आरोग्य

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी चहामध्ये टाका या तीन गोष्टी

Trupti Paradkar  |  Jul 18, 2021
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी चहामध्ये टाका या तीन गोष्टी

मुसळधार पाऊस सुरू असताना खिडकीत बसून गरमागरम चहा घेण्यात एक वेगळाच आनंद आहे. पावसाचा जोर वाढू लागला की घरात चहाची फर्माइश वाढू लागते. त्यामुळे चहाप्रेमींसाठी पावसाळा नक्कीच आवडीचा  काळ असतो. चहाप्रेमी असा अथवा नसा पण या काळात नेहमीपेक्षा जास्त वेळा चहा नक्कीच घेतला जातो. या काळात सोशल मीडियावरही पाऊस आणि चहाच्या जोडगोळीच्या पोस्ट व्हायरल होताना दिसतात. मात्र पावसाळा जसा आनंद, थंडावा आणि रोमॅंटिक वातावरण निर्माण करतो तसाच या पावसासोबत घरात सर्दी, खोकला आणि ताप हे पाहुणे आमंत्रण नसतानाही दाखल होतात. वास्तविक या काळात वातावरणात होणाऱ्या बदलांचा तुमच्या  रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होत असतो. ज्यामुळे पावसाळ्यात प्रतिकार शक्ती कमजोर होते. यासाठीच या काळात प्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज असते. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या आवडत्या चहामध्ये काही गोष्टी मिसळून तुमची प्रतिकार शक्ती वाढवू शकता. यासाठीच जाणून घ्या पावसाळ्यात चहा कसा असावा. 

पावसाळ्यात आजारपणापासून वाचण्यासाठी चहात मिसळा या तीन गोष्टी

चहाचा आस्वाद घेत पावसाळ्यात आजारपणापासून दूर राहायचं असेल तर चहात या गोष्टी असणं गरजेचं आहे.

आलं –

instagram

अनेकांच्या घरात पावसाळ्यात खास आल्याचा चहा तयार होत असेल. आल्याचा चहा घेतल्यामुळे तुम्ही आजारपणापासून दूर राहता. पूर्वीच्या काळी सर्दी, खोकल्यावर उपाय म्हणून आल्याचा चहा घेण्याचा सल्ला दिला जात असे. आल्यामध्ये अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि व्हायरल गुणधर्म असतात. यातील घटक जीवजंतूंचा नाश करतात आणि तुम्हाला निरोगी ठेवतात. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आलं खूपच फायदेशीर आहे. कोरोनाच्या काळात घरात आल्याचा चहा करणं खूप गरजेचं आहे. आल्याचा चहा घेतल्याने तुमच्या घशाला चांगला आराम मिळतो.

दालचिनी –

instagram

दालचिनी हा मसाल्याच्या पदार्थांमधील एक महत्त्वाचा मसाला आहे. दालचिनी आरोग्यवर्धक असून त्यामध्ये व्हिटमीन, कॅल्शियम, मँगनीज, पोटॅशिअम, निआसीन, कार्बोहायड्रेट,थाईमीन, फॉस्फरस, प्रोटीन, सोडियम हे घटक आढळतात. शिवाय दालचिनीमध्ये अॅंटि ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. शिवाय दालचिनीमध्ये हिलिंग करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात वातावरणातील बदलांमुळे होणारे परिणाम त्वरीत नीट होतात. पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर दालचिनीचा चहा घेणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरेल. दालचिनीला एक सुंदर सुंगध असल्यामुळे या चहाचा सुंगध, चव आणि रंग तुम्हाला आवडेल. चहाप्रेमींना अशा नवनवीन प्रकारचे चहा खूप आवडतात. तेव्हा दालचिनीचा चहा नक्की ट्राय करा. बऱ्याचदा थंड हवेच्या ठिकाणी दालचिनीचा चहा दिला जातो. 

तुळस –

instagram

भारतीय घरात दारात, गच्चीत, अंगणात, बाल्कनीत, घराबाहेर तुळशीचे रोप असतेच. तुळशीला धार्मिक महत्त्व असल्याने प्रत्येक हिंदू घरात तुळशीची पूजाअर्चा  केली जाते. मात्र तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पतीदेखील आहे. सहाजिकच तुळशीची पाने खाण्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहते. यासाठीच चहामध्ये तुळशीची पाने टाकणे तुमच्या फायद्याचे ठरेल. तुळशीच्या पानांमुळे चहाला चांगला स्वाद येईल आणि तुमचे आरोग्य ठणठणीत राहिल. 

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

हे फायदे वाचाल तर रोज प्याल ‘गवती चहा’

चहा पिण्याचे फायदे करतील तुम्हाला आश्चर्यचकित (Tea Benefits In Marathi)

जाणून घ्या काळा चहा पिण्याचे फायदे आणि दुष्परिणाम (Black Tea Benefits In Marathi)

Read More From आरोग्य