Nail Care

नखांची काळजी घेण्यासाठी वापरा ‘या’ टीप्स

Dipali Naphade  |  Mar 17, 2019
नखांची काळजी घेण्यासाठी वापरा ‘या’ टीप्स

हात सुंदर दिसण्यासाठी तुमची नखं सुंदर असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. साफ आणि सुंदर नखं दिसायला जितकी चांगली दिसतात, तितकीच ती तुमच्या शरीरासाठीदेखील फायदेशीर असतात. बऱ्याचदा आपण नखं तर वाढवतो. पण त्या नखांची नीट स्वच्छता राखू शकत नाही. त्याचा परिणाम म्हणजे नखांमध्ये घाण साचते आणि जंतू होतात. ज्यामुळे सर्वात जास्त नुकसान हे आपल्या शरीराचं होतं. त्यामुळे नखं नेहमी स्वच्छ ठेवायला हवीत. पण त्यासाठी आपण बऱ्याचदा पार्लरमध्ये जाऊन मेनीक्युअर करत असतो. हाताबरोबरच नखांची स्वच्छतादेखील मेनीक्युअरमध्ये होते. पण सतत पार्लरमध्ये जाणं प्रत्येकाला परवडतं असं नाही. तुम्ही घरच्या घरीदेखील तुमच्या नखांची चांगली काळजी घेऊ शकता. त्यासाठी आम्ही खास टीप्स आणल्या आहेत. त्याच्या मदतीने तुम्ही तुमची नखं अधिक सुंदर आणि आकर्षक करू शकता.

यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

स्टेप 1– सर्वात पहिले तुमच्याजवळ पेपर फायलर असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नखांवर हे पेपर फायलर सॉफ्टनेसने काम करतं. याच्या मदतीने तुम्ही नखांच्या आत साठलेली घाण हलकेपणाने साफ करू शकता. नखांना साफ करताना कधीही घाई करू नका. अन्यथा नखांमध्ये घाण तशीच राहू शकते.

स्टेप 2– आता थोड्या कोमट पाण्यामध्ये हात घालून नखांना टूथब्रश अथवा एका नेलब्रशच्या सहाय्याने स्क्रब करून घ्या. लक्षात ठेवा की, तुम्हाला फक्त नखांच्या आतमध्येच नाही तर बाहेर आणि क्यूटिकल्ससुद्धा साफ करून घ्यायचे आहेत.

स्टेप 3– यानंतर हात साबणाने नीट स्वच्छ धुऊन घ्या आणि टॉवेलच्या मदतीने नखं नीट सुकवून घ्या.

स्टेप 4– आता एका बाऊलमध्ये गरम पाणी घेऊन कमीत कमी 5 मिनिटांपर्यंत तुमची नखं त्यामध्ये बुडवून ठेवा. त्यानंतर हात बाहेर काढून एक एक नख नीट साफ करून घ्या.

स्टेप 5– आता हात सुकवून त्यावर मॉईस्चराईजर लावा. आवश्यक असल्यास, नखं नेलकटर अथवा नेलक्लिपरच्या सहाय्याने कापून घ्या.

Also Read: Nail Art Designs In Marathi

लक्षात ठेवण्याजोग्या बाबी
– इतक्या सगळ्या गोष्टी करण्याइतका वेळ तुमच्याजवळ नसेल आणि तुम्हाला तरीही आपलं नखं स्वच्छ ठेवायची असतील तर तुम्ही तुमची नखं जास्त वाढवू नका. त्याची उंची कमी ठेवा. कारण लहान नखं असल्यास, जास्त साफसफाई करत राहावी लागत नाही.

– त्याशिवाय तुम्हाला जर नेहमी नेलपॉलिश लावायची सवय असेल तर निदान एक आठवडाभर नखांवर नेलपॉलिश लाऊ नका. त्यामुळे तुमच्या नखांवर पिवळेपणा येणार नाही आणि नखं मजबूत राहतील.

– तुम्हाला जर नखं चावायची सवय असेल तर ही सवय लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे केवळ तुमची नखंच खराब होत नाहीत तर त्यामध्ये गेलेल्या किटाणू अर्थांत जर्म्सचा परिणाम तुमच्या शरारीवर होत असतो हे लक्षात घ्या.

– नखं ही तुमच्या हाताचं सौंदर्य वाढवत असतात. त्यामुळे बऱ्याचदा एक नख तुटल्यावर तुम्हाला नक्कीच त्रास होतो. त्यामुळे नखं जपण्याचा प्रयत्न करा आणि तुटणार नाहीत याची काळजी घ्या. यासाठी एका विशिष्ट उंचीपर्यंत नखं वाढल्यानंतर ती योग्य तऱ्हेने कापून त्याला आकार देण्याचा नेहमी प्रयत्न करा.

– पीठ अथवा अन्य अशा वस्तूंमध्ये तुम्ही हात घालत असल्यास, हात धुताना नखांमध्ये पीठ साचून राहणार नाही याची नेहमी काळजी घ्या.

– कोणतंही नेलपॉलिश लावताना ते आपल्या नखांना योग्यरित्या सूट होतंय की नाही हे पडताळून पाहा. कोणत्याही माहीत नसलेल्या ब्रँडचं नेलपॉलिश वापरून तुमची नखं खराब करून घेऊ नका.

– एक नख तुटल्यानंतर इतर नखं तशीच ठेऊ नका कारण त्याची वाढ तिथपर्यंतच असते. त्यामुळे त्या नखांना पुन्हा एकदा नीट आकारात कापून त्यांची योग्य वाढ होऊ द्या.

– नेलपॉलिश काढल्यानंतर नेहमी नखांना लिंबू लावा. ते विसरू नका.

– शिवाय शरीरामध्ये कॅल्शियम कमी असल्यास नखं तुटतात. त्यामुळे योग्य आहार घ्या. तरच तुमची नखं तुमच्या बोटांचं सौंदर्य वाढवू शकतील.

– कधीही नखांवरील नेलपॉलिश हे खरवडून काढू नका. त्यासाठी नेहमी रिमूव्हरचा वापरच करा.

फोटो सौजन्य – Shutterstock.com

हेदेखील वाचा 

ओठांशिवाय इतरही गोष्टींसाठीही होऊ शकतो व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीचा वापर

नेलपेंटसचे हे १० शेड तुमच्याकडे असायलाच हवेत

पायाच्या सौंदर्यासाठी पेडीक्युअरच्या ‘8’ सोप्या स्टेप्स

 

Read More From Nail Care