DIY सौंदर्य

अशा 7 पद्धतीने तुमचा Toothbrush बनवतो तुम्हाला अधिक सुंदर!

Dipali Naphade  |  Jul 7, 2019
अशा 7 पद्धतीने तुमचा Toothbrush बनवतो तुम्हाला अधिक सुंदर!

आपल्या रोजच्या टूथब्रश (toothbrush) चा उपयोग आपल्याला किती प्रकारे होऊ शकतो याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? केवळ दात घासण्यासाठीच टूथब्रशचा उपयोग होतो असं नाही तर तुम्ही तुमच्या टूथब्रशने अनेक वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून अन्य गोष्टींसाठीदेखील याचा वापर करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, टूथब्रशचे अजून असे काय उपयोग होतात? पण आम्ही तुम्हाला याचे काही अन्य उपयोगही सांगणार आहोत जे तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतात. त्यामुळे याचे नक्की काय उपयोग आहेत हे या लेखातून जाणून घ्यायला तयार व्हा. 

1. तुमच्या eyebrows ना देता येतो नवा आकार

Shutterstock

बऱ्याचदा आपल्या आयब्रोज या योग्य आकारात नसतात. त्या दिसायलादेखील विचित्र दिसत असतात. अशावेळी तुम्ही टूथब्रशचा वापर करू शकता. तुम्ही टूथब्रश आयब्रोजवर व्यवस्थित फिरवा. असं केल्याने तुमच्या आयब्रोजचे केस एका रेषेत व्यव्यस्थित येतील आणि दिसायलादेखील आकर्षक दिसतील. 

2. कपाळावर येणाऱ्या लहान केसांची समस्या होते दूर

कपाळावर येणारे  लहान केस हे Little monsters पेक्षा काही कमी नाहीत. आपण कितीही केस सेट करायचे म्हटले आणि पोनीटेल बांधली की, असे केस सेटल करणं बऱ्याचदा कठीण होऊन जातं. ही गोष्ट अनेक मुलींसाठी कंटाळवाणी असते. पण त्यावर एक सोपा उपाय आहे. यासाठी तुम्ही टूथब्रशचा वापर करू शकता. अर्थात आता हा कसा करायचा असाही प्रश्न पडू शकतो. तर तुमच्या टूथब्रशवर थोडंसं लिप बाम लावून कपाळावर येणारे हे लहान केस तुम्हाला नीट सेट करता येतात. आहे की नाही सोपा उपाय? आता जर असं झालं तर हा उपाय नक्की करून पाहा. 

3. नैसर्गिक lip plumping होते मदत

Shutterstock

तुम्ही सकाळी उठल्यावर अथवा लिपस्टिक लावण्यापूर्वी तुमच्या ओठांवर टूथब्रश थोडासा सर्क्युलर मोशनमध्ये फिरवलात तर याचा खूप चांगला नैसर्गिक उपयोग होतो. तुमचे ओठ जर कोरडे असतील अथवा फुटलेले असतील तर तुम्ही असं केल्यामुळे तुमचे ओठ नैसर्गिकरित्या मऊ आणि मुलायम होतात. त्यानंतर ओठांवर लिपस्टिक अथवा लिप बाम लावल्यास, तुम्हाला खूपच चांगला परिणाम पाहायला मिळेल. 

4. Blackheads काढून टाकणं आता अजून सोपं

Shutterstock

प्रत्येक मुलगी आणि अगदी मुलासाठीही सर्वात मोठी अडचण म्हणजे – BLACKHEADS ! जितके वेळा तुम्ही हे काढून टाकता तितके वेळा परत येतात. यापासून सुटका मिळवणं अतिशय कठीण आहे पण यावरदेखील एक चांगला उपाय आहे तो म्हणजे टूथब्रश. आपल्या ब्लॅकहेड्स असणाऱ्या ठिकाणी फेसवॉश लावा आणि मग टूथब्रशने यावर हलक्या हाताने घासा. तुमचे ब्लॅकहेड्स निघून जातील आणि तुमची त्वचा चमकदार होईल. इतर कोणत्याही गोष्टी करण्यापेक्षा हे अधिक सोपं आहे. 

5. हेअर ड्रायरमधील धूळ काढण्यासाठी

Shutterstock

हेअर ड्रायरमध्ये बऱ्याचदा खूपच धूळ साचते. पण ही धूळ नक्की कशी साफ करायची असा प्रश्न नेहमीच पडतो. अशावेळी टूथब्रश कामी येतो. आपला टूथब्रश ड्रायरच्या मागच्या भागामध्ये घालून तुम्ही गोलाकार फिरवा. असं केल्याने तुमचा हेअर ड्रायर व्यवस्थित क्लीन होईल.

6. नखं साफ करण्यासाठीही होईल वापर

Manicure अथवा Pedicure या दोन्हीसाठी टूथब्रशचा चांगला वापर होतो. हे करत असताना टूथब्रशने आपली नखं साफ करा आणि मग हळूहळू टूथब्रशने घासा. तसंच असं केल्यामुळे डेड स्किन आणि डेड सेल्स निघून जातील. 

7. Nail art बनवण्यासाठी होतो उपयोग

Shutterstock

आजकाल nail art ची खूपच फॅशन आहे आणि हे नेलआर्ट सध्या ट्रेंडमध्ये आहे. हे करण्यासाठी तुम्ही टूथब्रशचा वापर करू शकता. याने तुम्ही वेगवेगळी डिझाईन्सदेखील करू शकता. त्यासाठी तुम्ही नेलआर्ट करताना टूथब्रश कोणत्याही तुमच्या आवडत्या रंगात डिप करून मग तुमच्या नखांवर स्प्रिंकल करून लावू शकता. 

उदाहरणार्थ – तुम्ही नखांना पहिले पांढरा रंग लावून घेतल्यावर त्यावर हिरवा, लाल अथवा निळ्या रंगाने स्क्रिंकल करा. अशी नखं खूपच सुंदर दिसतात आणि तुम्हाला नेलआर्ट करून घेण्यासाठी जास्त पैसाही खर्च करावा लागत नाही. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या नखांना एक वेगळा लुकही देऊ शकता. 

हेदेखील वाचा –

नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

Perfect Pout साठी ट्राय करा ‘या’ सोप्या 5 Tricks!

म्हणून पावसाळ्यात नियमित करायला हवे पेडिक्युअर

 

 

Read More From DIY सौंदर्य