DIY सौंदर्य

चमकदार आणि डागविरहित त्वचेसाठी वापरा दह्याचे फेशियल

Dipali Naphade  |  May 10, 2021
चमकदार आणि डागविरहित त्वचेसाठी वापरा दह्याचे फेशियल

चमकदार आणि तजेलदार त्वचा हवी असल्यास, बरेचदा महिला पार्लरमध्ये जाऊन फेशियल (Facial) करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी फेशियल करणे चांगले आहे. पण तुम्ही पार्लरमध्ये जाऊन केमिकलयुक्त फेशियल करण्यापेक्षा घरच्या घरी फेशियल करून तुमची त्वचा अधिक चांगली नक्कीच करू शकता. यामुळे तुमचे पैसेही वाचतात आणि घरगुती फेशियलमुळे चेहरा अत्यंत चांगला राहातो. तुम्ही घरातील गोष्टी वापरून तुमचा चेहरा अधिक सुंदर करू शकता. यामध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे दही. तुमची त्वचा अधिक तरूण दिसण्यासाठी तुम्ही दह्याच्या फेशियलचा (Curd Facial) वापर करून घेऊ शकता.  व्यवस्थित स्टेप बाय स्टेप (step by step) दही वापरून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या हटविण्यसाठीही याचा उपयोग होतो. 

दह्याने कसे कराल फेशियल (how to do curd facial at home)

Shutterstock

आठवड्यातून एक वेळ तरी तुम्ही चेहऱ्यावर दह्याचे फेशियल करायला हवे. नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही याचा वापर करू शकता. त्यामुळे कोणताही दुष्परिणाम तुम्हाला सहन करावा लागत नाही. नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्याने अलर्जीचाही त्रास होत नाही. एखाद्या गोष्टीची अलर्जी असेलच तर  तुम्ही त्याचा वापर करू नये. आपण पाहूया नक्की कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही दह्याचे फेशियल करू शकता. 

क्लिंन्झिंग

सर्वात पहिले चेहऱ्याचा मसाज करा. दोन चमचे दही घ्या आणि त्याने चेहऱ्याला साज करा. त्यानंतर कोमट पाण्यात तुम्ही कापूस भिजवा आणि दही लावलेला चेहरा स्वच्छ करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण आणि धूळ, माती निघून जाण्यास मदत मिळते आणि चेहरा अधिक स्वच्छ होतो. दह्याचे क्लिंन्झिंग अत्यंत फायदेशीर ठरते.

त्वचेची समस्या दूर करण्यासाठी वापरा इन्स्टंट उटणे, त्वचा उजळेल

स्क्रब

Shutterstock

एक चमचा दही आणि अर्धा चमचा त्यात साखर घालून मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावा आणि साधारण 5 मिनिट्सपर्यंत मानेवर आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रबिंग करा. त्यानंतर कोमट पाण्यात स्वच्छ कपडा घालून त्याने चेहरा स्वच्छ पुसून घ्या. चेहरा आणि मानेवरील हा स्क्रब काढून टाका. 

घरच्या घरी फेशियल कसे करावे मराठी माहिती (Facial Steps In Marathi)

फेसपॅक

दह्याच्या फेसपॅकसाठी तुम्ही 1 चमचा दही, 5-6 थेंब बदामाचे तेल, 1 चमचा मेथी दाणे पावडर आणि त्यात अगदी काही थेंब गुलाबपाणी मिक्स करून घ्या. हे मिश्रण तयार झाल्यावर चेहरा, मान आणि हातावर लावा. 10 मिनिट्सनंतरत हलक्या हाताने मसाज करा. पुन्हा काही वेळ तसंच राहू द्या आणि मग ताज्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. सुरकुत्या, काळे डाग, डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळं यामुळे कमी होतात आणि चेहऱ्याला अत्यंत चमकदार आणि तजेलदार बनविण्यास याची मदत मिळते.

 

मॉईस्चराईजिंग

फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावर गुलाबपाणी आणि कोरफड जेल एकत्र करून चेहऱ्याला लावा. काही जणांना कोरफड जेलची अलर्जी असते. पण असं असेल तर फक्त गुलाबपाण्याचा वापर करा. यामुळे तुमचा चेहरा मॉईस्चराईज राहण्यास मदत मिळते. 

या सोप्या फेशियल व्यायामाने येईल चेहऱ्यावर त्वरीत चमक

दह्याचे फायदे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य