सौंदर्य

केस गळतीवर घरगुती उपाय (How To Stop Hair Fall In Marathi At Home)

Dipali Naphade  |  Apr 10, 2019
How To Stop Hair Fall In Marathi

केसांची गळती ही अशी एक समस्या आहे जी प्रत्येक वयामध्ये तुमच्यासमोर येत असते. कधी कधी ऋतूमधील बदल हेदेखील केसगळतीचं महत्त्वाचं कारण असू शकतं. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार, दिवसातून शंभर केस गळणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. मात्र जेव्हा तुम्हाला वाटायला लागेल की, यापेक्षा केसगळतीची संख्या जास्त आहे, तेव्हा लगेचच यावर उपचार सुरु करा. कारण तसं न केल्यास, तुम्हाला टक्कल पडण्याचीही शक्यता असते. यातून सुटका मिळवायची असल्यास, त्याचे बरेचसे उपाय हे आपल्या घरातच असतात. मात्र आपण घरगुती उपाय करणं बऱ्याचदा नजरअंदाज करत असतो आणि असे उपाय शोधू लागतो जे कमीत कमी वेळेमध्ये केसांच्या गळतीच्या समस्येतून सुटका मिळेल. आपण प्रत्येकाने आरोग्याची आणि केसांची काळजी घेण्यासाठी काही आरोग्यदायी हेल्थ टिप्स फॉलो केल्या पाहिजे. बाजारामध्ये असे कितीतरी अँटी हेअरफॉल शॅम्पू उपलब्ध आहेत किंवा असे अनेक केस गळतीवर घरगुती उपाय (kes galti var gharguti upay in marathi) आहेत ज्यामुळे तुम्ही तुमची केसगळती थांबवू शकता. तुम्हाला काही योगासनांचा आधार घेऊनही केसगळती कमी करता येते.

केस पडणे कारणे
ब्यूटी एक्सपर्ट काय सांगतात
केस गळणे थांबवण्यासाठी योग
केस गळतीवर घरगुती उपाय
अँटी हेयरफॉल शैम्पूची सूची
FAQs

जाणून घेऊया केसगळतीची मुख्य कारणं काय आहेत (Hair Fall Reasons In Marathi)

केसगळती नक्की का होते असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच नेहमी सतावतो. पण याची नक्की कारणं काय आहेत हे आता आपल्याला जाणून घ्यायला हवं. त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे त्याची मुख्य कारणं काय आहेत ते सांगत आहोत. 

तणाव (Stress)

आपल्याला दिवसातून बरीच कामं पूर्ण करायची असतात. याच कारणांमुळे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ताण वाढवून घेतो. हाच तणाव पुढे केसगळतीचं मुख्य कारण बनतो. रोजच्या कामामुळे कधीच ताण येत नाही असं होत नाही. शहरी भागामध्ये राहात असल्यामुळे सतत तणावाखाली राहिल्यामुळे केसगळतीचा जास्त प्रमाणात त्रास होत असतो.

सतत औषधं घेणं (Continous Medicine Intake)

डोकेदुखी झाली खाल्ली पेनकिलर, ताप आला तर खाल्ली पॅरासिटेमॉल किंंवा कोणत्याही आजारामध्ये उपाय म्हणून दिवसातून ४ ते ५ वेळा औषधं घ्यावीच लागतात. या औषधांचा सर्वात पहिला परिणाम हा आपल्या केसांवर होत असतो. त्यामुळे केसगळती होते.

जाणून घ्या केसतोडवर घरगुती उपाय

अनियमित खाणं (Irregular Diet)

जेवणामध्ये फास्ट फूड आणि अनहेल्दी खाणं वाढल्यास, केसगळती होऊ लागते. जेवणामध्ये भाज्या, डाळ, अंड आणि फळांचा समावेश केल्यास, जास्त चांगलं होईल. पण सध्याच्या धावत्या जीवनशैलीमध्ये बऱ्याचदा अनियमित खाणं होत असतं. ज्यामुळे केसांवर सर्वात जास्त परिणाम होत असतो.

मशीन्सचा वापर (Use Of Machines)

केसांमध्ये केमिकल्सचा जास्त वापर केल्यासदेखील केस गळतात. आपण केसांची स्टाईल करण्यासाठी कधी जेल तर कधी हेअरकलर्सचा वापर करत असतो. कधी कधी तर केसांवर कर्लिंग मशीन अथवा स्ट्रेटनिंग मशीनचाही वापर करतो. त्यामुळेदेखील केसगळती होऊ लागते. पण हे थांबवण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे या मशीन्सचा उपयोग करायला हवा. जास्त प्रमाणात मशीन्सचा वापर करून तुम्हीच तुमच्या केसांना हानी पोहचवत असता.

केस गळतीवर घरगुती उपाय (How To Control Hair Fall In Marathi)

शॅम्पूचा वापर करणं तुम्हाला महाग वाटत असेल तर, तुम्ही घरगुती उपायदेखील करू शकता आणि त्यासाठी आमच्याजवळ तुमची केस गळतीवर घरगुती उपाय (kes galti var upay in marathi) बरेच आहेत. झटपट केस वाढवायचे असतील तर नक्की वाचा.

1. लसणीच्या दोन ते तीन पाकळ्या ठेचून घ्या. त्यामध्ये तीन मोठे चमचे नारळ तेल मिक्स करा. हे मिश्रण काही मिनिट्ससाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम करा. त्यानंतर ही पेस्ट 30 मिनट पर्यंत आपल्या केसांमध्ये लावून मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा.

2. कांद्याचे तुकडे करून बाऊलमध्ये ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे अॅलोव्हेरा जेल आणि एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करावे. त्यानंतर ही पेस्ट केसांना मुळांपासून लावून सुकवण्यासाठी ठेवा. अर्धा तास झाल्यानंतर केस शॅम्पू लावून थंड पाण्याने धुवा.

3. तुमच्या केसांच्या प्रमाणात दही घ्या आणि त्याप्रमाणेच मुलतानी माती त्यामध्ये मिसळा. आता याची पातळ पेस्ट करून घ्या. कारण ही पेस्ट ना तुम्हाला तासनतास केसांना लावून ठेवायची आहे ना त्याने मालिश करायचं आहे. ही पेस्ट तुम्हाला शॅम्पूप्रमाणे केसांना लावून केस धुवायचे आहेत. तुम्हाला हवं असल्यास, त्यानंतर कंडिशनरचा उपयोग करू शकता. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा आपल्या केसांवर करू शकता आणि तसं केल्यास, त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.

4. नारळाच्या तेलात कापूर आणि कोथिंबीर घालून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर २० मिनिट्स ही पेस्ट केसांवर ठेवून द्या आणि त्यानंतर केसांना थंड पाण्याने धुवा. केस धुण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्ही केसांना हॉट टॉवेल स्टीमदेखील देऊ शकता. त्यामुळे केसांचे मूळ मजबूत होतील.

ब्यूटी एक्सपर्ट काय सांगतात (What Beauty Experts Say About Hair Fall)

ब्युटी एक्सपर्ट स्मिता घोसाळकरशी आम्ही यासंदर्भात चर्चा केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केसगळती थांबवण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी शॅम्पूबरोबरच तेल लावणंही महत्त्वाचं आहे, केसांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स. लक्षात ठेवा की, नेहमी केसांच्या टेक्स्चरप्रमाणेच तेल लावावं. जसं कोरड्या केसांसाठी नेहमी जास्त तेल घ्यावं. त्यासाठी तुम्ही बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचं तेलही वापरू शकता जे अधिक चांगलं आहे. तेल कधीही रात्रभर केसांना लावून ठेऊ नये. केस धुण्यापूर्वी १५ मिनिट्स आधी तेलांना मालिश करावं. त्यानंतर गरम पाण्यानं टॉवेल भिजवून केसांना स्टीम द्यावं आणि शॅम्पूने केस धुवावेत.

एक्सपर्टच्या सांगण्यानुसार, तेलकट केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. धूळ, माती, प्रदूषणाच्या सतत संपर्कात आल्यास केस लगेच तेलकट होतात. तेलकट केसांमध्ये जास्त वेळ जीव राहण्यासाठी, तुम्ही घरच्या घरी पॅक बनवू शकता. बेसनमध्ये दही मिक्स करून घ्या आणि मग तुमच्या केसांना लावा. 20 मिनिट्सनंतर केस शॅम्पूने धुवून टाकावेत. याशिवाय महिन्यातून किमान दोनवेळा तेलाने मालिश करावे.

केसांमध्ये चमक आणायची असल्यास, तुम्हाला सतत पार्लरच्या फेऱ्या मारायची गरज नाही. त्यासाठी तुम्ही फक्त दह्यात एक केळं घालून मिक्सरमधून काढावं आणि त्याची पेस्ट करून केसांवर लावावी. 20 मिनिट्सने केस धुवून टाकावेत.

केस गळणे थांबवण्यासाठी 5 योगासनं (Yoga To Stop Hair Fall)

सध्याच्या जीवनशैलीमध्ये वेळेआधीच केस पांढरे होणे, केसांची गळती जास्त प्रमाणात होणे यासारख्या समस्या उभ्या राहातात. चिंता, हार्मोन्समधील असमतोलता, खाण्याच्या चुकीच्या सवयी ही सर्वच केसगळतीची मुख्य कारणं आहेत. पण तुम्ही रोजच्या आयुष्यात योगसाधना करून ही समस्या आपल्यापासून लांब ठेऊ शकता. योग करण्यामुळे केसांपर्यंत रक्तप्रवाह योग्य प्रकारे पोहचतो आणि मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या या सर्वांपासूनही सुटका मिळते. आपण पाहूया कोणते ते 5 योगप्रकार आहेत, ज्यामुळे तुम्ही केसगळतीपासून सुटका मिळवू शकता.

1. भुजंगासन (Bhujangasana)

सतत पित्त होत असेल तरीही केसगळती होते. त्यामुळे पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही रोज भुजंगासन करावं. हे केसगळती थांबवण्यासाठी फायदेशीर ठरतं.  

2. पवनमुक्तासन (Pawanmuktasana)

या आसानामुळे पोटातील गॅस निघून जाऊन आपली पचनशक्ती सुधारते. त्यामुळे पोटात जास्त प्रमाणात चरबी साठून न राहाता योग्य प्रकारे केसांनाही रक्तपुरवठा चालू राहतो. शिवाय तुमचे स्नायूही मजबूत होतात.

3. वज्रासन (Vajrasana)

वज्रासन केल्यामुळे तुमची पोटातील सर्व समस्या दूर होऊन योग्य प्रकारे तुमच्या शरीराची अन्नपचन क्रिया सुरू राहते. त्यामुळे केसांना आवश्यक अशा पौष्टीक गोष्टी पुरायला मदत होते.  

4. अधोमुख शवासन (Adhomukh Swanasana)

या आसनामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्तसंचार सुरळीत होतो. डोक्याला रक्ताचा उत्तम पुरवठा होऊन थकवा दूर होतो. त्यामुळे तुमचे केस चांगले राखण्यासही मदत होते. शिवाय तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल तर तोदेखील दूर होतो.  

5. सर्वांगासन (Sarvangasana)

या आसनामुळे पचनतंत्र तर सुधारतंच. पण डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे केसगळती, अकाली केस पांढरे होणं यासारख्या समस्या कमी होण्यासाठी मदत होते.

केस गळणे थांबवण्यासाठी उत्कृष्ट अँटी हेअरफॉल शॅम्पू (Best Anti-Hairfall Shampoo)

केसगळती थांबवण्यासाठी अँटी हेअरफॉल शँपू वापरणं ठरतं फायदेशीर. त्यासाठी नक्की कोणते शँपू वापरायला हवेत हे तुम्हाला आम्ही सांगत आहोत. 

सनसिल्क हेअरफाॅल साॅल्युशन शॅम्पू / Sunsilk Hair Fall Solution Shampoo

तुम्हाला जर तुमच्या उशीवर, कारच्या सीटवर अथवा आपल्या खोलीमध्ये सगळीकडे केसच केस दिसत असतील तर समजून जा की, तुम्हाला आता अँटी हेअरफॉल शॅम्पू वापरण्याची गरज आहे. सनसिल्क ब्रँडचे हेअरफॉल सॉल्युशन शॅम्पू गोल्डन कलरच्या एका बारीकशा बाटलीमध्ये मिळतो. सोया विटामिन कॉम्प्लेक्सयुक्त हा शॅम्पू केसांच्या मुळांना मजबूती देतो आणि केसांना दहापट गळण्यापासून रोखतो. याच्या वापरामुळे तुमचे केस केवळ मजबूतच नाही तर पहिल्यापेक्षाही अधिक स्मूथ आणि चमकदार होतील.

लॉरियल टोटल रिपेअर 5 शॅम्पू / L’oreal Total Repair 5 Shampoo

लॉरियल ब्रँडचा हा शॅम्पू गेसगळती, केसांचं दुहेरी होणं, केस कोरडे आणि बेजान असणं आणि केस पातळ होणं या केसांशी संबंधित 5 समस्यांपासून सुटका मिळवून देतो. तसंच केसांची मुळंदेखील यामुळे मजबूत बनतात. याचा वापर रोज केल्यास, केस स्मूथ आणि घनदाट होतात. लॉरियल टोटल रिपेअर 5 शॅम्पूची ही खास गोष्ट आहे की, हा शॅम्पू कोणत्याही केसांना सूट करतो. तुमचे केस स्कल्प ड्राय असोत वा तेलकट हा शॅम्पू तुम्हाला कुठेही निराश करत नाही.

डव डॅमेज थेरपी शॅम्पू / Dove Damage Therapy Shampoo

डव ब्रँड नेहमीच सॉफ्ट त्वचेसाठी प्रसिद्ध आहे. या ब्रँड्सची अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक आहे ते म्हणजे डव डॅमेज थेरपी शॅम्पू. हा शॅम्पू डॅमेज झालेल्या केसांना रिपेअर करून त्यांना पुन्हा नॉरिश करतो. याचा रोज वापर केल्यास, तुमच्या केसांची गळती थांबते. याचं युनिक फॉर्म्युलेशन केसांना मजबूती मिळवून देतं. त्याशिवाय हा शॅम्पू कलरिंग आणि उष्णतेमुळे डॅमेज होणाऱ्या केसांनाही वाचवतो. आपल्या केसांना अधिक चमकदार बनवण्यासाठी तुम्ही डव कंडिशनरदेखील वापरू शकता.

पँटीन अॅडव्हान्स हेअरफॉल सॉल्युशन / Pantene Advanced Hairfall Solution 

पँटीनचा हा शॅम्पू केसांच्या मुळांपर्यंत जाऊन पोषण देतो. याच्या वापरामुळे केस मऊ होतात आणि केसगळतीही थांबते. पँटनच्या  प्रो विटामिन फॉर्म्युलासह यामध्ये तांदळाच्या पाण्याचाही वापर करण्यात आला आहे. त्यामुले केसांना पोषण मिळून केसगळती थांबण्यास  मदत मिळते. यामुळे तुमच्या केसांना चांगली सुरक्षा मिळून तुम्ही केस दिवसभर मोकळे ठेवू शकता.  केसगळतीची समस्या तुम्हाला सतावणार नाही. 

हिमालया अँटी हेअर फाॅल शॅम्पू / Himalaya Anti Hair Fall Shampoo

हिमालयाचा अँटी हेअर फॉल शॅम्पू एक यशस्वी 2- इन -1 फॉर्म्युला आहे जो केसगळती कमी करतो आणि केसांना मुळांपासून पोषण देतो. हिमालयाची सर्व उत्पादनं ही औषधी वनस्पतींपासून बनवण्यात आली आहेत. हा शॅम्पू बनवण्यासाठीही अनेक असरदार औषधी वनस्पतींचा उपयोग करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात खास वनस्पती आहे ती म्हणजे भृंगराज. पूर्वीच्या काळापासूनच आयुर्वेदामध्ये भृंगराज केसांच्या मजबूती आणि केसगळती थांबवण्यासाठी औषध म्हणून वापरात होते. हे केसांना मुळापासून मजबूत करून त्यांना मऊ आणि मुलायम बनवतं.

गळत्या केसांच्या समस्यांसाठी विचारण्यात येणारे प्रश्न आणि उत्तरं/ FAQ’s

1. वेळोवेळी शॅम्पू बदलत राहायला हवा का ?

शॅम्पू वेळोवेळी बदलत राहायला हवा ही गोष्ट अगदी बरोबर आहे. वास्तविक बऱ्याच कालावधीपर्यंत एक शॅम्पू वापरत राहिल्यामुळे तुम्हाला त्या शॅम्पूची सवय होते आणि त्यामुळे हळूहळू शॅम्पूचा परिणाम दिसेनासा होतो. मात्र शॅम्पू बदलण्याचीदेखील एक योग्य वेळ असते. जेव्हा तुम्हाला वाटू लागतं की, तुमचा नियमित शॅम्पू लावल्यानंतरही केसगळती थांबत नाही तेव्हा समजून जावं की, शॅम्पू बदलण्याची वेळ जवळ आली आहे. केस गळण्यासाठी हर्बल शैम्पू वापरुन पाहू शकता.

2. कशाच्या कमतरतेमुळे केस गळतात ?

बऱ्याचदा केसांची गळती हा एक प्रकारचा संकेत असतो. तुमच्या शरीराला संतुलित आणि पोष्टिक आहाराची गरज असल्याचा हा संकेत असतो. आपल्या डाएटमध्ये अंडं, पालक, सिमला मिरची, मसूर डाळ आणि रताळं समाविष्ट करावं. या सर्व पदार्थांमध्ये विटामिन आणि प्रोटीन्स असतात जे केसांना आतून मजबूती देतात आणि केसगळती होण्यापासून थांबवतात.

3. आठवड्यातून किती वेळा केस धुवावे ?

हा प्रश्न बहुतेकवेळा त्या मुलींना जास्त महत्त्वाचा असतो ज्यांचे केस जास्त लांब असतात. कारण लांब केस रोज धुणं अतिशय कठीण असतं. वास्तविक रोज शॅम्पू लावल्याने तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल संपून जातं. ज्यामुळे केस अतिशय कोरडे आणि वाईट दिसतात. केसांच्या योग्य काळजीसाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना शॅम्पू लावणं योग्य आहे. तुमचे केस लहान असतील तर केवळ पाण्याने धुवूनही तुम्ही साफ करू शकता.

4. मुलं आणि मुलींच्या केसांसाठी हेअर फॉल शॅम्पूदेखील वेगवेगळे असतात का ?

असं काहीही नाही. बाजारामध्ये मुलं आणि मुलींसाठी केसगळतीसाठी एकाच प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत. सर्व कंपनी मुलं आणि मुलीच हे उत्पादन वापरणार हे लक्षात ठेवूनच उत्पादनांची निर्मिती करत असतात.

5. केसगळती थांबवण्यासाठी औषधं उपलब्ध आहेत का ?

केसगळती थांबवण्यासाठी बाजारामध्ये बऱ्याच स्वरुपाची औषधं उपलब्ध आहेत. मात्र तुम्ही ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरल्यास, अधिक योग्य होईल. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास, या औषधांनी डोकेदुखी, चक्कर येणं आणि रक्तदाब कमी जास्त होणं अशा स्वरुपाच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

पुढे वाचा – 

How to Stop Hair Falling Out in Hindi

Read More From सौंदर्य