DIY सौंदर्य

कानाचे छिद्र झाले आहे मोठे, मग तुमच्यासाठी सोपे घरगुती उपाय

Leenal Gawade  |  Sep 17, 2019
कानाचे छिद्र झाले आहे मोठे, मग तुमच्यासाठी सोपे घरगुती उपाय

हल्ली एकच कानातले सगळ्या कपड्यांवर घातले जातात असे नाही. प्रत्येक ड्रेससोबत किंवा अटायरसोबत त्याला शोभतील असे कानातले घातले जातात. मोठे, लोंबते कानातले दिसायला तर अगदी छानच दिसतात म्हणा. पण अशा कानातल्यांमुळे तुमच्या कानाची छिद्रे मात्र मोठी होतात. पहिल्यांदा काही वाटत नाही. पण कानाचे हेच छिद्र मोठे झाल्यानंतर मात्र काय करु आणि काय नको असे होते. तुम्हालाही तुमच्या कानाचे छिद्र मोठे झाले असे वाटत असेल तर मग तुम्ही अगदी सोपे सोपे उपाय त्या साठी करु शकता.

कानात शिरलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी उपाय

तेलाचा मसाज

shutterstock

कानाचे छिद्र मोठे होते  याचा अर्थ तुमची तेथील त्वचा फाटते. जर ही त्वचा फाटायला नुकतीच सुरुवात झाली असेल तर तुम्ही तुमच्या कानाच्या पाळीला तेल लावायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या बोटावर हे तेल घेऊन कानांच्या पाळीला छिद्राजवळ चोळायचे आहे. तुम्हाला तुमच्या कानांच्या पाळीचा मसाज करायला आहे. तेलामुळे तुमच्या कानाची छिद्र कमी होण्यास मदत तर मिळतेच. शिवाय जर तुमच्या पाळीची त्वचा सैल झाली असेल तर ती कमी होते.  तुम्ही यासाठी ऑलिव्ह ऑईल, जोजोबा ऑईल किंवा व्हिटॅमिन E तेल आणि नारळाच्या तेलाचा उपयोग तुम्ही करु शकता. 

टुथपेस्ट

shutterstock

तुमच्या कानाचे छिद्र कमी करण्यासाठी तुम्ही टुथपेस्टचा देखील वापर करु शकता. तुमच्या कानाच्या मागच्या बाजूला सर्जिकल टेप लावायची आहे. टुथपीकच्या साहाय्याने तुम्हाला तुमच्या कानांच्या छिद्रामध्ये टुथपेस्ट भरायची आहे. टुथपेस्टमध्ये जखमा भरुन काढण्याची क्षमता असते. टुथपेस्ट लावून तुम्हाला तुमच्या कानांच्या छिद्रामध्ये साधारण 8 ते 9 तास ठेवायची आहे. तुम्ही हा प्रयोग रात्री करण्यास काहीच हरकत नाही. सकाळी उठून तुम्हाला तुमचे कान स्वच्छ करायचे आहे.

मध

मधामध्येही जखम भरण्याची क्षमता असते. तुम्हाला तुमचा हात ओला करुन तुम्हाला मध तुमच्या कानाच्या पाळीला लावायचे आहे. मध मुरेपर्यंत तुम्हाला तुमच्या कानांना मसाज कारायचा आहे. तुम्ही आठवड्यातून किमान दोनदा तरी हा प्रयोग करुन पाहायला हवा. तुमच्याकडे ऑरगॅनिक मध असेल तर आणखी चांगले. 

 कानातील मळ असा काढत असाल तर आताच असे करणे थांबवा

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगरमुळेदेखील तुमच्या कानाचे छिद्र लहान होऊ शकते. तुम्हाला एका भांड्यात अॅपल सायडर व्हिनेगर घेऊन कानाच्या छिद्रांना दिवसातून शक्य असेल तितक्यावेळ तुम्हाला ते लावायचे आहे. तुम्हाला हा प्रयोग सुरु ठेवायचा आहे जो पर्यंत तुम्हाला इच्छित असलेला आकार मिळत नाही.  

कानांचा मसाज करुन काहीच मिनिटात घालवा तुमचा stress

पाईल्ससाठी वापरले जाणारे क्रिम

पाईल्सच्या इलाजादरम्यान जखम भरुन निघण्यासाठी जी क्रिम तुम्हाला दिली जाते. त्याचा उपयोगही तुम्ही तुमच्या कानाच्या छिद्रासाठी करु शकता. अगदी किंचितशी क्रिम घेऊन तुम्हाला तेथे लावायची आहे. त्यामुळे तुमची मोठी झालेली छिद्रे भरण्यास मदत होईल. ( पण जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मात्र तुम्ही हे टाळण्यास हरकत नाही. 

तुमच्या कानाचे छिद्र मोठे झाले असेल तर तुम्ही हे काही घरगुती उपाय नक्कीच करुन पाहू शकता. 

***खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY सौंदर्य