DIY फॅशन

सिल्कची साडी धुवा घरी, जाणून घ्या सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Aug 24, 2020
सिल्कची साडी धुवा घरी, जाणून घ्या सोप्या टिप्स

 

पारंपरिक साडी नेसायची म्हटली की पहिल्यांदा मनात येते ती सिल्कची साडी. आपल्याकडे खास कार्यक्रमात नेसण्यासाठी हमखास सिल्कची साडी असते. अगदी अनेक अभिनेत्रीही सिल्कच्या साड्यांना पसंती देतात. सिल्कच्या साडीमध्ये एक वेगळीच चमक असते आणि आकर्षकताही. सिल्कची साडी मुळात महाग असते आणि त्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे सिल्कची साडी नेसल्यानंतर बऱ्याचदा ती साडी धुण्यासाठी लाँड्रीमध्येच द्यावी लागते. सिल्कच्या साडीची योग्य काळजी घेतली नाही तर त्याची चमक निघून जाते आणि मग साडी चांगली दिसत नाही. त्यामुळे ही साडी घरी धुता येत नाही असा समज आहे. पण प्रत्येक वेळी साडी ड्रायक्लिनिंगला देणे प्रत्येकाला परवडू शकतेच असं नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुमची सिल्कची साडी घरच्या घरी धुवायची असेल आणि तशीच चमक राखायची असेल तर आम्ही तुम्हाला साडी धुण्याची योग्य पद्धत या लेखातून सांगत आहोत. तुम्ही या पद्धतीचा वापर केल्यास, सिल्कची साडी उत्तम तर राहीलच त्याशिवाय त्याची चमकही राहील. 

हाताने साडी धुण्याची पद्धत

 

सिल्कची साडी तुम्ही घरच्या घरी हाताने धुऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायला हवे ते आम्ही इथे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगतो. त्याप्रमाणे तुम्ही पद्धत अवलंबली तर तुमची साडी तशीच्या तशी राहील. 

सिल्कच्या साड्या जपण्यासाठी घ्या अशी काळजी, अन्यथा साड्या होतील खराब

सिल्कच्या साडीवर डाग पडल्यास

 

तुमच्या सिल्कच्या साडीवर एखादा डाग लागला असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे डाग काढून टाकण्यास सोपे जाईल. 

सणाला साडी नेसून दिसायचं असेल स्टायलिश तर फॉलो करा Draped Saree

याची घ्या काळजी

 

सिल्क साडी धुण्याआधी त्याचा रंग जातो की नाही याची व्यवस्थित तपासणी करून घ्या. सिल्क साडीचा रंग जात असल्यास, तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागते. सिल्क साडी धुण्यासाठी क्लिनिंग डिजर्टंज सॉफ्ट असणंही तितकंच गरजेचं आहे. कारण हार्ड डिटर्जंट आणि ब्लीच साडी खराब करू शकते. त्यामुळे या गोष्टींची काळजी सिल्कची साडी घरी धुताना घेणं अत्यंत आवश्यक आहे. जुनी झाल्यावर साडीचा ड्रेसही शिवू शकता. 

साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक

साडीवरील मराठी स्टेटस

Old Sadicha Dress Design In Marathi

Read More From DIY फॅशन