Care

आठवड्यातून एकदा केसांची तेल लावून वेणी घालणं का आहे गरजेचं

Trupti Paradkar  |  Jul 21, 2020
आठवड्यातून एकदा केसांची तेल लावून वेणी घालणं का आहे गरजेचं

केसांना तेल लावून वेणी घालण्याची पद्धत अगदी पुर्वी पासून आहे. कधी काळी तेल लावून केसांच्या चापूनचोपून बांधलेल्या एक अथवा दोन वेण्या ही एक फॅशन होती. मात्र आजकाल स्टायलिश दिसण्यासाठी वेणी घालणं कुणी पसंत करत नाही. वेणीने केस बांधून ठेवण्यापेक्षा निरनिराळ्या हेअर स्टाईल करणे अथवा केस फक्त मोकळे सोडणे अशी फॅशन सध्या प्रचलित आहे. अगदी कधी तरीच वेणी एखाद्या हेअरस्टाईलचा एक भाग म्हणून घातली जाते. मात्र केसांना तेल लावून वेणी घालणं हे आजकल जरी गावंढळ वाटत असलं तरी त्याचे अनेक चांगले फायदे केसांवर होऊ शकतात. जर तुमचे केस फार कोरडे झाले असतील अथवा तुटत, गळत असतील तर तुम्ही हा उपाय जरूर ट्राय करायला हवा. केस लांब आणि मजबूत व्हावे असं प्रत्येकीला वाटत असतं. यासाठीच आठवड्यातून एकदा केसांना तेल लावून वेणी जरूर घाला. मात्र त्याआधी जाणून घ्या केसांना तेल लावून वेणी घातल्यामुळे केसांना काय काय फायदा होऊ शकतो.

केस मऊ आणि मुलायम होतात –

केसांना योग्य प्रमाणात आणि वेळेवर तेल न लावल्यामुळे केसांमधील कोरडेपणा वाढू लागतो. शिवाय मोकळ्या प्रकारची हेअरस्टाईल केल्यामुळे ते सतत तुटतात आणि  गळू लागतात. मात्र जर तुम्ही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी केसांना तेलाने मसाज केला आणि वेणी घातली तर ते तेल केसांमध्ये व्यवस्थित मुरतं. ज्याचा परिणाम केसांवर दिसू लागतो आणि केस मऊ, मुलायम होतात. तुम्ही हेअर मसाजसाठी नारळाचे तेल, बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑईल अथवा कोणतेही घरगुती आयुर्वेदिक हेअर ऑईल वापरू शकता. ज्यामुळे केसांच्या मुळांना आराम मिळेल आणि तुमचे केस लांब आणि मजबूत होतील.

Instagram

केसांचे गळणे कमी होते –

जर तुमच्या केसांचे गळण्याचे प्रमाण वाढले असेल तर ही एक चिंतेची बाब नक्कीच आहे. केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. मात्र त्यावर उपाय करण्यासाठी आठवड्यातून एकदा केसांना तेल लावुन वेणी नक्की घाला. कारण तेलाचा मजास केल्यामुळे केसांचे पोषण होते आणि वेणी घातल्यामुळे केस कमी प्रमाणात तुटतात.

Instagram

केस लांब आणि मजबूत होतात –

केसांची वेणी घातल्यामुळे केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी होते. बऱ्याचदा केस मोकळे ठेवल्यामुळे अथवा विविध प्रकारच्या ब्युटी ट्रिटमेंट, हेअर स्टाईल यांच्यामुळे केस कमजोर होत असतात. मात्र तेल  लावण्यामुळे केसांचे योग्य पोषण होते आणि केस मजबूत आणि लांब होतात.

Instagram

केसांना फाटे फुटणे कमी होते –

केसांवर तेल लावून त्यांची सैलसर वेणी घातल्यामुळे तुमच्या केसांचा गुंता होत नाही. शिवाय पुरेसे पोषण मिळाल्यामुळे केस मऊ आणि मुलायम राहतात. सहाजिकच केसांमधील कोरडेपणा कमी झाल्यामुळे केसांना फाटे फुटणे कमी होते. तुम्हाला आम्ही सांगितलेले  फायदे कसे वाटले आणि  तुम्ही हा उपाय ट्राय केला का हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये अवश्य कळवा. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि इन्स्टाग्राम

हेअर केअरबाबत अधिक वाचा –

केसांचे आरोग्य राखण्यासाठी ट्राय करा हे सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate Free Shampoo)

वेणीचे प्रकार ज्यामध्ये तुम्ही दिसाल अधिक आकर्षक (Types Of Braid Hairstyles In Marathi)

वेणी बांधणे केसांच्या आरोग्यासाठी असते फायदेशीर, जाणून घ्या कसे

Read More From Care