Care

केसांसाठी करताय मेंदीचा उपयोग, तर जाणून घ्या कशी करावी मिक्स

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 28, 2019
mehndi mix

प्रत्येकाला सुंदर दिसायला आवडतं. त्यातही आपण सर्वात जास्त काळजी घेतो ती आपल्या चेहऱ्याची आणि केसांची. केस लहान असोत वा मोठे आपल्याला सगळ्यांनाच त्याची काळजी असते. केस सुंदर दिसण्यासाठी त्यावर आपण अनेक प्रयोगही करत असतो. त्यावर अनेक केमिकल्सचा वापरही करतो. पण त्यामुळे लवकर केस पांढरे होण्याचीही शक्यता असते. काही जणींना केसांना रंग लावण्यापेक्षा केसांंना मेंदी लावायला जास्त आवडते. पण ही मेंदी लावताना आपण काळजी घेतो का? मेंदी नीट लावली जाते का? तर काही जणी अजिबातच याची काळजी घेत नाही. केसांसाठी मेंदीचा उपयोग करताना ती व्यवस्थित मिक्स होणं गरजेचं असतं. नाहीतर तुमच्या केसांचा येणारा रंग हा विचित्र दिसतो. त्यासाठी तुम्ही केसांना लावायची मेंदी ही व्यवस्थित मिक्स करायला हवी. केसांना मेंदी लावणं हा अत्यंत सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. त्याशिवाय तो स्वस्त पर्यायही आहे. पण केसांना केसांसाठी मेंदीचा उपयोग करत असाल तर ती कशी मिक्स करावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे केस अधिक सुंदर दिसायला मदत होते. जाणून घेऊया काय  आहेत या गोष्टी –

1. मेंदीमध्ये मिसळा तेल, चहा अथवा कॉफी

Shutterstock

बऱ्याच जणांना मेंदी लावल्यानंतर सर्दी होते. पण नक्की असं का होतं हे कळत नाही. खरंतर मेंदी लावल्यानंतर तुमच्या शरीरातील उष्णता कमी होऊ लागते आणि तुम्हाला सर्दीचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे मेंदी तयार करत असताना त्यामध्ये तुम्ही तेल, तयार केलेला काळा चहा अथवा काळी कॉफी मिक्स करा. यामध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे तुम्हाला सर्दीचा त्रास होणार नाही. त्याशिवाय चहा आणि कॉफीचा काळेपणा त्या मेंदीमध्ये व्यवस्थित उतरून तुमच्या केसांना अधिक चांगला रंग येतो आणि तुमचे केस अधिक मऊ होतात. त्यामुळे मेंदी लावताना या तीन गोष्टींपैकी एखादी गोष्ट मिक्स करायला विसरू नका. याव्यतिरिक्त तुम्हाला यामध्ये आवळा चूर्ण, बीटाचा रस, अक्रोड असे पदार्थही मिक्स करता येऊ शकतात. यामुळे केसांना फायदा होतो. 

Black Tea मुळे आरोग्य राहतं फिट, सौंदर्यासाठीही होतो उपयोग

2. कापूर अथवा मेथी करावी मिक्स

Shutterstock

सध्या प्रदूषणाने आणि पाण्यामुळे वयाआधीच आपले केस पांढरे होतात. त्यामुळे फारच लवकर मेंदी अथवा रंग लावायला सुरुवात करावी लागते. पण तुम्ही मेंदीमध्ये कापराची लहान वडी मिसळली अथवा मेथीचे दाणे मिसळलेत, तर तुम्हाला पांढऱ्या केसांंच्या समस्येपासून सुटका मिळेल. तुमचे केस लवकर पांढरे होणार नाहीत. कापरामध्ये असणारा गंध आणि मेथीच्या गुणांमुळे केसांमधील पांढरेपणा लवकर येत नाही. तसंच मेंदी आणि मेथीच्या एकत्रित मिश्रणाने केसांंना अधिक चांगलं पोषण मिळतं. वयापूर्वी केस पांढरे होण्यापासून तुम्ही स्वतःला या मिश्रणाचा वापर करून वाचवू शकता. 

मेथी दाण्याने होतं वजन कमी आणि केस होतात सुंदर, जाणून घ्या फायदे

3. जास्वंदीचं फूल घालावं वाटून

Shutterstock

जास्वंद हे केसांसाठी अत्यंत पोषक समजण्यात येतं. जास्वंदीच्या तेलाचाही वापर केसांसाठी केला जातो. मेंदी लावताना तुम्ही त्यामध्ये जास्वंदीचं फूल वाटून घातल्यास, केसांना अधिक चांगला रंग येण्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकता. यामुळे केसांना अधिक पोषण मिळतं आणि केसगळतीही थांबण्यासाठी मदत होते. त्यामुळे सहसा मेंदी लावताना जास्वंदाच्या फुलाचा वापर करणं योग्य आहे. 

4. हिवाळ्यात मेंदी लावताना करावा लवंगेचा उपयोग

Shutterstock

हिवाळ्यात थंडी असते आणि मेंदी ही शरीरासाठी थंड असते. त्यामुळे सर्दीचा त्रास अधिक प्रमाणात होतो. अशावेळी तुम्हाला जर मेंदी लावायची असेल तर त्यामध्ये लवंगेचा उपयोग करा. लवंग ही उष्ण असते. त्यामुळे मेंदीमध्ये मिक्स केल्यानंतर थंंडाव्याचा त्रास होत नाही. लवंगेची उष्णता मेंदीमध्ये उतरते आणि त्यामुळे तुमच्या डोक्यावर मेंदी लावली तरी त्याचा परिणाम शरीरावर होत नाही. शिवाय केसांचा रंग जास्त रंग टिकवून ठेवण्यासाठीही लवंगेचा उपयोग होतो. 

5. संत्र्यांच्या रसाचा करा वापर

Shutterstock

दोन चमचे संत्र्याच्या रसामध्ये दोन चमचे मेंदी मिसळा आणि तुम्ही शँपू केल्यानंतर याचा वापर करून केस दहा मिनिट्सने धुवा. यामुळे तुमच्या केसांना अधिक चमक मिळते. तुमचे केस कोरडे राहात नाहीत आणि अधिक चमकदार दिसून येतात. तसंच तुम्हाला याचा वापर केल्याने जास्त वेळ मेंदी लावून बसावं लागत नाही. संत्र्यामध्ये केसांना आवश्यक असणारंं विटामिन सी असल्याने केस त्वरित चमकदार करण्यासाठी तुम्ही त्याचं असं मिश्रण करून वापर करून घेऊ शकता. 

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

Read More From Care