्ये काढले जातात. अशावेळी त्याची एक्सपायरी बघा. कारण एक्सपायर्ड झालेले प्रॉडक्ट त्वचेसाठी हानिकारक ठरु शकतात. त्यामुळे सगळ्यात आधी त्याची एक्सपायरी बघा. शीट मास्कमध्ये इसेंशिअल ऑईल्स असतात. जे तुमच्या त्वचेच्या खोलवर आत जाऊन त्वचा नरिश करत असतात. अशावेळी बाद झालेले प्रॉडक्ट त्वचेसाठी घातक ठरु शकतात. त्यामुळे या गोष्टीची काळजी ही तुम्ही घ्यायला हवी.
प्रवासात कामी येतील असे पिंपल्स पॅच, पिंपल्स सुकण्यास होते मदत
शीट मास्क लावताना
शीट मास्क लावताना देखील तुम्ही तो कसा लावत आहात ते देखील महत्वाचे आहे. हे एक क्विक स्किन केअर ट्रिटमेंट असले तरी देखील तो लावण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. ती अशी की, चेहरा स्वच्छ असायला हवा. चेहऱा स्वच्छ केल्यानंतर तुम्ही त्यावर शीट मास्क लावा. तो साधारण 20 मिनिटे तरी ठेवा. त्यानंतर उरलेले शीट मास्कवरील सीरम चेहऱ्यावर मसाज करुन चोळा. त्यानंतर तुम्ही पूर्ण दिवस चेहरा धुवू नका. कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हे एक मिनी फेशिअल आहे त्यामुळे फेशिअलप्रमाणे तुम्हाला शीट मास्क लावल्यानंतर तुम्ही त्या दिवशी चेहरा धुवू नका.
आता शीट मास्क निवडताना तुम्ही या गोष्टींची काळजी नक्की घ्या.