DIY फॅशन

नेटची साडी जपण्यासाठी सोप्या टिप्स, जास्त काळ टिकेल

Dipali Naphade  |  Oct 12, 2021
net saree

लहान मुलींपासून मोठ्या महिलांमपर्यंत साडी हे आऊटफिट सर्वांनाच आवडते. ज्यांना आवडत नाही त्यांनीदेखील कधी ना कधीतरी साडी नेसलेली असतेच. कोणताही सण असो अथवा लग्नसमारंभ असो, घरात पूजा असो पारंपारिक लुकसाठी महिला साडी नेसण्यालाच प्राधान्य देतात. आपल्याकडे साड्यांचे प्रकारही खूपच आहेत. प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या साड्या असतात. तर स्टायलिश लुक दिसण्यासाठी अनेक महिला नेटच्या साड्यांना पसंती देतात. स्टायलिश आणि ट्रेंडी नेट साडी बऱ्यापैकी महाग असते. त्यामुळे नेटची साडी व्यवस्थित जपावी लागते अन्यथा ती खराब होऊ शकते. नेटची साडी जपण्यासाठी सोप्या टिप्स, ज्यामुळे जास्त काळ साडी टिकू शकेल. 

नेटची साडी कशी नेसावी 

Instagram

नेटची साडी (Net Saree) जपण्यासाठी सर्वात पहिले साडी नेसणे आणि ती योग्य तऱ्हेने नेसणे गरजेचे असते. नेटची साडी चुकीच्या पद्धतीने नेसल्यास साडी फाटू शकते. नेटची साडी नेसताना जास्त पिनांचा वापर करू नका. कारण पिन्सचा वापर केल्याने साडी खराब होऊ शकते. तसंच नेटच्या साडीसह तुम्ही अत्यंत साधे दागिने घालावेत. नुसते मोठे कानातले घालूनही तुम्ही तुमचा लुक पूर्ण करू शकता. या साडीवर सहसा बांगड्या घालू नका अन्यथा साडी त्यामध्ये अडकण्याची शक्यता असते.

नेटची साडी धुण्याची योग्य पद्धत 

नेटच्या साडीची काळजी घेण्यासाठी ती योग्य पद्धतीने धुणे गरजेचे आहे. नेटची साडी कधीही तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये धुऊ नका. नेटची साडी धुताना कोणत्याही हार्ड डिटर्जंटचा वापर करू नका. याचा वापर केल्यास साडीचे नेट कडक होते आणि साडीचा रंगही निघून जातो. तसंच नेटची साडी धुतल्यानंतर उन्हात सुकवू नका. हवेमध्ये ही साडी सुकवणे अधिक योग्य आहे. उन्हात सुकवल्यास, साडीचा रंग निघून जातो आणि साडीचे पॉलिश खराब होते. तसंच नेटच्या साडीला इस्त्रीची अजिबातच गरज नाही. पण तुम्ही इस्त्री करणारच असाल तर अधिक गरम इस्त्रीचा वापर करू नका. अन्यथा साडी जळण्याची शक्यता असते. नेटच्या साडीवर सरळ इस्त्रीचा वापर करू नका. या साडीला इस्त्री करताना तुम्ही कॉटनचा वापर करावा. ज्यामुळे साडी खराब होत नाही. 

नेट साडी ठेवण्याची योग्य पद्धत 

नेटच्या साडीला जर चुण्या पडल्या तर त्या लवकर जात नाही. त्यामुळे नेटची साडी व्यवस्थित घडी करून ठेवायला हवी. ज्यामुळे साडीवर कोणत्याही प्रकारे चुण्या पडणार नाहीत. साडीची घडी करताना त्यात बटर पेपर अथवा न्यूजपेपरचा वापर करावा. बटर पेपर अथवा न्यूजपेपरचा वापर केल्याने साडीवर क्रिज अथवा सिल्व्हर येत नाही. साडी हँगरवर न लटकवता बॅगमध्ये ठेवा. जेणेकरून ती अधिक काळ टिकण्यास मदत मिळते. 

अधिक टिप्स 

तुम्हीही कोणत्याही कार्याला नेटची साडी नेसणार असाल अथवा तुम्हाला नेटची साडी विकत घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तरच तुम्ही नेटची साडी अधिक चांगल्या पद्धतीने जपून वापरू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन