Fitness

कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर प्या हे ज्युस

Dipali Naphade  |  Mar 27, 2020
कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर प्या हे ज्युस

बऱ्याचदा आजाराची सुरूवात ही सर्दी, खोकला, ताप यामुळेच सुरू झालेली दिसून येते. अशा लोकांची आजाराशी लढण्याची  प्रतिकारशक्ती खूपच कमी असते, त्यामुळेच या व्यक्ती लवकर आजारी पडतात. सध्या कोरोना व्हायरसची साथ आली आहे आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती या आजाराने पटकन ग्रस्त होतात. तुम्हाला घरबसल्या तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आमच्याकडे एक खास उपाय आहे. आम्ही तुम्हाला काही ज्युस सांगतो जे तुम्ही पिऊन तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता. हे असे काही ज्युस आहेत ज्यामुळे घरबसल्या तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता. दिवसातून अगदी एकदा जरी तुम्ही यापैकी एखादा ज्युस प्यायलात तरी तुम्हाला त्याचा योग्य परिणाम मिळेल आणि प्रतिकारशक्ती वाढेल. जाणून घेऊया कोणते आहेत हे ज्युस आणि कसे बनवयाचे. 

टॉमेटो ज्युस

Shutterstock

टॉमेटो तर आपल्या रोजच्या वापरातील पदार्थ आहे. आपण भाजी आणि सलाड म्हणून नेहमीच टॉमेटो खातो. पण टॉमेटोचा ज्युस तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात समाविष्ट करून पाहा. वास्तविक टॉमेटोमध्ये फोलेटचं प्रमाण जास्त  असते. ज्यामुळे बऱ्याच विषाणूचे संक्रमण रोखण्याचे काम टॉमेटो करतो. यामुळेच आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. 

कसे तयार करायचे – 

‘या’ गोष्टी ज्या वाढवतील तुमची प्रतिकारशक्ती आणि ठेवतील तुम्हाला एकदम फिट!

संत्री आणि नारिंगी

Shutterstock

संत्री आणि नारिंगी ही दोन्ही फळं बाजारात सहजपणे मिळतात. बऱ्याचदा आपण संत्र आणि नारिंगी ही दोन्ही फळं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खात असतो. पण याचे ज्युस पिण्याने जास्त फायदे होतात. यामध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यासह यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हे आपल्या चेहऱ्याला उजळपणा आणण्यासाठीही फायदेशीर ठरतात. आपली इम्यून सिस्टिम मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

कसे तयार करायचे – 

नेहमी तरूण दिसण्यासाठी, नियमित प्या हे ज्युस

कलिंगडाचा ज्युस

Shutterstock

कलिंगडाचा आता तर सीझन सुरू झाला आहे. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, मॅग्नेशियम आणि जिंक असे अनेक पोषक तत्व आढळतात. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला कलिंगडाचा ज्युस करून पिणं हा चांगला पर्याय आहे. यामुळे आपल्या मांसपेशीतील दुखणंही कमी होतं 

कसे तयार करायचे – 

गाजर आणि आल्याचा ज्युस

Shutterstock

गाजर आणि आल्यापासून तयार करण्यात आलेल्या ज्युसने आपली इम्यून सिस्टिम मजबूत करण्यास मदत मिळते. या दोन्ही पदार्थांना एकत्र करून बनवण्यात आलेल्या ज्युसमधून विटामिन ए, विटामिन सी आणि विटामिन ई सह लोह आणि कॅल्शियमसारखे मिनरल्सदेखील मिळतात. यामुळेच तुम्ही नियमित याचा ज्युस प्यायल्यास तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. 

कसे करायचे तयार – 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

देखील वाचा – 

शरीरात विटामिन सी ची असेल कमतरता, नियमित प्या हे ज्युस

प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा रेसिपी

Read More From Fitness