वातावरणानुसार केसांमध्ये बराच फरक पडत असतो. उन्हाळ्यात केस चिकट होऊ लागतात. तर थंडीमध्ये केस कोरडे होऊ लागतात. वातावरणात जराशा जरी थंडावा आला की लगेचच केस सुकू लागतात. केसांचे टिप्स कोरडे होतात. स्काल्प ही अधिक कोरडी लागू लागते. अशावेळी केस धुवायचा कितीही कंटाळा असेल तरी देखील कोंड्याचा त्रास वाढू नये यासाठी आपण हिवाळ्यात केस धुतो. पण हिवाळ्यात केसांमधील चमक तशीच टिकून ठेवण्यासाठी किती वेळा केस धुवावेत हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे. चला जाणून घेऊया हिवाळ्यात तुम्ही किती वेळा केस धुवायला हवेत ते.
काय आहे Nigricans, त्वचेवर काय होतो त्याचा परिणाम
हिवाळ्यात केस किती वेळा धुवावेत
हिवाळ्यात केस किती वेळा धुवावेत असा विचार करत असाल तर जाणून घेऊया ही महत्वाची माहिती
- हिवाळ्यात आठवड्यातून किमान दोन दिवस तरी तुम्ही केस धुवायला हवेत. कारण त्यामुळे कोरड्या स्काल्पची चिंता दूर होते.
- हिवाळ्यात केस रोज धुणे देखील चांगले नाही. कारण सतत केस धुतल्यामुळे केसांचा कोरडेपणा अधिक वाढतो.
- केसांचा कोरडेपणा हिवाळ्यात अधिक वाढतो. अशावेळी तुम्ही केसांना कंडिशनर लावून केस धुवायला हवेत. त्यामुळे केस अधिक चांगले दिसतात आणि राहतात देखील
- केस धुताना केसांसाठी खूप जड शॅम्पू लावू नका. कारण त्यामुळे केसांचा कोरडेपणा वाढतो.
- जर तुम्हाला केस धुवायला आवडत नसेल तरी देखील तुम्ही केसांना पाणी लावून थोडक्यात धुवायला काहीच हरकत नाही.
केसांना करा कंडिशनिंग
हिवाळ्यात केसांना कंडिशनिंग करणे देखील गरजेचे असते. विशेषत: थंडीच्या दिवसांमध्ये केसांची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही केसांना उत्तम कंडिशनिग करणे गरजेचे असते.
- केसांना कंडिशनर लावायचे असेल तर तुम्ही विकतचे आणि रेडिमेड कंडिशनर वापरु शकता.
- केसांना कंडिशनिंग करायचे असेल तर तुम्ही केसांना अंड्याचा पांढरा बलकदेखील लावू शकता. त्यामुळेही केसांना चांगली चमक मिळते.
- केसांसाठी तुम्हाला चांगले कंडिशनर हवे असेल तर तुम्ही केसांना ॲलोवेरा जेल देखील लावू शकता. त्यामुळेही केस चांगले राहण्यास मदत मिळते.
- केसांसाठी नॅचरल कंडिशनरचा विचार करताना तुम्ही केसांना दही, मेंदी कालवून देखील लावू शकता. त्यामुळेही केसांना चांगली चमक मिळण्यास मदत मिळते.
आता हिवाळ्यात केस धुताना तुम्ही या काही गोष्टींची नक्की काळजी घ्या.
हिवाळ्यात ओठांच्या काळजीसाठी घरगुती उपाय | Lip Care Tips For Winter In Marathi