Planning

लग्नात असा सेट करा सोपा आणि साधा मेन्यू

Leenal Gawade  |  Dec 29, 2020
लग्नात असा सेट करा सोपा आणि साधा मेन्यू

लग्न सोहळ्याइतका मोठा सोहळा कोणाच्याच आयुष्यात नसतो. म्हणूनच लग्न या दिवसाला खूप जास्त महत्व आहे. लग्नाचा हा  सोहळा दिमाखदार असावा असे प्रत्येकाला वाटते. म्हणूनच लग्नात काय करावे आणि काय नको असे होऊन जाते. लग्नात डेकोरेशन, हॉल या सगळ्यांपेक्षा महत्वाचे असते ते म्हणजे जेवण. लोकांनी जेवण छान आहे असे म्हटले की, जिवात जीव येतो. लग्नातील सगळ्यात जास्त पैसा हा जेवणावर खर्च होतो. पण तुम्ही जो पैसा जेवणावर खर्च करत आहात तो खरंच गरजेचा आहे का ? असा विचार तुम्ही कधीतरी केला आहे का?  केला नसेल तर करा. कारण भारंभार मेन्यू ठेवून तो लग्नसोहळा दिमाखदार होतोच असे नाही. साधा सोपा मेन्यूसुद्धा लोकांना तृप्तीचा ढेकर आणि तुमच्या बजेटला थोडी ढिल देऊ शकतो. येत्या काही काळात जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर असा सेट करा साधा सोपा मेन्यू 

डेस्टिनेशन वेडिंग बजेटमध्ये करायचे असेल तर असे करा प्लॅनिग

कोणत्या पद्धतीचे जेवण

Instagram

लग्न हा सर्वस्वी सोहळा आहे. तुम्हाला आणि तुमच्या आप्तेष्टांना काय आवडते? याची माहिती सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच असते. महाराष्ट्रीयन लग्नाचा सोहळा म्हटला की, छान डाळ,भात, पुरी, चपाती, रस भाजी, सुकी भाजी, पापड, लोणचं,कोशिंबीर आणि गोडाचा एक पदार्थ असे ताट आले. हे इतके पदार्थही एका व्यक्तिला पुरेसे असतात. पण तरीही हल्ली चायनीज, चाट, गुजराती, पंजाबी पद्धतीचे जेवण ठेण्याचा घाट अनेकांचा असतो. त्यामुळे होते असे की, एकाच वेळी अनेक पद्धतींचे जेवण असल्यामुळे काय खाऊ काय नको, असे होऊन जाते आणि सगळे काही वाया जाते. तुमच्या बजेटचा आणि लोकांच्या पोटाचा विचार करुन तुम्ही एकाच पद्धतीचे जेवण निवडा.जे निवडणे आणि चाखणे लोकांनाही सोयीस्कर वाटेल. 

डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही ’10’ ठिकाणं आहेत परफेक्ट (Destination Wedding Places In Maharashtra In Marathi)

भारंभार पदार्थ कशाला?

Instagram

अनेकांना खूप खाद्यपदार्थ ठेवले की तो सोहळा शाही वाटेल असे वाटते. पण असे करताना सगळ्यांनाच सगळे पदार्थ चाखता येतील याची खात्री नसते. आठवा एखाद्या लग्नात गेल्यानंतर चायनीज, पंजाबी, गुजराती, महाराष्ट्रीयन अशा सगळ्या पद्धतीचे पदार्थ होते आणि त्यापैकी तुम्ही कोणता पदार्थ निवडला? एकाच वेळी सगळे पदार्थ खाणे शक्य होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला अगदीच सगळ्या कल्चरचा एक एक पदार्थ निवडायचा असेल तर त्याला स्टाटर्स,मेनकोर्स, डिझर्ट अशामध्ये वाटून घ्या. म्हणजे सगळ्या चवी चाखता येतील.

साऊथ इंडियन पदार्थ ठेवणार असाल तर

Instagram

जर तुम्ही साऊथ इंडियन पदार्थांचे चाहते असाल आणि लाईव्ह काऊंटर ठेवणार असाल तर लक्षात घ्या साऊथ इंडियन पदार्थ अनेकांना आवडतात. साधा डोसा, मिनी उत्तपा हे सगळं खाल्ल्यानंतर पोट इतके भरते की, दुसरे काही खाण्याची इच्छा मुळीच होत नाही. जर तुम्ही हे पदार्थ ठेवणार असाल तर काही पदार्थ काढून टाकणेच बरे असते. म्हणजे तुमचे अन्न आणि पैसे दोन्ही वाया जाणार नाही. 

असा असावा मेन्यू

Instagram

लग्नात पानात डावी आणि उजवी बाजू वाढण्यासाठी सगळे पदार्थ हवे असले तरी देखील 7 पदार्थांच्यावर तुमचे ताट असू नये. कारण असेच ताट सुटसुटीत असते. आता या 7 पदार्थांमध्ये तुम्हाला दोन भाज्या, भाताचा प्रकार, आमटी किंवा डाळ, पुरी,नान किंवा रोटी, एखादा गोड पदार्थ आणि तुम्हाला आवडत असलेले एखादे चाट ( ढोकळा चाट, कचोरी, पाणीपुरी, दही पुरी, चना चाट, आलू चाट) असे काहीही म्हणजे चटपचटीत खाणाऱ्यांचीही इच्छा त्यामुळे पूर्ण होते. 

आता साधा सोपा मेन्यू ठेवा लग्नासोबत बजेटही होईल मस्त सेट!

डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी

Read More From Planning